Skip to main content

Posts

Showing posts from February, 2019

उधार

"पप्पा, त्या डेअरीवाल्याचे दहा रुपये उधार राहिलेत. मी दूध आणलेलं ना मागे त्याचे", बाबांनी बिल्डिंगखालून अंडी आणायला पैसे दिले होते, त्यात दहाची नोट पाहून सार्थकला ते आठवलं असेल. "बाबू लेट होतंय...जा आधी खाली", बाबांचा मागून आवाज ऐकून तो तिथून लगेच निसटला. मीसुद्धा फारसं लक्ष दिलं नाही. दुपारी शाळेची तयारी करताना त्याला पुन्हा एकदा आठवण झाली. "माझ्याकडे तेव्हा ४० रुपये होते. मी त्याला बोललो आप उधार दो मै आपको लाके देता हू आणि विसरलो", तो शर्ट घालता घालता मला सांगत होता. "उधार का घेतले तू? घरी येऊन परत घ्यायचे दहा रुपये आणि मग जायचं", उगाच उधारी वैगेरे प्रकार या वयात कसे मुलांना कळतात या भावनेने त्रासून बोललो. "अरे मी त्याला ४० रुपये दिले होते दूध आणायला मग पन्नास कसे जातील?", बाबांचा किचनमधून आवाज आला. "अहो पप्पा, मी म्हैशीच दूध आणलं. गायीचं नव्हतं. म्हणून पन्नास गेले", त्याची तयारी चालूच होती. "कुणाकडून उधार घ्यायचं नाही. पैसे कमी पडले तर घरी येऊन घेऊन जायचं. डेअरी एवढी लांब आहे का? शाळेत जाताना बघूया",

सही "दुबई"

माझी दुबई ट्रिप महेश चव्हाण आणि मनोज माळवे या माझ्या दोन मित्रांमुळे घडली. मागच्या वर्षी मलेशिया सिंगापूर केल्यानंतर यावर्षी काहितरी नवं शिकायला मिळेल हा विचार होताच पण त्याचबरोबर मला ओळखणारे सोडून महाराष्ट्रातले २०-२२ उद्योजक आहेत हे ऐकल्यावर मी जास्त आढेवेढे घेतले नाहीत.  दुबई प्रवास एक लर्निंग एक्सपिरियन्स होणार यात शंका नव्हती आणि तसंच झालं. दुबईचं नाव खरंतर (दु बई - दो भाई) असं आहे.  सुरुवातीला बिजनेस पार्टनर म्हणून एक भारतीय व्यक्ती व एक इराणी व्यक्ती असे दोघेजण पुढे आले होते.  त्यावरुन हे नाव ठेवलं गेलं.  दुबई खरं तर एक देश नाही तर एक राज्य आहे.  या देशाचं नाव युनायटेड अरब एमिरेट्स (UAE).  एमिरेट्सचा अर्थ होतो श्रीमंत असे बरेच राजे.  म्हणजेच हे श्रीमंत अशा अरब राजांचं राष्ट्र आहे आणि ते खरंसुद्धा आहे.  इथे एकूण सात राज्य आहेत ज्यांना एमिरेट्स म्हटलं जातं.  त्यातलं एक दुबई जे कमर्शिअल स्टेट आहे.  अबू धाबी हि या देशाची राजधानी आहे व पूर्ण तेल याच राज्यातून काढलं जातं. जर आज अबू धाबीमध्ये तेल सापडणं बंद झालं तरीही पुढची १०० वर्ष पुरु शकेल एवढा तेलाचा साठा त्यांच्याकडे आहे