Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

दि नाईट बिफोर लॉकडाऊन

"सुबु, पी. एम्. ने एकवीस दिवस लॉकडाऊन अनाऊन्स केला आहे.  आज रात्री १२ पासून सुरु होणार", दादा न्यूज वाचून कठड्यावरून उठून उभाच राहिला.  मी गाडीवर पाणी मारता मारता थांबलो.  काही क्षण आम्ही सगळे एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो.  पडवीत चालू असणाऱ्या गप्पा अचानक थांबल्या. आम्ही १८ तारखेलाच पालखीच्या निमित्ताने गावाला गेलो होतो आणि २२ ला सकाळी परत निघण्याचा प्लॅन होता.  आम्ही निघालो त्यावेळी कोरोनाबद्दल जास्त काही केसेस नव्हत्या.   पालखीला पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र चाललो होतो.  काकांच्या गावाला पालखी करून, आत्यांकडे आणि मग मामाकडे अशी काही गावं फिरून मुंबईला परत येण्याच ठरलं होतं.  आमच्या वाडीत पालखीचा कार्यक्रम व्यवस्थित झाला.  गावातल्या अजून बऱ्याच वाड्या पालखी घेणार होती.  म्हणजे अजून सातेक दिवस पालखी फिरणार होती.  आमच्या इथून पालखी गेल्यावर ठरल्याप्रमाणे आम्ही आत्येच्या गावाला गेलो.  शुक्रवारी पंतप्रधानांनी २२ तारखेचा कर्फ्यु अनाऊन्स केला आणि आमचा परतण्याचा प्लॅन एक दिवस पोस्पॉंन झाला.  शनिवारी मामाकडे आल्यानंतर सतत न्यूज चॅनेल चालू होतं.  "अरे ते उद्या वायू सो