Skip to main content

Posts

Showing posts from January, 2017

ट्राय ट्राय

-सुबोध अनंत मेस्त्री ========================================================================== नमस्कार, बऱ्याच दिवसांनी लेख घेऊन आलो आहे. सहज सरळच्या माध्यमातून मी आजूबाजूच्या घटनांचा अभ्यास करत असतो. ही सुद्धा अशीच एक साधी सरळ घटना. लहान मुलांना त्यांचे पालक प्रत्येक गोष्टीत कमी लेखत असतात किंवा त्याला एखादी गोष्ट जमणार नाही हे त्याच्या मनावर बिंबवत असतात आणि त्याने त्या मुलाचा आत्मविश्वास खालावत जातो. अशा बऱ्याच घटना मी लहानपणापासून अनुभवत आलोय आणि ते माझ्या मुलाच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही याची जमेल तितकी काळजी घेतो. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव अप्रत्यक्षपणे करून देणं व चांगल्या कामासाठी त्याची पाठ थोपटण हे पालकांचं कर्तव्य आहे. ============================================================== आज सकाळी नाश्त्याला ऑम्लेट खायचं म्हणून मी फ्रिजचा दरवाजा उघडला आणि अंड्यांचा कप्पा रिकामा? "आई...अंडी संपली का सगळी?", कालच 4-5 पहिली असल्याने मी जवळपास कुतूहलाने विचारलं.   "हो, तुझ्या पोरालाच लागतात सारखी.  सकाळ संध्याकाळ अंड्याची पोळी पाहिजे त्याला"