नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी
"बेटा, इंसान पहले जानवर था...कुछ लोग जानवर से इंसान हुवे और कुछ लोग जानवर ही रह गये", क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीज मधला हा एक डायलॉग...पण "नाझी नरसंहार" हे पुस्तक वाचताना तो तंतोतंत जुळतो. माणूस जेव्हा त्याची नैतिक मानसिकता हरवून बसतो तेव्हा तो राक्षसी कृत्य करत कोणत्या पातळीवर येऊ शकतो हे हिटलरच्या म्हणजेच नाझींच्या कृत्यातून जगासमोर आलं. पहिल्या महायुद्धात हरल्यानंतर ज्यूंचा दु:स्वास करणाऱ्या हिटलरने जर्मनीची सत्ता हाती घेतली आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले.
फक्त ज्यू लोकाना मारण्यासाठी आउशवित्झ या जर्मनीने जिंकलेल्या पोलंडच्या भागात कत्तलखाना उभारण्यात आला. युरोपातल्या जवळपास ६० लाख ज्यू लोकांना शोधून अगदी जनावरापेक्षाही वाईट अवस्थेत रेल्वेगाडीतून आउशवित्झ या ठिकाणी आणले जायचे आणि गॅस चेंबरमध्ये सगळ्यांना ग्रुप्स मध्ये कोंबून त्यांच्यावर अँसिड टाकून मारले जायचे. यामध्ये महिला, लहान मुले, वयस्कर असा भेदभाव केला गेला नाही. जसे प्राण्यांवर औषध चाचणीचे प्रयोग केले जातात तसेच प्रयोग ज्यू लोकांवर केले गेले आणि त्यातही कितीतरी मारले गेले. जास्तीत जास्त ज्यू लोकाना एकावेळी मारता यावं म्हणून आउशवित्झचा कत्तलखाना वेळोवेळी अपडेट केला गेला.
मारल्या जाणाऱ्या ज्यू लोकांमध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता. गडगंज श्रीमंत ज्यू लोकांनाही सारखीच ट्रिटमेंट मिळत होती. त्याना अक्षरशः रस्त्यावर नग्न अवस्थेत फिरवलं जात होतं. १९४५ पर्यंत चाललेल्या या हत्याकांडाला रशियाने पहिल्यांदा आउशवित्झ काबीज केल्यावर आळा बसला आणि इथे मरणाच्या वाटेवर असणाऱ्या ८००० ज्यू लोक वाचल्यामुळे हे सत्य जगासमोर उघडकीस आलं. १९४५ जिंकत असलेल्या जर्मनीला बऱ्याच ठिकाणी हार पत्करावी लागली आणि यानंतर नाझी अधिकाऱ्यांना त्यांच्या अमानवी कृत्यासाठी देहदंडाच्या शिक्षा सुनावल्या गेल्या. मुळात धुतल्या तांदळासारखा, बाई-बाटली आणि मांसाहारापासून दूर असणारा, कलेमध्ये रमणारा, साधे जीवन जगणारा, पशुहत्येचा तिटकारा करणारा, उत्कृष्ट वाणीचे वरदान असणारा, मरणाच्या क्षणापर्यंत ब्रह्मचारी राहिलेला हिटलर, खरे तर संत पदवीनेच पूजला गेला पाहिजे होता पण ९९ गुणांना अतिरेकी द्वेषाच्या एका दुर्गुणामुळे काळे फासले गेले. आणि शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली.
यापूर्वी काश्मीर फाईल्स हा सिनेमा बघून माझं डोकं सुन्न झालं होतं. हे पुस्तक वाचतानासुद्धा अक्षरशः अंगावर शहारे येतात. काही गोष्टी डोळ्यासमोरून जातच नाहीत. ती सगळी परिस्थिती किती भयानक असेल याची कल्पनाही करवत नाही. कोव्हिडमध्ये काही काळ आपण पारतंत्र्य अनुभवलं तेव्हा कमीतकमी आपण आपल्या कुटुंबासोबत होतो. पण आउशवित्जमध्ये कुटुंब विभक्त होऊन स्वतःच्या लोकांना आपल्या नजरेसमोर मरताना हतबलपणे बघणं यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? नियतीपुढे कुणाचं काहीच चालत नाही. गरीब श्रीमंत असा भेदभाव नियती करत नाही. हे पुस्तक वाचताना आपल्याला आपली दुःख छोटी वाटायला लागतात. मुळात त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जातो.
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment