Skip to main content

सुंदर पिचाई - गूगलचं भविष्य

 



“सुंदर पिचाई - गूगलचं भविष्य”
हे पुस्तक केवळ सुंदर पिचाई यांच चरित्र नाही, तर एका सामान्य मध्यमवर्गीय मुलाचा जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान कंपनीचा CEO होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे. सुंदर पिचईबद्दल माहिती देतानाच हे पुस्तक गुगलच्या कार्यपद्धतीवर जास्त प्रकाश टाकतं.
पुस्तकाची सुरुवात चेन्नईतील त्यांच्या साध्या बालपणापासून होते. मर्यादित साधनं, अभ्यासाची आवड, विलक्षण स्मरणशक्ती आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सतत पुढे जात राहिले. IIT, Stanford आणि Wharton पर्यंतचा त्यांचा प्रवास चॅलेंजेस, हार्डवर्क आणि योग्य डिसीजन्सने भरलेला आहे.
आय आय टी खडकपूरमध्ये शिकलेल्या सुंदर पिचाई यांनी १९९३ मध्ये स्टँडफोर्डची स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेला आले तेव्हा त्यांच्याकडे सॅक घ्यायलाही पैसे नव्हते. २००४ साली "हेड ऑफ प्रॉडक्ट मॅनेजमेंट एंड डेव्हलपमेंट" या पोस्टसाठी गुगल मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी Google Toolbar, Chrome, Chrome OS, Gmail, Google Drive, Android आणि इतर अनेक महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये केलेली लीडरशिप पुस्तकात प्रभावीपणे मांडली आहे. विशेषतः गुगल क्रोम हा प्रकल्प सुरुवातीला किती धाडसी निर्णय होता आणि स्वतः गुगल चा त्यावेळीचा सी. ई. ओ. श्मिडट त्याच्या विरोधात असताना योग्य वेळ बघून श्मिडट आपल्या बाजूने वळवून क्रोम प्रत्यक्षात आणलं आणि त्याने गुगलचं भविष्य कसं बदललं, हे यात उत्तम मांडलं आहे. मुळात एवढी मोठी कंपनी असूनसुद्धा तिला किती मोठ्या जागतिक स्पर्धेला सामोरे जावे लागते आणि कित्येत चॅलेंजेस पार करावे लागतात हे या पुस्तकातून स्पष्ट होतं. यशाच्या शिखरावर पोहचणं जितकं कठीण तितकच कठीण तिथे टिकून राहणं आहे.
पुस्तकातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुंदर पिचाई यांची लीडरशिप. ते कधीही आक्रमक किंवा क्रेडिट घेणारे लीडर म्हणून दिसत नाहीत. शांतपणे ऐकणं, प्रत्येकाच्या मताचा आदर करणं, योग्य प्रश्न विचारणं आणि टीमला पुढे आणणं, ही त्यांची खरी ताकद आहे. आजच्या मॅनेजर्स आणि उद्योजकांसाठी ही मोठी शिकवण आहे.
पुस्तकात गुगल च्या संस्कृतीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. नवनवीन आयडीआ, प्रयोग करण्याचं फ्रिडम, अपयशातून शिकण्याची तयारी आणि लाँग टर्म विचार या गोष्टींमुळे गुगल ने जगभरात वेगळं स्थान निर्माण केलं. टेक्नॉलॉजीचा उपयोग लोकांचं जीवन अधिक सोपं करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे अनेक उदाहरणांमधून स्पष्ट होतं. मुळात कितीतरी उत्पादने लाखो डॉलर्स खर्च करून फेल गेल्यावरही टीमच्या एफर्ट्सच कौतुक गुगल मध्ये होतं.
Android, Artificial Intelligence, Cloud Computing आणि इंटरनेटचं भविष्यातील महत्त्व याबद्दलही पुस्तकात चर्चा आहे. तंत्रज्ञान फक्त बिझनेससाठी नाही, तर जगभरातील अब्जावधी लोकांपर्यंत माहिती आणि संधी पोहोचवण्याचं साधन आहे, हा सुंदर पिचाई यांचा दृष्टिकोन प्रभावी वाटतो.
मला या पुस्तकातून जास्त काय आवडलं असेल तर नम्रता आणि यश एकत्र नांदू शकतात, लीडरशिप म्हणजे फक्त आदेश देणं नाही तर लोकांना एम्पॉवर करणं, योग्य डिसीजन घेण्यासाठी आधी योग्य प्रश्न विचारावे लागतात, आपण सतत शिकत राहिलो पाहिजे हीच दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली आहे, मोठ्या यशामागे अनेक वर्षांची कन्सिस्टंट मेहनत असते, तंत्रज्ञानाचं अंतिम उद्दिष्ट माणसाचं जीवन अधिक चांगलं करणं हेच असलं पाहिजे.
हे पुस्तक विशेषतः बिझनेसमन, मॅनेजर्स, स्टूडेंट्स किंवा लीडर्स होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच वाचावं. हे पुस्तक तुम्हाला फक्त सुंदर पिचाई यांची ओळख करून देत नाही, तर मोठा विचार करण्याची, शांतपणे काम करण्याची आणि सतत स्वतःला डेव्हलप करण्याची प्रेरणा देतं.
“मोठं पद मिळवणं हे यश नाही. त्या पदावर राहून अब्जावधी लोकांचं जीवन अधिक चांगलं करणं, हेच खरं नेतृत्व आहे.”

- सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...