अ टायटन स्टोरी
"जब हम फेल्युअर को सेलिब्रेट करते है तब हम अपनी गलती को एक्सेप्ट करते है, मूव्ह व करना आसान हो जाता है, और ग्रो करना उससे भी आसान"
कधी अशा काही कलाकृती बनतात ज्या तुम्हाला भारावून सोडतात आणि नव्याने विचार करायला भाग पाडतात त्यातलीच एक "अ टायटन स्टोरी" वेबसिरीज. कौतुक करायला शब्द कमी पडावेत इतकी अप्रतिम. स्टोरीटेलिंग, सगळ्यांचा अभिनय, म्युजीक सगळंच जबरदस्त! त्यात ती रिअल लाईफ स्टोरी आहे हे माहित असताना ही सिरीज बघण्याचा अनुभव वेगळा आहे. या सिरीज मधून मी बोध घेतलेल्या काही गोष्टी.
१. स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा.
टाटा प्रेसला प्रॉफिट मध्ये आणण्याची जबाबदारी असताना, भारतात स्वतःच्या बनावटीचे घड्याळ नाही आणि बाहेरच्या देशातली घड्याळे इकडे स्मगलिंगने आणून विकली जातात याचा अंदाज आल्यावर देसाईजीनी भारतीय बनावटीचे बॅटरीवर चालणारे (क्वार्ट्झ) घड्याळ बनवण्याचा विचार केला. त्यांच्या या विचारावर बऱ्याच जणांनी अविश्वास दाखवला आणि ते किती अशक्य आहे हे पण पटवून देण्याचा विचार केला पण ते त्यांच्या व्हिजनवर ठाम राहिले. टायटन शेवटी ब्रँड बनला.
२. तुमच्या कामाला हेतूची जोड हवी
देसाईंजीनी जेव्हा त्यांचा भारतीय बनावटीचे घड्याळ करण्याचा विचार जे. आर. डी. टाटांसमोर मांडला तेव्हा सुरुवातीला त्यांनी रस दाखवला नाही. पण त्यांचा देसाईजींवर विश्वास होता म्हणूनच युरोप ट्रीपला असताना जे. आर. डी. नी स्विस वॉचमेकर आंद्रे जेऊबा यांची भेट घेऊन भारतात घड्याळ बनवण्यासाठी कॉलॅबोरेशनचा प्रस्ताव मांडला तेव्हा भारतात ते टॅलेंट नाही म्हणून अपमानास्पद पद्धतीने तो प्रस्ताव फेटाळण्यात आला. म्हणूनच जे.आर.डी नी संपूर्ण भारतीय बनावटीचे घड्याळ बनवण्याचा प्रोजेक्ट करण्याची परवानगी देसाईंजीना दिली. स्मगल केलेली विदेशी घड्याळे वापरणे फक्त श्रीमंत वर्गाला शक्य होतं. त्यातही ती घड्याळं चावीवर चालायची. देसाईंजीनी क्वार्ट्झ (बॅटरीवर चालणारं) तंत्रज्ञानावर घड्याळ बनवण्याचा विचार केला. म्हणजेच कमी खर्चात सामान्यांच्या हातात वर्ल्ड क्लास घड्याळ यावं हा देसाईजींचा हेतू होता.
३. अडथळे आले म्हणून थांबून चालत नाही.
सुरुवातीला जे. आर. डीं. कडून परवानगी मिळाल्यावर देसाईंजीना ५ वर्षाचा अवधी देण्यात आला. यात सुरुवातीचे लायसन्स मिळवण्यापासून फॅक्टरी उभी करणे, लोकल टीमला ट्रेन करणे आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्क उभारणे हे सगळं करायचं होत. मुळात सुरुवातीपासूनच इतक्या अडचणी आल्या कि त्यांना प्रोडक्ट डिलिव्हर करायला वेळ लागला. पण त्यामुळे देसाईजी थांबले नाहीत. टीमच्या मदतीने त्यांनी प्रत्येक प्रशांवर उत्तर शोधलं.
४. प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळतच
सुरुवातीच्या काळापासून इतक्या अडचणी होत्या की हा प्रोजेक्ट पुढे जाईल कि नाही असा प्रश्न उभा राहायचा.
- सुरुवातीला बोर्ड मेंबर्सच अप्रूव्हल घेणं चॅलेंज होतं पण ते पार पडल्यावर लायसन्स घेणं हा मोठा प्रश्न होता कारण एम. आर. टी. पी. ऍक्ट मध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज त्यावेळी वेगळ्या नवीन कन्ज्युमर प्रोडक्ट मध्ये उतरू शकत नव्हत्या. त्यासाठीच टायटन हि वेगळी कंपनी उभारण्यात आली.
- क्वार्ट्झ टेक्नॉलॉजी कळत नाही म्हणून बऱ्याच बँकांनी लोन नाकारलं कारण टायटनला जरी टाटा ग्रुपचा सपोर्ट होता पण बँकांना मोठ्या रिस्क मध्ये पैसे गुंतवायचा नव्हता. पण कॅनरा बँकसमोर वेगळ्या पद्धतीने प्रोपोजल गेल्यावर तो प्रश्न मार्गी लागला.
- TIDCO बरोबर MOU केल्यावर फॅक्टरीसाठी जागा शोधण्यात बराच वेळ खर्ची घालण्यात आला. पण मनाजोगी जागा मिळेपर्यंत त्यांनी कुठेच तडजोड केली नाही.
- TIDCO बरोबर ठरल्याप्रमाणे फक्त लोकल लेबरच कामासाठी घ्यायचा होता. त्यासाठी गावागावातून माणसांना जमा करण्यात आले आणि त्यांना एका फ्रेंच वॉच मॅन्युफॅक्चरर कडून ट्रैनिंग देण्यात आले. भाषेपासून अडचण असताना सुद्धा योग्य पद्धतीने तो प्रश्न मार्गी लागला.
- पहिलं घड्याळ तयार झाल्यावर ते जे. आर. डी. ना गिफ्ट देण्यात आले पण त्यातल्या फॉल्टी पार्टमुळे ते वेळ व्यवस्थित दाखवत नव्हतं. या प्रकारामुळे एका पार्टीमध्ये आंद्रे जेऊबाकडून जे. आर. डींचा पुन्हा अपमान झाला. जे आर. डीनी त्यावेळी देसाईंना "Fail Again...Fail Better" चा मंत्र दिला. तो फॉल्टी पार्ट इंस्पेक्ट होऊन यावा यासाठी टीमच्या दोन मेंबर्सना जपान मध्ये पाठवलं गेलं. जी कंपनी तो रॉ पार्ट देत होती तिने इन्स्पेक्शनला नकार दिला पण त्यावरही मार्ग काढण्यात आला. तो चॅलेंज पुन्हा कधी टायटन मध्ये आला नाही.
- घड्याळ तयार झाल्यावर कोणीच डिस्ट्रिब्युटर क्वार्ट्झ टेकनॉलॉजी कळत नसल्यामुळे ते ठेवण्यास तयार नव्हता. म्हणून टायटनने स्वतःचे आउटलेट्स तयार केले. जे त्याकाळी दुसरे स्पर्धक करत नव्हते.
- टायटनचा सेल साऊथ मध्ये जास्त होत होता आणि नॉर्थ मध्ये कमी. याच्या मुळापर्यंत गेल्यावर प्रत्येक स्टेटच्या वेगळ्या टॅक्सेसमुळे हा घोळ होतोय त्यामुळे काही लोक साऊथमध्ये कमी किमतीत घेऊन ते नॉर्थमध्ये रेग्युलर प्राईजपेक्षा कमी किमतीत विकत असल्याने आउटलेट्सचा सेल कमी होत होता. त्यासाठी युनिफॉर्म कन्ज्युमर प्राईजचा (UCP) कन्सेप्ट राबवण्यात आला ज्यामुळे सगळ्या स्टेट्समध्ये सेम रेट ठेवण्यात आले. यामुळे स्मगलिंगलाही आळा बसला.
- भारतात टायटनचा सेल वाढल्यावर युरोपमध्ये जम बसवण्यासाठी ५० करोडची इन्व्हेस्टमेंट करण्याचा देसाजींनी प्रस्ताव मांडला जो कुणाला मान्य नव्हता कारण तेवढा टायटनचा ग्रॉस सेल पण नव्हता. पण तरीही देसाईजींच्या आग्रहामुळे तो मान्य करण्यात आला आणि युरोपातील वॉचमेकिंग कंपन्यांच्या मोनोपॉलीमुळे तो प्लॅन फसला आणि मोठं नुकसान झालं. कंपनीला टाळ लागेल हि परिस्थिती असताना एक नव्या प्रकारचं स्लिम घड्याळ आणून युरोपात स्वतःचा जम बसवला.
५. एक व्हिजनरी टीम इतिहास घडवू शकते.
देसाईजींसोबत असणारे आकाश, गौरव आणि मेघ आणि वेगवेगळे रोल उचलून धरले. स्पर्धक कंपनी असेल किंवा मार्केट असेल त्यांनी योग्य माणसं शोधली आणि टायटनला जोडली. प्रत्येक आलेल्या प्रश्नाला स्वतःच्या आयुष्यातला प्रश्न समजून नव्याने उत्तर शोधलं. आलेल्या फेल्युअरला मान्य करून पुढे काय याची मानसिकता कायम ठेवली.
६. कोई कॉन्टॅक्ट छोटा नही होता.
टायटनला बऱ्यापैकी सगळ्यांचं बँकांकडून लोन मिळत नव्हतं. टायटनची मार्केटिंग टीम मेंबर मेघा हिच्या घरी खाणावळीवर जेवण्यासाठी सुदर्शन धीर हे जे. जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये शिकलेले आर्टिस्ट यायचे. त्यांना मेघाने कधी तितका आदर दिला नव्हता. पण बँक लोनचा प्रश्न जेव्हा त्यांच्यासमोर आला तेव्हा त्यांचा भाऊ कॅनरा बँक चा जी. एम. निघाला. त्याच्यासमोर प्रोपोजल कसं द्यायचं इथपर्यंत त्यांनी तिला मार्गदर्शन केलं. त्यामुळेच टायटन ला लोन मिळून ते पुढे जाऊ शकले. नंतर याच सुदर्शनजीनी टायटनचे वॉचेस डिजाईन करण्याचे इंद्रधनुष्य उचलले.
७. आयुष्यात मेंटॉर असणं अत्यंत गरजेचं आहे
झरक्सीज देसाई हे जेव्हा जेव्हा कुठे अडले तेव्हा त्यांनी जे. आर. डी. टाटा यांचे मार्गदर्शन घेतले. यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे. आर. डींनी फक्त वेळोवेळी मार्गदर्शन दिल, योग्य मार्ग दाखवला, देसाईंजीना मोटिव्हेट केलं पण त्यांची लढाई त्यांनाच लढू दिली. थोडक्यात त्यांनी या प्रवासात कृष्णाची भूमिका निभावली आणि देसाजींनी अर्जुनाची.
८. तुमची सद्यस्थिती हे तुमचे फायनल डेस्टिनेशन नाही.
सुरुवातीला जे. आर. डी. नी स्विस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत कोलॅबरेशनचा प्रस्ताव मांडला तेव्हा तो अपमानास्पदरित्या फेटाळण्यात आला. त्यानंतर ही आंद्रे जेऊबा जेव्हा जेव्हा जे. आर. डी. ना भेटले त्यांनी जे. आर. डी. ना अपमानास्पद वागणूक दिली. टायटनला युरोपमध्ये एंट्री मिळू दिली नाही. पण पुढे जाऊन टायटनने तीच स्विस कंपनी स्वतःमध्ये सामील करून घेतली.
९. काही निर्णय योग्य वेळी घेतलेले चांगले.
मार्केटिंग हेड मेघा असतानासुद्धा नव्या स्ट्रॅटेजीसाठी ज्याने स्क्रॅचपासून एखादा इंडियन ब्रँड बिल्ड केला असेल असा मार्केटिंग हेड घ्यावा असा विचार देसाईंजीनी केला आणि मेघा दुखावली जाऊ शकते हे माहित असतानासुद्धा तो निर्णय अंमलात आणला. मेघा त्यावेळी तात्पुरती दुखावली गेली असेल तरी लॉन्ग टर्ममध्ये तो निर्णय योग्य ठरला. युरोप मार्केट मध्ये एंटर करण्याचा निर्णयही आकाशच्या पश्चात घेण्यात आला पण तो सुद्धा पुढे जाऊन योग्य ठरला. पण या प्रोसेसमध्ये आकाश दुखावला गेला.
यश / अपयश हे आपल्या मानण्यावर आहे हे पटवून देणारी एक उत्तम वेबसिरीज. नसरुद्दीन शहांना जे. आर. डींच्या रोलमध्ये बघणं म्हणजे ट्रीट आहे. नक्की बघा.
- सुबोध अनंत मेस्त्री

Comments
Post a Comment