Skip to main content

Posts

श्यामची "आई"

  आईच्या घटनेनंतर काही दिवस पुस्तक वाचता आलं नाही आणि जेव्हा पुस्तक वाचण्याचा विचार केला तेव्हा नेमक्या "श्यामची आई" याच पुस्तकावर कपाटात पहिल्यांदा लक्ष गेलं. पुस्तक चांगलं आहे याबाबतीत शंका नव्हती पण इतकी वर्ष कपाटात असून पुस्तकांच्या गर्दीत नजरेत आलं नाही. जी गोष्ट सतत विचारात तीच नजरेसमोर पटकन येते असंच काहीस झालं. आईच्या आठवणीत असतानाच हे पुस्तक समोर आलं आणि पूर्ण वाचून काढलं.  सानेगुरुजींचे बाबा गावात खोत होते त्यामुळे घरात प्रचंड श्रीमंती. भावाभावांमधल्या प्रॉपर्टीमधल्या वादातून त्यांना घर सोडावं लागलं आणि बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना सानेगुरुजींच्या आई बाबांना करावा लागला. आयुष्यातली काही वर्ष वैभवात घालवून पुन्हा अगदी शून्यावर येणं म्हणजे कसोटीच होती. अपमानाच्या कित्येक प्रसंगातून पूर्ण कुटुंबाला जावं लागलं. पोटची दोन मुले त्यांना आयुष्याच्या प्रवासात गमवावी लागली. कित्येक अडचणी समोर आल्या पण त्यांनी आपली तत्वे सोडली नाहीत. मुलांवर संस्कार करताना त्यांनी कोणतीच तडजोड केली नाही.  पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी स्वतःच्या आयुष्यातल्या घटना शोधत होतो आण
Recent posts

“ आई" सोडून जाताना

वयाची पस्तिशी ओलांडली....या पूर्ण प्रवासात दिवसातून बराच वेळ समोर दिसणारी माझी आई त्या सोफ्यावर नाही हे सहन होत नाही...वॉश बेसिन मध्ये हात धुताना समोरच्या आरशातून ती सोफ्यावर दिसायची...तसे भासही गेल्या 3-4 दिवसात होऊन गेले...पहिल्या रात्री तर सतत सोफ्यावर हात जात होता. हे सगळं असं पटापट घडून गेलं...मागच्याच आठवड्यात मी घराची साफसफाई करायची म्हणून अट्टाहासाने घरातलं सगळं सामान 4-5 दिवस सलग आवरत बसलो होतो.  त्यात कितीतरी जुन्या अनावश्यक गोष्टी निघाल्या.  गेली कित्येक वर्ष मी हे सामान काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या बाहेर काढायचं म्हटल्यावर "आता तुला आमची पण अडचण व्हायला लागेल, आम्हालाही बाहेर काढशील", असे इमोशनल अत्याचार करून माझी ती नेहमी अडवणूक करायची.  जुन्या आठवणीच सामान म्हणावं तर तसंही नाही.  पण काहीसुद्धा उरलंसुरलेलं कधीतरी भविष्यात उपयोगी होईल म्हणून ठेवून दिलेलं.  बाहेरून आलेला बॉक्स टाकायचा नाही की पिशवी टाकायची नाही.  अगदी पूर्वीपासून काटकसरीत आयुष्य काढलेलं.  बाटलीची झाकण जमवून त्यावर चाळीमध्ये असताना ती खारी टोस्ट घ्यायची.  तिची तीच सवय तिने अजूनपर्यंत ठेवली

मृत्युंजय

  काही वर्षांपूर्वी रणजित देसाईंच "राधेय" वाचलं होतं.  महाभारतातल्या कर्णाची बाजू त्यात प्रकर्षाने मांडली होती.  त्यावेळीच कुणीतरी शिवाजी सावंत यांचं "मृत्युंजय" वाच असं सुचवलं.  आमच्या सुनयना गायकवाड ताईने राबवलेल्या पुस्तक प्रदर्शनात मी ते दोनेक वर्षांपूर्वी घेतलं आणि पुस्तकाची लहान अक्षरात छापलेली ७२७ पाने बघून ते "एवढं कधी वाचून व्हायचं?" म्हणून कायम पुढे जात राहिलं.  पण दर दिवशी पाच असे २३९ धडे वाचायचे हा निर्धार करून गेल्या दीडेक महिन्यात पुस्तक पूर्ण वाचून काढलं.   प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.  जे तुम्हाला दिसतं ते खरं असतंच असं नाही.  असंच काहीसं या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला कर्णाबद्दल वाचताना वाटतं.  पांडवांची अयोग्य बाजू बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने दिसून येते.  महाभारत म्हटलं कि सहसा पाच पांडव, श्रीकृष्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, द्रौपदी आणि शकुनी मामा हेच डोळ्यासमोर येतात.  कर्णाची त्यातली महत्वाची भूमिका ही या दोन्ही पुस्तकांमुळे समोर येते.   सूर्याच्या दिव्य शक्तीतून जन्मलेला कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय, पण कौमार्य अवस्थेत बा

हॅपी बर्थडे चिऊ

  "चिऊ तू मला एवढा का आवडतोस?", या माझ्या प्रश्नावर "कारण तू माझा गोबू आहेस" हे तुझं मला मिठी मारून लाडात येणारं उत्तर मला कायम आवडतं. पप्पाचा सुबु आणि सुबुचा गोबू असा हा दहा वर्षाचा प्रवास. दहा वर्ष! तब्बल दहा वर्ष आपला प्रवास झालाय आणि अजून बराच बाकी आहे. तसं गुगल फोटोज रोज मला मेमरी मध्ये तुझे कित्येक जुने फोटो दाखवतच असतं. त्या प्रत्येक वेळी तुझं बालपण मी एन्जॉय करत असतो. एप्रिल २०१० ला तुझ्या येण्याची चाहूल आम्हाला लागली आणि घरातलं वातावरण बदलून गेलं. घरात लहान पिल्लू येणार म्हणून सगळेच आनंदात होते. घरात सगळ्यात लहान तुझी तनू आत्या. त्यानंतर लहान बाळ आपल्या घरात कुणीच नव्हतं. तुझी मम्मी स्ट्रॉंग म्हणून तू पोटात असतानासुद्धा अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत ट्रेनने प्रवास करून जॉब करत होती. तू मम्मी किंवा माझ्या किंवा आमच्या लग्नाच्या दिवशीच जन्माला यावंस ही आमची खूप ईच्छा होती. तुझी वळवळ जशी आता आहे तशीच तिच्या पोटात पण कायम होती. नोव्हेंबर २०१० चा अख्खा महिना तू तिला शांत एका जागी बसून दिलं नाहीस. मम्मीच्या वाढदिवशी तिच्या कळा सुरु झाल्याचा फोन मला सका

दि नाईट बिफोर लॉकडाऊन

"सुबु, पी. एम्. ने एकवीस दिवस लॉकडाऊन अनाऊन्स केला आहे.  आज रात्री १२ पासून सुरु होणार", दादा न्यूज वाचून कठड्यावरून उठून उभाच राहिला.  मी गाडीवर पाणी मारता मारता थांबलो.  काही क्षण आम्ही सगळे एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो.  पडवीत चालू असणाऱ्या गप्पा अचानक थांबल्या. आम्ही १८ तारखेलाच पालखीच्या निमित्ताने गावाला गेलो होतो आणि २२ ला सकाळी परत निघण्याचा प्लॅन होता.  आम्ही निघालो त्यावेळी कोरोनाबद्दल जास्त काही केसेस नव्हत्या.   पालखीला पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र चाललो होतो.  काकांच्या गावाला पालखी करून, आत्यांकडे आणि मग मामाकडे अशी काही गावं फिरून मुंबईला परत येण्याच ठरलं होतं.  आमच्या वाडीत पालखीचा कार्यक्रम व्यवस्थित झाला.  गावातल्या अजून बऱ्याच वाड्या पालखी घेणार होती.  म्हणजे अजून सातेक दिवस पालखी फिरणार होती.  आमच्या इथून पालखी गेल्यावर ठरल्याप्रमाणे आम्ही आत्येच्या गावाला गेलो.  शुक्रवारी पंतप्रधानांनी २२ तारखेचा कर्फ्यु अनाऊन्स केला आणि आमचा परतण्याचा प्लॅन एक दिवस पोस्पॉंन झाला.  शनिवारी मामाकडे आल्यानंतर सतत न्यूज चॅनेल चालू होतं.  "अरे ते उद्या वायू सो

एका तऱ्याची गोष्ट

“अरे नाय उलटणार साहेब...एकांद्या वेली कधी कधी पंदरा मानस घेऊन जातो मी...मदी मच्चीच्या टोकऱ्या पन असतात.  तुम्ही खाली पाट घेऊन बसा", एकदम आत्मविश्वासाने त्याने बंधाऱ्यापासून  पाण्याच्या दिशेला गेलेली होडी, हातातली काठी विरुद्ध बाजूला दाबून परत होडी बंदाऱ्याला टेकवली.  "बसा बसा काय होत नाय.  उधान येतंय दर्याला.   सगल्यानी एकदम बसा नायतर अर्धे अर्धे चला.", त्याने काठी दाबतंच आम्हाला सांगितलं.  "अर्धे अर्धेच जा.  अर्धी माणसं अजून यायचीत",  आबांनी शंभूला कडेवर सावरत आम्हाला सांगितलं. केळशीला जायची ही माझी चौथी वेळ.  निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिलेल्या या गावाची ओढ सुटत नाही.  मावशी खाडीपलीकडच्या साखरी गावात असणाऱ्या एका आदिवासी पाड्यातील अंगणवाडीत शिक्षिका म्हणून काम करतात. आबासुद्धा त्याच शाळेत शिकवायला होते.  पण तीन वर्षांपूर्वीच त्यांची रिटायरमेंट झाल्यामुळे मावशी आता एकट्याच शाळेत जातात.  तिकडची शाळा कशी असेल हे बघण्याची उत्सुकता आम्हाला होतीच पण त्यापलीकडे सार्थक आणि अश्मीला गावातली मुलं कोणत्या परिस्थिती शिकतात याची जाणीव करून द्यायची होती.  सा

...म्हणूनच ते "थोर" असतात

मला टीव्ही पाहायला फारसा आवडत नाही पण रात्री जेवताना चालू असल्यामुळे जेवण होईपर्यंत जे काही चालू असेल ते बघावं लागतं. आज "दोन स्पेशल" हा कार्यक्रम बघण्याचा योग आला. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत हे आजचे पाहुणे होते. दोन्ही कलाकार माझे आवडते म्हणून इंटरेस्टने त्यांचे किस्से ऐकत होतो. त्यात अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा मनाला फारच स्पर्शून गेला. कलाकार जरी असला तरी त्याला स्वतःच भावविश्व असतं. त्यालाही भावना असतात. त्याचंही कुणाशी नातं असतं अशा जितेंद्र जोशींच्या विषयावर "कलाकाराच्या भावविश्वाशी कुणाला काही घेणं देणं नसतं. त्याने त्याचं काम करत राहिलं पाहिजे", म्हणत त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. अशोक सराफ यांच्या एका विनोदी सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि त्याचवेळी त्यांचे बाबा सिरिअस होते. त्यांचा छोटा भाऊ हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत होता. बाबा हॉस्पिटलमध्ये सिरिअस असताना मनाची घालमेल होणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक सीननंतर ते भावाला फोन करून परिस्थिती विचारत होते. फोनवर भाऊ फक्त श्वास चालू आहे एवढंच कन्फर्म करत होता. अशाच एका सीनच शूट