Skip to main content

Posts

सुंदर पिचाई - गूगलचं भविष्य

  “सुंदर पिचाई - गूगलचं भविष्य” हे पुस्तक केवळ सुंदर पिचाई यांच चरित्र नाही, तर एका सामान्य मध्यमवर्गीय मुलाचा जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान कंपनीचा CEO होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे. सुंदर पिचईबद्दल माहिती देतानाच हे पुस्तक गुगलच्या कार्यपद्धतीवर जास्त प्रकाश टाकतं. पुस्तकाची सुरुवात चेन्नईतील त्यांच्या साध्या बालपणापासून होते. मर्यादित साधनं, अभ्यासाची आवड, विलक्षण स्मरणशक्ती आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सतत पुढे जात राहिले. IIT, Stanford आणि Wharton पर्यंतचा त्यांचा प्रवास चॅलेंजेस, हार्डवर्क आणि योग्य डिसीजन्सने भरलेला आहे. आय आय टी खडकपूरमध्ये शिकलेल्या सुंदर पिचाई यांनी १९९३ मध्ये स्टँडफोर्डची स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेला आले तेव्हा त्यांच्याकडे सॅक घ्यायलाही पैसे नव्हते. २००४ साली "हेड ऑफ प्रॉडक्ट मॅनेजमेंट एंड डेव्हलपमेंट" या पोस्टसाठी गुगल मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी Google Toolbar, Chrome, Chrome OS, Gmail, Google Drive, Android आणि इतर अनेक महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये केलेली लीडरशिप पुस्तकात प्रभावीपणे मांडली आहे. व...

प्रतिपश्चंद्र : इतिहास, रहस्य आणि कल्पनाशक्तीचा अद्वितीय संगम

  प्रतिपश्चंद्र : इतिहास, रहस्य आणि कल्पनाशक्तीचा अद्वितीय संगम मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबऱ्यांची समृद्ध परंपरा आहे. मात्र इतिहास आणि रहस्य यांचा प्रभावी मेळ घालणाऱ्या कादंबऱ्या तुलनेने कमी आढळतात. डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची “प्रतिपश्चंद्र” ही कादंबरी या दृष्टीने वेगळी ठरते. छत्रपती शिवाजी महाराज, बहिर्जी नाईक, राजमुद्रा आणि शतकानुशतके लपलेले एक गूढ रहस्य याभोवती विणलेली ही कथा वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कादंबरीची सुरुवात एका आधुनिक गुन्हेगारी प्रकरणापासून होते. एका मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरवर न्यायाधीशांच्या खुनाचा आरोप होतो आणि त्यानंतर सुरू होतो रहस्य, इतिहास आणि साहसाचा थरारक प्रवास. वर्तमान आणि शिवकाल यांना जोडणारी कथानकाची मांडणी ही या कादंबरीची सर्वात मोठी ताकद आहे. लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना ऐतिहासिक घटनांना कल्पनाशक्तीची प्रभावी जोड दिली आहे. बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर व्यवस्थेचा संदर्भ, राजमुद्रेशी निगडित रहस्य आणि त्याभोवती उभे राहणारे प्रश्न वाचकाची उत्कंठा कायम ठेवतात. इतिहासाची पार्श्वभूमी असूनही कथा आधुनिक...

A Titan Story

अ टायटन स्टोरी "जब हम फेल्युअर को सेलिब्रेट करते है तब हम अपनी गलती को एक्सेप्ट करते है, मूव्ह व करना आसान हो जाता है, और ग्रो करना उससे भी आसान" कधी अशा काही कलाकृती बनतात ज्या तुम्हाला भारावून सोडतात आणि नव्याने विचार करायला भाग पाडतात त्यातलीच एक "अ टायटन स्टोरी" वेबसिरीज.  कौतुक करायला शब्द कमी पडावेत इतकी अप्रतिम. स्टोरीटेलिंग, सगळ्यांचा अभिनय, म्युजीक सगळंच जबरदस्त! त्यात ती रिअल लाईफ स्टोरी आहे हे माहित असताना ही सिरीज बघण्याचा अनुभव वेगळा आहे.  या सिरीज मधून मी बोध घेतलेल्या काही गोष्टी.  १. स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. टाटा प्रेसला प्रॉफिट मध्ये आणण्याची जबाबदारी असताना, भारतात स्वतःच्या बनावटीचे घड्याळ नाही आणि बाहेरच्या देशातली घड्याळे इकडे स्मगलिंगने आणून विकली जातात याचा अंदाज आल्यावर देसाईजीनी भारतीय बनावटीचे बॅटरीवर चालणारे (क्वार्ट्झ) घड्याळ बनवण्याचा विचार केला.  त्यांच्या या विचारावर बऱ्याच जणांनी अविश्वास दाखवला आणि ते किती अशक्य आहे हे पण पटवून देण्याचा विचार केला पण ते त्यांच्या व्हिजनवर ठाम राहिले.  टायटन शेवटी ब्रँड बनला.  २. तु...

आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व

  आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व संपूर्ण आयुष्याचे प्लॅनिंग जर आपल्याला एखाद्या पुस्तकाच्या सहाय्याने करता आलं तर? पुस्तक वाचता वाचताच आपल्या आयुष्याशी निगडित गोष्टी त्या पुस्तकातच भरता आल्या आणि त्यातून एक भन्नाट रिपोर्ट स्वतःसाठी तयार झाला तर त्याहून अधिक काय हवं? हेच साध्य करता येत आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व पुस्तक वाचताना. पुस्तकाची सुरुवात स्वॉट एनालिसिस पासून होते ज्यात तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पाहता. स्वतःचे स्ट्रेंग्थ, विकनेस, ऑपॉर्च्युनीटीज आणि थ्रेट्स कसे शोधायचे हे उत्तम उदाहरणासकट सोपे करून दिले जाते. त्यासोबतच SMART गोल सेटिंगमध्ये करिअर गोल, हेल्थ गोल, रिलेशनशिप गोल, फायनान्शियल गोल, सोशल गोल, ट्रॅव्हल गोल, लाइफस्टाइल गोलवर काम करवून घेतलं जातं. टाईम मॅनेजमेंट मध्ये इंपॉर्टन्ट कामे शोधणे आणि त्यासाठी ३-३-३ पद्धती, वाईट सवयी कशा सोडाव्यात आणि नकारात्मक विचार कसे खोडून काढावेत, सबकॉन्शियस माईड ची ताकद आणि आपली बिलीफ सिस्टम कशी बदलावी, हेल्थ मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, फायनांशिअल फ्रीडम अशा आयुष्याशी निगडित विविध अंगांवर काम केलं जातं. ...

हाऊ टू थिंक लाईक स्टीव्ह जॉब्स - डॅनियल स्मिथ

  स्टीव्ह जॉब्स हे केवळ यशस्वी बिझनेसमन नव्हते, तर जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही विलक्षण होती. "How to Think Like Steve Jobs" या पुस्तकात डॅनियल स्मिथ यांनी स्टिव्ह जॉब्सला मोजक्या पण इफेक्टिव्ह पद्धतीने लोकांसमोर आणलं आहे. हे पुस्तक जॉब्सच्या आयुष्यातील अनुभव, निर्णय, अपयश आणि यश यांमधून शिकण्यासारखे धडे समोर आणते. जॉब्स यांचा विश्वास होता की खऱ्या अर्थाने नावीन्य हे टेकनॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटी यांच्या कॉम्बिनेशनमधून जन्माला येते. त्यांनी नेहमीच वेगळा विचार करण्यास, मोठी स्वप्ने पाहण्यास आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्यास प्रोत्साहन दिले. ग्राहकांना काय हवे आहे हे विचारण्यापेक्षा त्यांना भविष्यात काय आवश्यक वाटेल याचा अंदाज घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवत होती. या पुस्तकात एक मस्त वाक्य आहे, "अलेक्झांडर ग्रॅहम बेलनं टेलिफोनचा शोध लावण्याआधी मार्केट रिसर्च केला होता ?" जो मुख्य मुद्दा या पुस्तकात मांडला आहे तो म्हणजे यश हे केवळ टॅलेंट किंवा लक मुळे मिळत नाही. क्लिअर व्हिजन, डेडिकेटेड एफर्टस, डिटेलिंग आणि आपल्या कामाबद्दल असलेली क्युरिऑसिटी ...

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण

  श्रीमानयोगी वाचण्यापूर्वी मी कै. बाबासाहेब पुरंदरे यांची राजे शिवछत्रपती वाचली होती.  मुळात सिरियल्स मधून किंवा सिनेमामधून महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडला जातोच.  बऱ्याचशा गोष्टी ज्या ऐकल्या किंवा वाचल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने श्रीमानयोगी मध्ये मांडल्या आहेत जसं कि महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली असं वाचलं होतं पण या कादंबरीमध्ये रोहिडेश्वरावर सांगितली आहे.  किंवा अफझलखान स्वारीच्या वेळी सईबाईंचे निधन झाले तेव्हा महाराज त्यांच्यासोबत नव्हते हे वाचलं होतं पण यात महाराज सईबाईंसोबत आहेत हे मांडलं आहे.  थोडं गोंधळून मी विनोद दादाला हा प्रश्न विचारला तेव्हा इतिहासकार आणि कादंबरीकार यात फरक असतो हे समजलं.  कादंबरीकार गोष्ट लिहिताना बरीच लिबर्टी घेतात त्यामुळे ती गोष्टरूपाने वाचली गेली पाहिजे याचा उलगडा झाला.  त्या दृष्टिकोनातून वाचल्यावर हे पुस्तक दमदारच आहे.  एक कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निभावत असलेली प्रत्येक भूमिका यात चोख मांडली आहे.   स्वराज्याचं तोरण उभारत असताना महाराजांना घरापासून बऱ्याच वेळा लांब राह...

काकी निवृत्त होताना....

  प्रिय काकी, आज तुझ्या सेवानिवृत्ती समारंभात येऊन छान वाटलं. दादाने आमच्यावतीने थोडक्यात पण उत्तमरित्या तुझ्या जीवनप्रवासाचं वर्णन केलं. बोलण्यासारखं माझ्याकडेही बरंच होतं पण तिथे बऱ्याच जणांना बोलायचं होतं आणि असंही जवळच्या व्यक्तींबद्दल बोलताना माझ्या भावना अनावर होतात म्हणून मी तिथे बोलणं टाळलं. त्यासाठीच हा पत्रप्रपंच. बालपणातला बराच काळ मी तुम्हा दोघांसोबत घालवला. तुमच्या लग्नाच्या वेळी मी तिसरी चौथीला असेन. त्या काळात मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करण्याचं एवढं काही फॅड नव्हतं पण चाळीत दोन तीन सुखवस्तू घरातले बर्थडे बघून माझ्या बालमनात ती ईच्छा निर्माण झाली होती. मी आतापर्यंत कधीच वाढदिवस साजरा केला नाही हे तुला समजल्यावर तू आणि नयना मावशी मिळून घरी येऊन माझा वाढदिवस सेलिब्रेट केलात तो प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. आता कदाचित वाढदिवस साजरा करणं ही खूप कॉमन गोष्ट आहे पण तीसेक वर्षापूर्वी ती नक्कीच नव्हती. त्यानंतर तुझ्यासोबत पाहिलेला जुरासिक पार्क सिनेमासुद्धा एक वेगळा आणि धमाल अनुभव होता. तुम्हा दोघांच्या लग्नातला मी टोकणा. लग्नात बरेच फोटो काढायला मिळतील या अपेक्षेव...

कोकणस्थ - मातीची ओढ

  कोकणस्थ - मातीची ओढ आपल्यातल्या बऱ्याच लोकांना शहरातील धावपळीचं आयुष्य आवडत नाही.  गावाकडे निवांत रहावस वाटतं.  पण इथे सगळ्याच गोष्टींची पाळंमुळं अशी रोवलेली असतात की इथून सगळं बस्तान गावाला हलवू शकत नाही.  पण कोकणस्थ या पुस्तकात प्रज्ञा ताईंनी गावी घर बांधून कॉंक्रिटच जंगल सोडून आपल्या मातीत राहण्याचा निर्धार केला.  हे पुस्तक वाचताना प्रज्ञा ताईंच्या नजरेतून आपण कोंकणच नवं रूप पाहतोय इतके आपण या पुस्तकात गुंतून जातो.  प्रत्येक प्रसंग आपण डोळ्याने पाहतोय इतक्या उत्तम शब्दात प्रज्ञा ताईंनी तो डोळ्यासमोर उभा केलाय.  ताईंच्या गीताई बंगल्याचा, त्याच्या आजूबाजूच्या वाडीचा, घरामागच्या ओहोळाचा, तिथे उपस्थित माणसांचा, निसर्गाचा सगळ्याच गोष्टींचा आपण एक भाग होतो.  स्वतःचा व्यवसाय सांभाळून गावाकडची ओढ त्यांनी कायम ठेवली आणि त्यामुळेच त्यांचं स्वप्न त्यांना जगता आलं.  गावाकडच्या बऱ्याच विषयांना त्यांनी मार्मिक पद्धतीने हात घातला आणि एक वेगळा दृष्टिकोन वाचकांसमोर उभा करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी

नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी "बेटा, इंसान पहले जानवर था...कुछ लोग जानवर से इंसान हुवे और कुछ लोग जानवर ही रह गये", क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीज मधला हा एक डायलॉग...पण "नाझी नरसंहार" हे पुस्तक वाचताना तो तंतोतंत जुळतो.  माणूस जेव्हा त्याची नैतिक मानसिकता हरवून बसतो तेव्हा तो राक्षसी कृत्य करत कोणत्या पातळीवर येऊ शकतो हे हिटलरच्या म्हणजेच नाझींच्या कृत्यातून जगासमोर आलं.  पहिल्या महायुद्धात हरल्यानंतर ज्यूंचा दु:स्वास करणाऱ्या हिटलरने जर्मनीची सत्ता हाती घेतली आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले.   फक्त ज्यू लोकाना मारण्यासाठी आउशवित्झ या जर्मनीने जिंकलेल्या पोलंडच्या भागात कत्तलखाना उभारण्यात आला.  युरोपातल्या जवळपास ६० लाख ज्यू लोकांना शोधून अगदी जनावरापेक्षाही वाईट अवस्थेत रेल्वेगाडीतून आउशवित्झ या ठिकाणी आणले जायचे आणि गॅस चेंबरमध्ये सगळ्यांना ग्रुप्स मध्ये कोंबून  त्यांच्यावर अँसिड टाकून मारले जायचे.  यामध्ये महिला, लहान मुले, वयस्कर असा भेदभाव केला गेला नाही.  जसे प्राण्यांवर औषध चाचणीचे प्रयोग केले जातात तसेच प्रयोग ज्यू लोकांवर केले गेले आणि त्य...

इंडस्ट्री 4.0 ते 5.0

  इंडस्ट्री 4.0 ते 5.0 – तंत्रज्ञानाचा अद्भुत प्रवास (लेखक: अच्युत गोडबोले) आपल्या आजूबाजूला तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन, 5G अशा अनेक संकल्पना गेल्या काही वर्षांत सर्वत्र ऐकायला मिळतात. पण या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आपल्या जीवनावर, व्यवसायावर आणि समाजावर काय परिणाम होतो? भविष्यात या गोष्टी कोणत्या रूपात दिसतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोप्या, थेट आणि सखोल पद्धतीने करून देणारे अच्युत गोडबोले सरांचे पुस्तक म्हणजे “इंडस्ट्री 4.0 ते 5.0”. एका नॉन टेक्नोसॅव्ही माणसाला सुद्धा सहज समजेल इतक्या सोप्या आणि रंजक भाषेत हे लिहीलं गेलंय.  इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमके काय, त्याचा इतिहास आणि संकल्पना, AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ChatGPT, तसेच AR/VR, IIoT, ब्लॉकचेन, 5G, 3D–4D प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा परिचय, तंत्रज्ञानाचा केवळ औद्योगिक वापर न मांडता त्यामागील मानवी दृष्टीकोन आणि सामाजिक बदल, भविष्यातील इंडस्ट्री 5.0 यावर प्रकाश ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक केवळ ...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...