Skip to main content

Posts

Showing posts from September, 2016

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष
ही दोस्ती तुटायची नाय !!! - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== आज माझ्या मित्राचा वाढदिवस. हे पत्र खर तर मी त्याला पर्सनली पाठवायला हव होत पण मैत्री काय असते याच जीवंत उदाहरण हा माझा मित्र अजय आहे. या माझ्या पत्रातून मैत्री म्हणून एखाद्याच्या आयुष्यात आपला सहभाग कसा असावा व अजय व्यक्ति म्हणून कसा आहे हे जगापर्यंत पोहचाव म्हणून मी फेसबुक ल पोस्ट करत आहे. या पत्रातून अजय मुळे मी पुढे कसा येत गेलो हे मांडण्याचा हा प्रयत्न. ==================================================== प्रिय अजा, खर तर पत्र वैगेरे ही निव्वळ फॉर्मलिटी आहे आणि आपल्यात ती कधीच नसते. पण माणूस जगात नसेल तेव्हा त्याच लिखाण मागे राहत आणि भावना तोंडापेक्षा लिखाणातून चांगल्या बाहेर येतात म्हणूनच आज हे पत्र लिहितोय आणि असही आपण तोंडावर बोलताना शिव्यांशिवाय बोलत नाही. स्तुती तर खूपच लांब राहिली. आज थोडसं फॉर्मल बोलेन कारण आज इथे हे गरजेचं आहे. आयुष्यातल्या काही आठवणींची उजळणी करताना अख्खं आयुष्य डोळ्यासमोरून तरळून जातं. काही माणसं आयुष्यात येऊन निघून जातात. त्यांचा रोल आ

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल