कोकणस्थ - मातीची ओढ
आपल्यातल्या बऱ्याच लोकांना शहरातील धावपळीचं आयुष्य आवडत नाही. गावाकडे निवांत रहावस वाटतं. पण इथे सगळ्याच गोष्टींची पाळंमुळं अशी रोवलेली असतात की इथून सगळं बस्तान गावाला हलवू शकत नाही. पण कोकणस्थ या पुस्तकात प्रज्ञा ताईंनी गावी घर बांधून कॉंक्रिटच जंगल सोडून आपल्या मातीत राहण्याचा निर्धार केला. हे पुस्तक वाचताना प्रज्ञा ताईंच्या नजरेतून आपण कोंकणच नवं रूप पाहतोय इतके आपण या पुस्तकात गुंतून जातो. प्रत्येक प्रसंग आपण डोळ्याने पाहतोय इतक्या उत्तम शब्दात प्रज्ञा ताईंनी तो डोळ्यासमोर उभा केलाय. ताईंच्या गीताई बंगल्याचा, त्याच्या आजूबाजूच्या वाडीचा, घरामागच्या ओहोळाचा, तिथे उपस्थित माणसांचा, निसर्गाचा सगळ्याच गोष्टींचा आपण एक भाग होतो. स्वतःचा व्यवसाय सांभाळून गावाकडची ओढ त्यांनी कायम ठेवली आणि त्यामुळेच त्यांचं स्वप्न त्यांना जगता आलं. गावाकडच्या बऱ्याच विषयांना त्यांनी मार्मिक पद्धतीने हात घातला आणि एक वेगळा दृष्टिकोन वाचकांसमोर उभा करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
कोकणाची ओढ असणाऱ्या सगळ्यांनीच वाचण्यासारखं हे पुस्तक आहे. मला हे पुस्तक भेटस्वरूपी देणाऱ्या शुभांगी तिरोडकर ताई यांचे खूप आभार
Comments
Post a Comment