Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017

४९ रुपयांचं कर्ज

*४९ रुपयांचं कर्ज* - सुबोध अनंत मेस्त्री ======================================================================== शाळा सोडून आता 16 वर्ष झाली. शाळेतल्या शिक्षकांनी खूप चांगल्या सवयी आमच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या एक होत्या चौधरी बाई. माझ्या आईनंतर ज्यांनी मला आईसारखी माया लावली असेल त्या चौधरी बाई होत्या. अजूनही बाईंना भेटलो आणि वाकून नमस्कार केला की "खूप मोठा हो", असा आशीर्वाद मिळतो आणि काहीतरी करण्याची जिद्द. उद्या चौधरी बाई शाळेतून रिटायर्ड होत आहेत. त्यांच्या एका आठवणीचा हा लेख. ======================================================================== सातवीची नऊमाई परीक्षा होऊन गेली होती. गणिताची भीती मला असायचीच आणि त्यात नापासही झालो होतो. मला त्यावेळी क्लास लावण्याची भारी क्रेझ होती पण घरची परिस्थिती पप्पांच्या बेताच्या कामामुळे तशी चांगली नव्हती. "दादा अण्णा झाले पास क्लास न लावता. तुला कशाला पाहिजे क्लास. तू हुशार आहेस", अस बोलून आई नेहमीच माझी क्रेझ उतरवायची. मला आता वार्षिकच टेन्शन होत. पुढच्यावर्षी याच वर्गात राहा

बी. डी. डी. चाळ

*बी. डी. डी. चाळ* - सुबोध अनंत मेस्त्री ========================================================== संजय दादा आणि अरुण सरांशी शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये  मिटिंग संपवून दादा आणि मी टॅक्सी मिळेल या हिशोबात शिवाजी पार्क समोरच्या शिवसेनाभवनाच्या रस्त्याला लागलो.  एक दोन टॅक्सीवाल्याना विचारलं पण नेहमीप्रमाणे नकारच मिळाला.  पलीकडच्या रस्त्यावरून एक टॅक्सी शिवाजी पार्ककडे चालली होती त्यांनी आम्हाला हातवाऱ्यानेच कुठे अस विचारलं.  मी लांबूनच "वडाळा  स्टेशन" अस मोठ्याने ओरडून सांगितलं. "थांबा, वळवून आणतो", त्याने हात फिरवून सांगितलं. "काका थोडे सिरीयस दिसतात या धंद्यामध्ये", मी मस्करीत दादाला म्हटलं.  टॅक्सी फिरून आमच्याकडे आली. "बसा", त्यांनी मागचा दरवाजा उघडला.  आम्ही बसलो. "मघाशी एवढं आभाळ आलं होत वाटलं पाऊस येईल.  आलाच नाही.   ढग आले तसे गायब झाले", गाडी सुरू झाल्या झाल्याच टॅक्सी ड्रायव्हर काकांनी गप्पा मारायला सुरुवात केली. "पनवेलला पडला पाऊस दीड तास तरी.", दादाने सांगितलं. "अरे वा तिकडे पडला का?  मग ये