Skip to main content

Posts

Showing posts from August, 2016

रफ अँड टफ

आज ट्रेन मधून बेलापूरपासून चेंबूर पर्यंत प्रवास करत होतो. दर गुरुवारी मंदिरात जाण्याची सवय खूप पूर्वीपासूनच आहे आणि तेही चेंबूरचच साईबाबा मंदिर. तसा मी नेहमी संध्याकाळीच जातो पण रक्षाबंधन असल्याने संध्याकाळी जायला जमणार नाही म्हणून दुपारीच निघालो. दुपारची वेळ आणि त्यात काही लोकांची सुट्टी त्यामुळे ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. पण काही लग्न झालेल्या आणि काही कुमारी अशा बहिणी नटून आपल्या भावाकडे निघाल्या होत्या आणि त्यांचं कुटुंब सोबत असल्याने काय ती थोडी फार रोजपेक्षा जास्त गर्दी. दरवाज्याच्या बाजूला सीटला समांतर असणाऱ्या जाळीच्या बोर्डला टेकून मी उभा राहिलो होतो आणि आठ दहा माणसे त्या पॅसेज मध्ये उभी होती. सीवुड स्टेशन ला ट्रेन थांबली आणि एक 12-13 वर्षाची मुलगी व तिच्याबरोबर दीड दोन वर्षाची लहान मुलगी ट्रेनमध्ये चढले. मोठी मुलगी काटकुळी...सावळी... केस सोडलेले आणि विस्कटलेले...चेहरा पूर्ण मळकटलेला...मळकट पंजाबी जांभळ्या रंगाचा ड्रेस तोही काळ्या रंगाच्या जवळपास गेलेला. एकंदरीत तिचा अवतार बघून एखाद्याला दया यावी, त्यापेक्षा ही अधिक कीळसच यावी आणि तिने आपल्याला हात लावून आपले
नमस्कार...मी सुबोध अनंत मेस्त्री...तुमच्यासारखाच एक साधा सरळ माणूस....आज हा ब्लॉग सुरू करत आहे...आयुष्यात घडणार्‍या सध्या सरळ घटनामधून आपण खूप काही शिकत असतो...अशाच माझ्या आयुष्यात घडलेल्या या काही घटना...यातून कुणाला काही शिकायला मिळेल एवढीच अपेक्षा....मी कुणी लेखक नाही किवा साहित्यिक नाही...त्यामुळे माझी लेखणी सहज आणि सरळ आहे आणि त्यामुळे ब्लॉगच नाव सुद्धा तेच...या ब्लॉगला खूप सारे फॉलोवर्स मिळावेत अशी अपेक्षा नाही पण कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी छोट योगदान होईल एवढं नक्की....काही क्षण डोक्यात तात्पुरते राहतात आणि लिहून ठेवले तर ते कायम कोरले जातात...पुढे जाऊन हा ब्लॉग मी स्वता वाचेन तेव्हा माझ्याच आयुष्यातल्या ठळक आठवणी माझ्या नजरेसमोर उभ्या राहतील आणि त्यातली शिकवण सुद्धा :) #sahajsaral

जगून घ्या

माझा हा लेख त्या मित्रांसाठी आहे जे आज धावण्याच्या गडबडीत जगणं विसरले आहेत. आवर्जून वाचा. =================================== 2 दिवसापूर्वीच एक विचित्र घटना कानावर पडली आणि मन सुन्न झालं. दादाचा खास मित्र विजय याचा अपघाती मृत्यू झाला. त्याची बायको हि त्याची शाळेपासूनची प्रेयसी म्हणजेच 20 अधिक वर्षाची दोघांची ओळख आणि लग्नानंतर यांना एक पाच वर्षाची मुलगी त्रिशा. दादा मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत होता. दादा आणि विजयने सोसायटीमध्ये एकत्र बरेच सण एकत्र साजरे केले होते आणि त्यामुळे त्यांची यारी जबरदस्त जमली होती. प्रत्येक पार्टीची जान होता विजय. दादाने त्याला कधी नाराज पहिलाच नव्हता. तो फक्त नाराज असायचा त्याची मुलगी आजारी असताना. त्याचा त्रिशा वर खूप जीव आणि तिलाही सारखा बाबाच लागायचा. त्रिशा आजारी असताना तो दादाला नाराजीने सांगायचा, "त्रिशा आजारी आहे रे. ती जेवत नसेल ना तर मलाही जेवण जात नाही. हि लहान पोर खेळता खेळता शांत झाली कि कशात मन लागत नाही.". गटारी एन्जॉय करायची म्हणून विजयच्या सगळ्या मित्रांनी रेसॉर्ट वर पिकनिक प्लॅन केला. पिकनिकला निघताना तो आईची