Skip to main content

Posts

Showing posts from October, 2018

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

माणुसकीचा "चालक"

मोमो खाऊन आम्ही तिघे बाहेर पडलो आणि समोरच चौकात रिक्षा उभ्या होत्या.  काळोख पडला होता.  थोडावेळ पुन्हा एकदा आज झालेली डी. सी. पी. साहेबांसोबतची मीटिंग आणि पुढे होणाऱ्या कामांची उजळणी झाली.  तशी ती आज खूप वेळा झाली होती.  अतिष दादाने मला आणि दादाला रिक्षा बघून दिली आणि तो त्याच्या बाईकच्या दिशेने निघाला.  वायले नगर ते कल्याण स्टेशनपर्यंत रिक्षा शेअरिंगवर मिळाली. माझ्या आणि दादाच्या बरच वेळ गप्पा सुरू होत्या.  अंतरही खूप होत आणि ट्रॅफिकही. इतक्यात माझं लक्ष ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर गेलं.  "जेष्ठ नागरिक व वयस्कर यांना ५०% सवलत.  कल्याण हद्दीत दवाखाण्यासाठी मोफत सेवा."  हे वाचून मला कौतुक वाटलं.  मी दादाला ती स्टेटमेंट दाखवली.  रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात ती स्पष्ट वाचता येत होती.  "चांगलं काम करताय तुम्ही.  मस्त वाटलं बघून", दादा कुणाचही कौतुक अगदी लगेच करतोच. "काय साहेब?", रिक्षावाल्याने त्याच्या डाव्या बाजूच्या मोठ्या आरशातुन दादाला विचारलं. "हे वाचलं मागे.", दादानेही सीटकडे बोट दाखवत आरशातच बघून सांगितलं. "थँक यु&qu