Skip to main content

Posts

Showing posts from 2021

पानिपत

  "पानिपत" "तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" या वाक्यावर "विश्वास पानिपतच्या लढाईतच मेला" हे वाक्य कित्येक वर्षे कानावर पडलेलं.  हे ऐकायला बोलायला जितकं सहज तितका सहज पानिपतचा संघर्ष किंवा विश्वासरावांच बलिदान नक्कीच नव्हतं.   कित्येक वर्षे राहून गेलेलं पानिपतच पुस्तक गेल्या काही दिवसांत वाचून काढलं.  परकीय आक्रमणे हा विषय इतिहासात नवा नाही.  एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थावर उठली की ती किती नुकसान घडवून आणू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पानिपत. एक सामान्य प्यादा म्हणून मोगलांकडे काम करणारा नजीब स्वतःच्या कुटनीतीने जवळपास दिल्ली हस्तगत करून बसला.  त्याला मराठे डोईजड व्हायला लागले तेव्हा कंदाहारच्या अब्दाली बादशहाला इस्लामला होणारा धोका पटवून देऊन मोठ्या सैन्यानिशी त्याने हिंदुस्तानात पाचारण केले.   नजीबला संपवण्याची संधी बऱ्याच वेळेला याआधी आली होती.  मराठ्यांचे प्रमुख सरदार मल्हारराव होळकर यांनी या नजीबलाच मानसपुत्र बनवून ठेवला होता.  जेव्हा रघुनाथराव पेशवे त्यांना मारण्यासाठी गेले तेव्हा मल्हारराव आपल्या मराठ्यांना आडवे आले आणि तो प्रयत्न फसला.  एकदा जन

रिकनेक्शन

  काही दिवसांपूर्वी चौधरी बाईंनी फोन न करण्यावरून माझी कानउघडणी केल्यापासून केव्हा एकदा त्यांना भेटतो असं मला झालं होतं आणि शेवटी तो योग आला.  घाटकोपरला "नन्ही कली" उपक्रमाचा सेशन संपवून बाईंच्या घरी जायचं ठरलं.  बाईंना आदल्यादिवशी तशी कल्पना देऊन ठेवली होती.  "मी कुठे जातेय.  मी मोकळीच आहे.  केव्हाही ये", बाईंच्या या उत्तराने आमची भेट पक्की झाली.  बाईंना फोन केला तेव्हा बाई चेंबुरलाच शाळेसमोरच्या त्यांच्या जुन्या घरी मोठ्या मुलाच्या घरी होत्या.  तिथूनच त्यांच्यासोबत देवनारच्या घरी जायचं ठरलं.  त्यांना घेण्यासाठी गाडी घेऊन शाळेसमोर आलो.  त्यांच्यासमोर हाफ पॅन्टवर फिरणारी आम्ही मुलं.  मी गाडी घेऊन आलोय बघून त्या खूपच खुश झाल्या.  त्या गाडीत बसणार म्हणून मलाही आनंद होताच.  दरवाजा उघडून त्यांना गाडीत बसवलं.  मागे प्रतिभा आणि त्या, पुढे मी आणि सार्थक.   सातवीला चौधरीबाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या.  शाळेसमोरच त्यांचं घर.  एकदा बाई आजारी म्हणून शाळेत आल्या नाहीत.  आम्ही तिघे-चौघे हिम्मत करून त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो.  बाईंनी आमचं स्वागत केलं.  आम्ही त्यांना भेटा

रायगड

  काही क्षण आयुष्यात खास असतात. त्या क्षणात आयुष्य पलटून देण्याची ताकद असते. माझ्या आयुष्यात तो क्षण जानेवारी २००९ मध्ये आला होता जेव्हा मी शाळेतल्या मित्रांसोबत पहिल्यांदा रायगडावर गेलो होतो आणि स्वतःची कंपनी चालू करण्याबाबत त्यांच्यासमोर विचार मांडला होता. जुलै २००९ मध्ये स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करणारी "स्वराज्य इन्फोटेक" आम्ही ५ मित्रांनी मिळून स्थापन केली होती. आज पुन्हा एकदा १२ वर्षांनी तोच क्षण जगण्याची आणि रायगड पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची संधी मिळाली. प्रोजेक्टच्या निमित्ताने दादाने रायगडावर जाऊ अशी कल्पना तीनेक दिवस आधी मला दिली. आम्हा दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतो त्यामुळे त्याला सहसा नाही म्हणणं मला जमत नाही आणि त्यात रायगड म्हटल्यावर नकाराची शक्यता नव्हतीच. सुनील दादा, समीर, मोहित ही सोबत होतेच. अख्खी रात्र गडावर काढायची या कल्पनेने आम्ही सगळेच हुरळून गेलो होतो. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जगदीश्वराच्या मंदिरात ध्यानसाधना करण्याचा भक्कम प्लॅनसुद्धा झाला होता. आम्ही दुपारी तीन-साडे तीन दरम्यान पोहचलो पण गडावर पोहचल्यापासूनच हिरमोड व्हायला सुरुव

टेक्नियम

  तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करावे लागणार नाहीत किंवा मुळात तुमचे कपडे कधी खराबच होणार नाहीत.  त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत.  इस्त्री जर का फिरलीच तर तुमच्या कपड्यांचा रंग बदलण्यासाठी फिरेल.  म्हणजे एकच शर्ट तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वापरू शकाल.  नॅनोटेक्नॉलॉजी बद्दल अच्युत गोडबोलेजींच्या "नॅनोदय" पुस्तकात असं बरंच काही वाचलं होतं.  त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत.  जेव्हा एखाद्या सुपरफिशिअल सिनेमामध्ये पाहिलेल्या गोष्टी अशा पुस्तकात वाचायला मिळतात आणि ते खरं होऊ शकत हे पटवून देतात तेव्हा एक वेगळीच मजा असते.  असं काहीतरी वेगळं वाचायला मिळेल या अनुषंगाने अजाने दिलेलं निळू दामले यांचं "टेक्नियम" हे पुस्तक वाचायला घेतलं.  त्यात टेकनॉलॉजीचा तसा मागोवा सुरुवातीपासून दिसला नाही.  अख्ख पुस्तक टीव्हीबद्दल च्या सर्वेवरच मांडलेलं होतं.  म्हणायला तसा हिरमोड तर झाला नाही कारण हा प्रवास बघणार्यांपैकी मीसुद्धा एकच.  पण हाच प्रवास भारतातील वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन त्यांनी १९९८ आणि २००८ साली केला आणि त्याचं उत्तम वर्णन या पुस्तकातुन मांडलं आहे.   प

हॅप्पी बर्थडे मनोज सर!

  प्रिय मनोज सर, असं म्हणतात कि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी नियतीने आधीच लिहून ठेवलेल्या असतात.  योग्य माणसं योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येतात.  काही जण तात्पुरते येऊन जातात तर काही तुमच्या आयुष्याचा भाग होऊन जातात.   काही जणांशी नातं जुळायला महिने वर्ष निघून जातात आणि काहीजण एका भेटीतच आपले होऊन जातात. ३ वर्षांपूर्वी आपली भेटसुद्धा एम.बी.सी. च्या मीटिंगमध्ये तशीच झाली आणि आपलं नातं बहरत गेलं.  एम.बी.सी. मध्ये आल्या दिवसापासून तुमची देण्याची वृत्ती आणि इतरांच्या आयुष्यात योगदान करण्याची तळमळ दिसून आली.  रिलायन्समधून जी.एम. पोस्टवरून स्वतः राजीनामा देऊन तुम्ही बिजनेस चालू केलाय हे समजलं तेव्हा थोडाफार अँटीट्युड असावा असा अंदाज मी बांधला होता कारण कोर्पोरेटमध्ये एवढ्या पुढे गेलेल्या लोकांची स्वतःची एक स्पेस असते.  पण तुम्ही वेगळे होतात.  आपल्या एम.बी.सी. कुटुंबात सहभागी झाल्यापासून तुम्हाला कोणतं काम लहान मोठं वाटलं नाही.  इव्हेन्ट मध्ये बॅनर लावण्यापासून तुम्ही सगळी कामं आवडीने केलीत.  ना कोणत्या गोष्टीचा दिखावा ना अतिशयोक्ती.  तुम्ही आहात तसेच राहिलात म्हणून सगळ्यांना आपले

लॉस्ट कनेक्शन्स

"हॅलो, कशा आहात बाई?", नुकत्याच आलेल्या चौधरी बाईंच्या मिसकॉलवर मी रिटर्न कॉल केला होता.  बाई म्हणजे माझ्या सातवीच्या वर्गशिक्षिका.  माझ्या सगळ्यात आवडत्या.  एकदमच.  आमच्या वेळी टीचर आणि मॅडमच फॅड आमच्या शाळेत नव्हतं आणि अजूनही सगळ्या शाळेतल्या शिक्षिकांना आम्ही बाई म्हणूनच बोलवतो.  कॉलेजपासून मॅडम सुरू झालं.  पण बाई शब्दातला आपलेपणा मॅडम मध्ये नाही.  बाई बोलताना कायम "आई" बोलतोय असं वाटायचं. "मी, बरी आहे बेटा! तू आहेस कुठे? मी किती वेळा फोन केला.  तू माझा फोन उचलत नाहीस.  अगोदर अधून मधून फोन करत होतास.  मी प्रविणला (आमचे मेस्त्री सर) फोन केला होता.  त्याला पण सांगितलं, माझा सुबोध मला असा कसा विसरला?  मी फोन करून कंटाळले बाबा.  आता त्या भगवंतांचीच इच्छा असेल म्हणून फोन लागला बघ इतक्या दिवसांनी.",  राग प्रेम सगळं त्यांनी एकदाच व्यक्त केलं. बाईंचा फोन आला हे मला आठवत नव्हतं पण हेसुद्धा खरं होतं की मी त्यांना समोरून गेल्या वर्षभरात फोन केला नव्हता.  पूर्वी अधूनमधून त्यांना माझा सतत फोन असायचा.  आई गेली त्या काळात बरेच फोन माझ्याकडून मिस झाले असतील.  त्यात बाई

श्यामची "आई"

  आईच्या घटनेनंतर काही दिवस पुस्तक वाचता आलं नाही आणि जेव्हा पुस्तक वाचण्याचा विचार केला तेव्हा नेमक्या "श्यामची आई" याच पुस्तकावर कपाटात पहिल्यांदा लक्ष गेलं. पुस्तक चांगलं आहे याबाबतीत शंका नव्हती पण इतकी वर्ष कपाटात असून पुस्तकांच्या गर्दीत नजरेत आलं नाही. जी गोष्ट सतत विचारात तीच नजरेसमोर पटकन येते असंच काहीस झालं. आईच्या आठवणीत असतानाच हे पुस्तक समोर आलं आणि पूर्ण वाचून काढलं.  सानेगुरुजींचे बाबा गावात खोत होते त्यामुळे घरात प्रचंड श्रीमंती. भावाभावांमधल्या प्रॉपर्टीमधल्या वादातून त्यांना घर सोडावं लागलं आणि बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना सानेगुरुजींच्या आई बाबांना करावा लागला. आयुष्यातली काही वर्ष वैभवात घालवून पुन्हा अगदी शून्यावर येणं म्हणजे कसोटीच होती. अपमानाच्या कित्येक प्रसंगातून पूर्ण कुटुंबाला जावं लागलं. पोटची दोन मुले त्यांना आयुष्याच्या प्रवासात गमवावी लागली. कित्येक अडचणी समोर आल्या पण त्यांनी आपली तत्वे सोडली नाहीत. मुलांवर संस्कार करताना त्यांनी कोणतीच तडजोड केली नाही.  पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी स्वतःच्या आयुष्यातल्या घटना शोधत होतो आण

“ आई" सोडून जाताना

वयाची पस्तिशी ओलांडली....या पूर्ण प्रवासात दिवसातून बराच वेळ समोर दिसणारी माझी आई त्या सोफ्यावर नाही हे सहन होत नाही...वॉश बेसिन मध्ये हात धुताना समोरच्या आरशातून ती सोफ्यावर दिसायची...तसे भासही गेल्या 3-4 दिवसात होऊन गेले...पहिल्या रात्री तर सतत सोफ्यावर हात जात होता. हे सगळं असं पटापट घडून गेलं...मागच्याच आठवड्यात मी घराची साफसफाई करायची म्हणून अट्टाहासाने घरातलं सगळं सामान 4-5 दिवस सलग आवरत बसलो होतो.  त्यात कितीतरी जुन्या अनावश्यक गोष्टी निघाल्या.  गेली कित्येक वर्ष मी हे सामान काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या बाहेर काढायचं म्हटल्यावर "आता तुला आमची पण अडचण व्हायला लागेल, आम्हालाही बाहेर काढशील", असे इमोशनल अत्याचार करून माझी ती नेहमी अडवणूक करायची.  जुन्या आठवणीच सामान म्हणावं तर तसंही नाही.  पण काहीसुद्धा उरलंसुरलेलं कधीतरी भविष्यात उपयोगी होईल म्हणून ठेवून दिलेलं.  बाहेरून आलेला बॉक्स टाकायचा नाही की पिशवी टाकायची नाही.  अगदी पूर्वीपासून काटकसरीत आयुष्य काढलेलं.  बाटलीची झाकण जमवून त्यावर चाळीमध्ये असताना ती खारी टोस्ट घ्यायची.  तिची तीच सवय तिने अजूनपर्यंत ठेवली

मृत्युंजय

  काही वर्षांपूर्वी रणजित देसाईंच "राधेय" वाचलं होतं.  महाभारतातल्या कर्णाची बाजू त्यात प्रकर्षाने मांडली होती.  त्यावेळीच कुणीतरी शिवाजी सावंत यांचं "मृत्युंजय" वाच असं सुचवलं.  आमच्या सुनयना गायकवाड ताईने राबवलेल्या पुस्तक प्रदर्शनात मी ते दोनेक वर्षांपूर्वी घेतलं आणि पुस्तकाची लहान अक्षरात छापलेली ७२७ पाने बघून ते "एवढं कधी वाचून व्हायचं?" म्हणून कायम पुढे जात राहिलं.  पण दर दिवशी पाच असे २३९ धडे वाचायचे हा निर्धार करून गेल्या दीडेक महिन्यात पुस्तक पूर्ण वाचून काढलं.   प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.  जे तुम्हाला दिसतं ते खरं असतंच असं नाही.  असंच काहीसं या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला कर्णाबद्दल वाचताना वाटतं.  पांडवांची अयोग्य बाजू बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने दिसून येते.  महाभारत म्हटलं कि सहसा पाच पांडव, श्रीकृष्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, द्रौपदी आणि शकुनी मामा हेच डोळ्यासमोर येतात.  कर्णाची त्यातली महत्वाची भूमिका ही या दोन्ही पुस्तकांमुळे समोर येते.   सूर्याच्या दिव्य शक्तीतून जन्मलेला कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय, पण कौमार्य अवस्थेत बा