Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

“ आई" सोडून जाताना

वयाची पस्तिशी ओलांडली....या पूर्ण प्रवासात दिवसातून बराच वेळ समोर दिसणारी माझी आई त्या सोफ्यावर नाही हे सहन होत नाही...वॉश बेसिन मध्ये हात धुताना समोरच्या आरशातून ती सोफ्यावर दिसायची...तसे भासही गेल्या 3-4 दिवसात होऊन गेले...पहिल्या रात्री तर सतत सोफ्यावर हात जात होता. हे सगळं असं पटापट घडून गेलं...मागच्याच आठवड्यात मी घराची साफसफाई करायची म्हणून अट्टाहासाने घरातलं सगळं सामान 4-5 दिवस सलग आवरत बसलो होतो.  त्यात कितीतरी जुन्या अनावश्यक गोष्टी निघाल्या.  गेली कित्येक वर्ष मी हे सामान काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या बाहेर काढायचं म्हटल्यावर "आता तुला आमची पण अडचण व्हायला लागेल, आम्हालाही बाहेर काढशील", असे इमोशनल अत्याचार करून माझी ती नेहमी अडवणूक करायची.  जुन्या आठवणीच सामान म्हणावं तर तसंही नाही.  पण काहीसुद्धा उरलंसुरलेलं कधीतरी भविष्यात उपयोगी होईल म्हणून ठेवून दिलेलं.  बाहेरून आलेला बॉक्स टाकायचा नाही की पिशवी टाकायची नाही.  अगदी पूर्वीपासून काटकसरीत आयुष्य काढलेलं.  बाटलीची झाकण जमवून त्यावर चाळीमध्ये असताना ती खारी टोस्ट घ्यायची.  तिची तीच सवय तिने अजूनपर्यंत ठेवली