Skip to main content

Posts

Showing posts from 2026

सुंदर पिचाई - गूगलचं भविष्य

  “सुंदर पिचाई - गूगलचं भविष्य” हे पुस्तक केवळ सुंदर पिचाई यांच चरित्र नाही, तर एका सामान्य मध्यमवर्गीय मुलाचा जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान कंपनीचा CEO होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे. सुंदर पिचईबद्दल माहिती देतानाच हे पुस्तक गुगलच्या कार्यपद्धतीवर जास्त प्रकाश टाकतं. पुस्तकाची सुरुवात चेन्नईतील त्यांच्या साध्या बालपणापासून होते. मर्यादित साधनं, अभ्यासाची आवड, विलक्षण स्मरणशक्ती आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सतत पुढे जात राहिले. IIT, Stanford आणि Wharton पर्यंतचा त्यांचा प्रवास चॅलेंजेस, हार्डवर्क आणि योग्य डिसीजन्सने भरलेला आहे. आय आय टी खडकपूरमध्ये शिकलेल्या सुंदर पिचाई यांनी १९९३ मध्ये स्टँडफोर्डची स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेला आले तेव्हा त्यांच्याकडे सॅक घ्यायलाही पैसे नव्हते. २००४ साली "हेड ऑफ प्रॉडक्ट मॅनेजमेंट एंड डेव्हलपमेंट" या पोस्टसाठी गुगल मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी Google Toolbar, Chrome, Chrome OS, Gmail, Google Drive, Android आणि इतर अनेक महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये केलेली लीडरशिप पुस्तकात प्रभावीपणे मांडली आहे. व...

प्रतिपश्चंद्र : इतिहास, रहस्य आणि कल्पनाशक्तीचा अद्वितीय संगम

  प्रतिपश्चंद्र : इतिहास, रहस्य आणि कल्पनाशक्तीचा अद्वितीय संगम मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबऱ्यांची समृद्ध परंपरा आहे. मात्र इतिहास आणि रहस्य यांचा प्रभावी मेळ घालणाऱ्या कादंबऱ्या तुलनेने कमी आढळतात. डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची “प्रतिपश्चंद्र” ही कादंबरी या दृष्टीने वेगळी ठरते. छत्रपती शिवाजी महाराज, बहिर्जी नाईक, राजमुद्रा आणि शतकानुशतके लपलेले एक गूढ रहस्य याभोवती विणलेली ही कथा वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कादंबरीची सुरुवात एका आधुनिक गुन्हेगारी प्रकरणापासून होते. एका मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरवर न्यायाधीशांच्या खुनाचा आरोप होतो आणि त्यानंतर सुरू होतो रहस्य, इतिहास आणि साहसाचा थरारक प्रवास. वर्तमान आणि शिवकाल यांना जोडणारी कथानकाची मांडणी ही या कादंबरीची सर्वात मोठी ताकद आहे. लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना ऐतिहासिक घटनांना कल्पनाशक्तीची प्रभावी जोड दिली आहे. बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर व्यवस्थेचा संदर्भ, राजमुद्रेशी निगडित रहस्य आणि त्याभोवती उभे राहणारे प्रश्न वाचकाची उत्कंठा कायम ठेवतात. इतिहासाची पार्श्वभूमी असूनही कथा आधुनिक...

A Titan Story

अ टायटन स्टोरी "जब हम फेल्युअर को सेलिब्रेट करते है तब हम अपनी गलती को एक्सेप्ट करते है, मूव्ह व करना आसान हो जाता है, और ग्रो करना उससे भी आसान" कधी अशा काही कलाकृती बनतात ज्या तुम्हाला भारावून सोडतात आणि नव्याने विचार करायला भाग पाडतात त्यातलीच एक "अ टायटन स्टोरी" वेबसिरीज.  कौतुक करायला शब्द कमी पडावेत इतकी अप्रतिम. स्टोरीटेलिंग, सगळ्यांचा अभिनय, म्युजीक सगळंच जबरदस्त! त्यात ती रिअल लाईफ स्टोरी आहे हे माहित असताना ही सिरीज बघण्याचा अनुभव वेगळा आहे.  या सिरीज मधून मी बोध घेतलेल्या काही गोष्टी.  १. स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. टाटा प्रेसला प्रॉफिट मध्ये आणण्याची जबाबदारी असताना, भारतात स्वतःच्या बनावटीचे घड्याळ नाही आणि बाहेरच्या देशातली घड्याळे इकडे स्मगलिंगने आणून विकली जातात याचा अंदाज आल्यावर देसाईजीनी भारतीय बनावटीचे बॅटरीवर चालणारे (क्वार्ट्झ) घड्याळ बनवण्याचा विचार केला.  त्यांच्या या विचारावर बऱ्याच जणांनी अविश्वास दाखवला आणि ते किती अशक्य आहे हे पण पटवून देण्याचा विचार केला पण ते त्यांच्या व्हिजनवर ठाम राहिले.  टायटन शेवटी ब्रँड बनला.  २. तु...

आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व

  आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व संपूर्ण आयुष्याचे प्लॅनिंग जर आपल्याला एखाद्या पुस्तकाच्या सहाय्याने करता आलं तर? पुस्तक वाचता वाचताच आपल्या आयुष्याशी निगडित गोष्टी त्या पुस्तकातच भरता आल्या आणि त्यातून एक भन्नाट रिपोर्ट स्वतःसाठी तयार झाला तर त्याहून अधिक काय हवं? हेच साध्य करता येत आय लिड माय लाइफ - माझे आयुष्य माझे नेतृत्व पुस्तक वाचताना. पुस्तकाची सुरुवात स्वॉट एनालिसिस पासून होते ज्यात तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पाहता. स्वतःचे स्ट्रेंग्थ, विकनेस, ऑपॉर्च्युनीटीज आणि थ्रेट्स कसे शोधायचे हे उत्तम उदाहरणासकट सोपे करून दिले जाते. त्यासोबतच SMART गोल सेटिंगमध्ये करिअर गोल, हेल्थ गोल, रिलेशनशिप गोल, फायनान्शियल गोल, सोशल गोल, ट्रॅव्हल गोल, लाइफस्टाइल गोलवर काम करवून घेतलं जातं. टाईम मॅनेजमेंट मध्ये इंपॉर्टन्ट कामे शोधणे आणि त्यासाठी ३-३-३ पद्धती, वाईट सवयी कशा सोडाव्यात आणि नकारात्मक विचार कसे खोडून काढावेत, सबकॉन्शियस माईड ची ताकद आणि आपली बिलीफ सिस्टम कशी बदलावी, हेल्थ मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, फायनांशिअल फ्रीडम अशा आयुष्याशी निगडित विविध अंगांवर काम केलं जातं. ...

हाऊ टू थिंक लाईक स्टीव्ह जॉब्स - डॅनियल स्मिथ

  स्टीव्ह जॉब्स हे केवळ यशस्वी बिझनेसमन नव्हते, तर जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही विलक्षण होती. "How to Think Like Steve Jobs" या पुस्तकात डॅनियल स्मिथ यांनी स्टिव्ह जॉब्सला मोजक्या पण इफेक्टिव्ह पद्धतीने लोकांसमोर आणलं आहे. हे पुस्तक जॉब्सच्या आयुष्यातील अनुभव, निर्णय, अपयश आणि यश यांमधून शिकण्यासारखे धडे समोर आणते. जॉब्स यांचा विश्वास होता की खऱ्या अर्थाने नावीन्य हे टेकनॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटी यांच्या कॉम्बिनेशनमधून जन्माला येते. त्यांनी नेहमीच वेगळा विचार करण्यास, मोठी स्वप्ने पाहण्यास आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्यास प्रोत्साहन दिले. ग्राहकांना काय हवे आहे हे विचारण्यापेक्षा त्यांना भविष्यात काय आवश्यक वाटेल याचा अंदाज घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवत होती. या पुस्तकात एक मस्त वाक्य आहे, "अलेक्झांडर ग्रॅहम बेलनं टेलिफोनचा शोध लावण्याआधी मार्केट रिसर्च केला होता ?" जो मुख्य मुद्दा या पुस्तकात मांडला आहे तो म्हणजे यश हे केवळ टॅलेंट किंवा लक मुळे मिळत नाही. क्लिअर व्हिजन, डेडिकेटेड एफर्टस, डिटेलिंग आणि आपल्या कामाबद्दल असलेली क्युरिऑसिटी ...

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण

  श्रीमानयोगी वाचण्यापूर्वी मी कै. बाबासाहेब पुरंदरे यांची राजे शिवछत्रपती वाचली होती.  मुळात सिरियल्स मधून किंवा सिनेमामधून महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडला जातोच.  बऱ्याचशा गोष्टी ज्या ऐकल्या किंवा वाचल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने श्रीमानयोगी मध्ये मांडल्या आहेत जसं कि महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली असं वाचलं होतं पण या कादंबरीमध्ये रोहिडेश्वरावर सांगितली आहे.  किंवा अफझलखान स्वारीच्या वेळी सईबाईंचे निधन झाले तेव्हा महाराज त्यांच्यासोबत नव्हते हे वाचलं होतं पण यात महाराज सईबाईंसोबत आहेत हे मांडलं आहे.  थोडं गोंधळून मी विनोद दादाला हा प्रश्न विचारला तेव्हा इतिहासकार आणि कादंबरीकार यात फरक असतो हे समजलं.  कादंबरीकार गोष्ट लिहिताना बरीच लिबर्टी घेतात त्यामुळे ती गोष्टरूपाने वाचली गेली पाहिजे याचा उलगडा झाला.  त्या दृष्टिकोनातून वाचल्यावर हे पुस्तक दमदारच आहे.  एक कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निभावत असलेली प्रत्येक भूमिका यात चोख मांडली आहे.   स्वराज्याचं तोरण उभारत असताना महाराजांना घरापासून बऱ्याच वेळा लांब राह...