Skip to main content

Posts

Showing posts from 2018

लहानगा इन्व्हेस्टर

====================================================================== नमस्कार, आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना सहज खर्चाला पैसे देणे किंवा त्यांचे हट्ट पुरवणे हे अगदी कॉमन आहे.  पण याचबरोबर ती मुलं हट्टी होणार नाहीत किंवा त्यांना पैशाची किंमत कळेल याची काळजी घेतली पाहिजे.  लहान वयात मुलांना गुंतवणुकीच महत्व पटवून दिलं तर त्यांना पूर्ण आयुष्य सुखात जगण्यात काहीच त्रास होणार नाही हे नक्की.  मी ते कसं करतोय या अनुभवावर माझा हा लेख. ===================================================================== "अरुण अंकल, आज मेरा बर्थडे था ना तो मेरा पिगी बँक ओपन किया है| टू थाउजंड फोर हंड्रेड फोरटी रुपीज निकला है|  मै पप्पा के पास भेजता हु| आप मेरे अकाउंट मे डाल देना|", सार्थकने मी विसरेन या विश्वासाने डायरेक्ट अरुण सरांना फोन करून माझ्याकडून पैसे घेण्याची सूचना आधीच देऊन ठेवली.  हे पैसे त्याच्या म्युच्युअल फ़ंड अकाउंट मध्ये फिरवायचे होते.  खरं तर त्याचा अकाउंट उघडायला एक वर्ष लेटच झालं होतं. सातव्या वाढदिवसाला जेव्हा त्याने त्याचा गल्ला फोडायला सांगितला

मेडिसिन बॉक्स

======================================================== नमस्कार, आयुष्यातलं सगळ्यात जास्त गृहीत धरलं जाणारं नातं म्हणजे आई-बाबा.  आपण नकळत त्यांना दुखावून जातो पण त्यांच्या लेखी क्षमा हा शब्द कायमच आहे.  "तुम्ही कधी म्हातारे नाय होणार काय रे भाडखाऊ?", हा नाना पाटेकरांचा "आपला माणूस" चित्रपटातला संवाद यावेळी आठवतो.  आपण सगळं करत असताना खरंतर कुठेतरी कमी पडतो याची मला झालेली जाणीव म्हणजे हा लेख ========================================================= "या गोळ्या कुणी टाकल्या यात नवीन?", आईच्या मेडिसिन बॉक्समध्ये इव्हनिंग सेक्शनमध्ये गोळ्या पाहून मी विचारलं.  तिला गोळ्या वेळच्यावेळी खायला समजत नाही म्हणून आठवडभराचं सकाळ दुपार संध्याकाळ असे स्लॉट्स असलेलं एक मेडिसिन किट बॉक्स मी दहा दिवसापूर्वी घेऊन आलो होतो.  त्यात सगळ्या गोळ्या सकाळ आणि संध्याकाळच्या कापून ठेवल्या.  आपण बोलताना ती दुसऱ्याच विचारात असते म्हणून तिला तीन वेळा समजावून सांगितलं.  आज आठवडा संपला म्हणून आठवडभराच्या गोळ्या पुन्हा भरायच्या म्हणून पाहिलं तर आठवड्याभराचे एव्हीनिंग ब्लॉ

डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र कथेवरून शिकण्यासारख्या १० गोष्टी

मी चित्रपट खूप कमी पाहतो.  बऱ्याच जणांकडून रिव्ह्यू घेऊन जर खूपच चांगला फीडबॅक असेल तरच सहसा.  पण "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" या चित्रपटाचा रिव्ह्यू घेण्याचा प्रश्नच आला नाही.  ट्रेलरच इतका जबरदस्त होता की हा सिनेमा बघायचा मोह आवरला नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा मुहूर्त लाभला.  चित्रपट अप्रतिमच आहे.  तो नाट्यभूमीचा काळ मांडण्यात दिग्दर्शकाला यश आलंय आणि त्यातही सर्वच कलाकारांची भूमिका अप्रतिम.  या चित्रपटातून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यातल्याच काही तुमच्यासाठी. १. तीच गोष्ट करा ज्यात तुमचं मन तुम्हाला साथ देतं व्यवसायाने डेंटिस्ट असून सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस सोडून डॉक्टर नाट्यभूमीकडे वळले.  फक्त पोटापाण्यापुरतं न जगता आपण काहीतरी मोठं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना होता.  घरातल्यांचा विरोध असूनसुद्धा त्यांनी ही जोखीम पत्करली होती.  नंतर सिनेमामध्ये यश मिळूनसुद्धा ते खूप आनंदी नव्हते कारण त्यांचं मन रंगभूमीवर जास्त रमत होतं. त्यात आवडलेला एक संवाद, "आपलं मन रमतं त्या क्षेत्रात अपयश मिळण्यापेक्षा ट्रॅजिक असतं आपलं मन रमत नाही त्या क्षेत्रात यश म

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

माणुसकीचा "चालक"

मोमो खाऊन आम्ही तिघे बाहेर पडलो आणि समोरच चौकात रिक्षा उभ्या होत्या.  काळोख पडला होता.  थोडावेळ पुन्हा एकदा आज झालेली डी. सी. पी. साहेबांसोबतची मीटिंग आणि पुढे होणाऱ्या कामांची उजळणी झाली.  तशी ती आज खूप वेळा झाली होती.  अतिष दादाने मला आणि दादाला रिक्षा बघून दिली आणि तो त्याच्या बाईकच्या दिशेने निघाला.  वायले नगर ते कल्याण स्टेशनपर्यंत रिक्षा शेअरिंगवर मिळाली. माझ्या आणि दादाच्या बरच वेळ गप्पा सुरू होत्या.  अंतरही खूप होत आणि ट्रॅफिकही. इतक्यात माझं लक्ष ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर गेलं.  "जेष्ठ नागरिक व वयस्कर यांना ५०% सवलत.  कल्याण हद्दीत दवाखाण्यासाठी मोफत सेवा."  हे वाचून मला कौतुक वाटलं.  मी दादाला ती स्टेटमेंट दाखवली.  रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात ती स्पष्ट वाचता येत होती.  "चांगलं काम करताय तुम्ही.  मस्त वाटलं बघून", दादा कुणाचही कौतुक अगदी लगेच करतोच. "काय साहेब?", रिक्षावाल्याने त्याच्या डाव्या बाजूच्या मोठ्या आरशातुन दादाला विचारलं. "हे वाचलं मागे.", दादानेही सीटकडे बोट दाखवत आरशातच बघून सांगितलं. "थँक यु&qu

गोविंदा रे गोपाळा

"पप्पा, मी दीदीकडेच राहणार आहे.  परवा सुट्टी आहे मला", सार्थकने विचारलं नव्हतं तर मला डायरेक्ट सांगितलं होतं.  "राहू दे त्याला.   परवा इथे लहान मुलांची हंडी करायचा प्लॅन केला आहे.  खाली बेसला एकच मुलगा आहे आणि बाकी तीन मुलीच आहेत. हा असेल तर बरं पडेल", दादाने दुजोरा दिल्यावर मी पण आढेवेढे घेतले नाहीत.  ते असेही नसते घेतले कारण त्याला दिदीची आणि मोठे पप्पाची कम्पनी किती आवडते हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे.    मी त्या चिमुरड्यांची दहीहंडी कशी असेल याची कल्पना करायला लागलो आणि त्याचबरोबर आमची दहीहंडी लहानपणी कशी होती त्या आठवणींवरची धूळसुद्धा आपसूकच उडायला लागली. चाळ म्हटलं की प्रत्येक सणवार जोरदारच व्हायचा.  आमच्या चाळीत  जवळपास आमच्याच वयाची बरीच मुलं आणि तेवढेच आमच्यावर हक्क गाजवणारी दादा वयाची मुलं त्यामुळे प्रत्येक गोष्ट बॅलन्स होऊन जायची.  जेवढं घर लहान आणि माणसं जास्त तेवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क येण्याचं प्रमाण वाढतं आणि जेवढं घर मोठं आणि माणसं कमी तेवढाच त्यांचा आपापसातील संवाद कमी होऊन दुरावा वाढतो.  चाळ आणि फ्लॅट मधलं हे समीकरण इतक्या वर्षात

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्

संदेश दादाचे पत्र - ०९ जून २०१८

डिअर सुबु, ६जूनला पुष्पाने मेसेज केला कि, उद्या सुबोधदादाचा वाढदिवस आहे का? मी म्हणालो असेल कारण, मलाही नक्की तारीख माहित नव्हती, पण तेव्हा वाटलं काही लिहावं तुझ्याबद्दल... पण नाहीच जमलं, आणि आज विनूची पोस्ट येईपर्यंत हि खंतही होतीच, कायतरी लिहायला हवं होतं, एकुलता एक असल्याने भांवडांचं असणं नसणं जाणवतं नव्हतं पण जेव्हा जाणवलं, तेव्हा बहिणीची कमतरता जाणवली, पण ती जाणिव होतेय एवढ्यात खुप बहिणी मिळाल्या, मित्रांमुळे भाऊ असण्याची कमतरता वाटलीच नाही. आणि इतर मित्रांची भावाभावाची नाती पाहता, भाऊ नाही हे बरचं आहे, असंच वाटतं, अपवाद तुझा आणि रविचा, तुमचं तुमच्या भावांजवळचं नातं पाहता, असे छोटे भाऊ असावेत असं वाटायचं आणि ते वाटता वाटता तुम्ही दोघेही माझेच भाऊ कधी झालात, मलाच कळालं नाही, तुम्ही दोघेही देत असलेला मोठ्या भावाचा मान पाहून माझा मलाच हेवा वाटायला लागतो, तु तसा रविपेक्षा उशिराने आयुष्यात आलास, ... एक बरं असतं, घरातल्याच माणसांने काही लिहलं कि काही गोष्टी नव्याने कळतात, म्हणजे जसं सकाळी विनूनं लिहलयं तसं, तुझं अभ्यासात हुशार असणं, घरी लाडं होणं. हे नव्हतं मला माहित, आणि ए

आभार - ०९ जून २०१८

*!!! आभार !!!* ९ जून १९८५.  मध्यरात्री २ च्या सुमारास शताब्दी हॉस्पिटल चेंबूर इथे माझा जन्म झाला. शौच नलिकेत त्रास असल्याने माझं ऑपरेशन करणं गरजेचं होतं.  पण ऑपरेशन नंतर बाळाला ठेवण्यासाठी जी काचेची पेटी लागते ती शताब्दी हॉस्पिटलमध्ये नव्हती.  त्यामुळे ताबडतोब के.ई.एम हॉस्पिटलला हलवाव लागेल नाहीतर जीवाला धोका आहे असा ईशारा डॉक्टरने दिला. आमचे शेजारचे खोत भाई त्यावेळी शताब्दीमध्ये कामाला असल्याने त्यांच्या ओळखीवर लगेच अँबुलन्स मिळाली व मला ताबडतोब के. इ. एम ला हलवलं.  तिकडे उपचार करून पुढचे ९ दिवस मी काचेच्या पेटीतच होतो.  माझ्यासोबत अजून अशी पाच सहा मुलं तशाच पेटीत होती आणि त्यातला मी बचावलो अस आई सांगते.  देवाने नक्कीच काहीतरी घडवून आणण्यासाठी मला मागे ठेवला असं मला कायम वाटत राहीलं.  पण नेमकं ते काय हे अजून गवसायचं बाकी आहे. त्यावर्षी तुफान पाऊस होता.  बेडची व्यवस्था नसल्याने बाळंतपणातच आईला जमिनीवरच चादर टाकून झोपावं लागायचं.  त्यात अधूनमधून सारखी ती उठून त्या पेटीजवळ जाऊन मला बघत राहायची.  तिच्या किती प्रार्थना देवाकडे गेल्या असतील याचा हिशोब नाही.  इतक्या तुफान पावसात पप्पा क

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा. 

खाकीमागचा माणूस

======================================== परवा सहज माझ्या रुपेश नावाच्या मित्राबरोबर चर्चा करताना पोलीसांचा विषय निघाला.  त्याच्या कारमधला ऑडिओ सिस्टम चोरीला गेल्यानंतर त्याला ठाण्यातल्या वर्तक नगर पोलीस स्टेशनमधील "श्री. ज्ञानेश्वर आव्हाड" नावाच्या पोलीस अधिकारी साहेबांनी कशी मदत केली हे तो सांगत होता.  त्यावेळी बेदरे सरांची आठवण आली.  बेदरेसर हे माझ्या आयुष्यातले पहिले पोलीस ऑफिसर ज्यांच्याशी मी समोरासमोर भेटलो आणि बोललो.  त्याअगोदर पोलिसांबद्दल माझं मत काही खास चांगलं नव्हतं.  त्यानंतर एखाद वर्षांनी संजय गोविलकर दादा भेटले आणि खाकीमागच्या खऱ्या प्रेमळ माणसांची भेट झाली. ======================================== दहा वर्षांपूर्वीची गोष्ट.  मी जॉबला लागल्यानंतर मामाचा मुलगा श्याम पहिल्यांदाच मुंबईमध्ये आला होता.  घरात पार्टी व्हावी म्हणून पावभाजी घेण्यासाठी आम्ही बाईकवर दोघेही चेंबूरला सदगुरू रेस्टोरंटमध्ये गेलो होतो.  सदगुरुची पावभाजी खूपच फेमस आहे.  चेंबूरला पार्किंगचा नेहमीचाच इश्यू.  त्यात सदगुरु एकदम स्टेशनबाहेरच नाक्यावर असल्याने तिथे तर गाडी लावायला चा

आनंदवन प्रयोगवन

व्यक्तीला त्याच्या आयुष्याचा हेतू एकदा सापडला कि तो पूर्णत्वास नेण्यासाठी ती व्यक्ती काय करू शकते याच उदाहरण म्हणजे "कै. बाबा आमटे". श्रीमंतीत वाढलेल्या आणि नंतर वकीली पेशात असणाऱ्या बाबांना एका पावसाळ्यात गटारात पडलेला कृष्ठरोगी दिसला ज्याच्या जखमांमधून अळ्या बाहेर येत होत्या.  पूर्ण शरीर उध्वस्त झालेल्या त्या व्यक्तीला पाहून आपण वकीली सोडून कृष्ठरोग्यांसाठी काहीतरी करावं हे त्यांनी निश्चित केलं आणि एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली.  1949 मध्ये समाजाने नाकारलेल्या काही क्रुष्ठरोग्यांना एकत्र घेऊन वरोऱ्यात सरकारकडून मिळालेल्या एका जंगलातून त्यांनी आनंदवनाला सुरुवात केली.  याच असहाय्य रोग्यांच्या मदतीने तिथे एक मोठं गाव उभं राहिलं.  स्वतःला लागणाऱ्या गोष्टी स्वतः निर्माण केल्या जाव्यात म्हणून शेती, डेअरी, निरनिराळे उद्योग असं भलं मोठं साम्राज्य उभं राहिलं.  कृष्ठरोग्यांबरोबरच अंध, अपंग आणि समाजाने दुर्लक्षिलेले असे कित्येक लोक आनंदवनाचा आसरा घेऊ लागले.  विदर्भ असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तळी खोदली गेली, विहिरी खोदल्या गेल्या.  कोणत्याही संकटावर हातावर हात ध

दोंत वरी

"आपल्याला आज घरीच थांबावं लागेल.  आज जर बाहेर पडलो तर पुढची पूर्ण पिकनिकची वाट लागेल", एकंदरीत प्रतिभाची अवस्था पाहून मी तिला सांगितलं.  तीसुद्धा काही ऑब्जेक्शन घेणार नव्हती कारण तिलाही फिरण्याची ताकद नव्हतीच.  तापामुळे तिचा अवतारच झाला होता. आमचं मुंबईतून निघाल्यापासून जवळपास तीसेक तास फिरणच चालू होतं.  त्यात सलग तीन फ्लाईट्स, एअरपोर्टवर जे स्नॅक्स आयटम मिळतील ते खाणं आणि मलेशियामध्ये आल्यानंतर आम्ही बुक केलेला बंगला (व्हीला) लंगकावीच्या एकदम वेगळ्या टोकाला असल्यामुळे आम्ही दिवसभर फिरून नंतर तिकडे जाण्याचा घेतलेला डिसीजन या सगळ्यामध्ये सगळ्यांची दमछाक झाली होतीच.  पण प्रतिभाच्या शरीराला ही धावपळ आणि ते जेवण मानवलं नाही.  रात्री तापाची गोळी घेतली होती पण तिचा ताप काही उतरला नव्हता.  आज बोटीने प्रवास करण्याचा प्लॅन होता त्यात तिचा ताप अजूनच फोफावला असता याचा अंदाज होता म्हणून ईच्छा नसतानाही हे डिसीजन. बाहेर डायनींग टेबलवर सकाळी सगळ्यांना तो निर्णय सांगितला.  डॉक्टरकडे जाऊन येण्याचा सल्ला सगळ्यांनी दिला. मलाही तेच वाटत होतं.  आतापर्यंत या बंगल्याच्या मालकाशी अजयने को-ओर्

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता.  माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो ह