Skip to main content

आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व

 


आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व

संपूर्ण आयुष्याचे प्लॅनिंग जर आपल्याला एखाद्या पुस्तकाच्या सहाय्याने करता आलं तर? पुस्तक वाचता वाचताच आपल्या आयुष्याशी निगडित गोष्टी त्या पुस्तकातच भरता आल्या आणि त्यातून एक भन्नाट रिपोर्ट स्वतःसाठी तयार झाला तर त्याहून अधिक काय हवं? हेच साध्य करता येत आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व पुस्तक वाचताना.

पुस्तकाची सुरुवात स्वॉट एनालिसिस पासून होते ज्यात तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पाहता. स्वतःचे स्ट्रेंग्थ, विकनेस, ऑपॉर्च्युनीटीज आणि थ्रेट्स कसे शोधायचे हे उत्तम उदाहरणासकट सोपे करून दिले जाते.

त्यासोबतच SMART गोल सेटिंगमध्ये करिअर गोल, हेल्थ गोल, रिलेशनशिप गोल, फायनान्शियल गोल, सोशल गोल, ट्रॅव्हल गोल, लाइफस्टाइल गोलवर काम करवून घेतलं जातं. टाईम मॅनेजमेंट मध्ये इंपॉर्टन्ट कामे शोधणे आणि त्यासाठी ३-३-३ पद्धती, वाईट सवयी कशा सोडाव्यात आणि नकारात्मक विचार कसे खोडून काढावेत, सबकॉन्शियस माईड ची ताकद आणि आपली बिलीफ सिस्टम कशी बदलावी, हेल्थ मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, फायनांशिअल फ्रीडम अशा आयुष्याशी निगडित विविध अंगांवर काम केलं जातं.

महत्वाचे म्हणजे यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला निरनिराळे टूल्स दिले जातात किंवा माहिती भरून घेतली जाते ज्यामुळे शेवटी तुमच्याकडे एक व्यवस्थित आयुष्याच्या प्लानिंग बद्दलचा रिपोर्ट तयार होतो. आय लिड ट्रेनिंग्स गेली कित्येक वर्ष लोकांच्या आयुष्यात ट्रेनिंग आणि पर्सनल काउन्सेलिंगच्या माध्यमातून बदल घडवत आली आहे. आणि हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आजपर्यंतच्या अनुभवाचं सार आहे.

प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हव असं पुस्तक.

- सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...