Skip to main content

Posts

Showing posts from 2023

पप्पांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त

  महाभारतात श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला विराट रूप दाखवलं. संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं. तेव्हा अर्जुन म्हणाला, "देवा, या विश्वात इतकं वाईट चाललंय. इतकी वाईट माणसे आहेत. तर मग हे जग कसं काय शाबूत आहे." त्यावर कृष्ण म्हणाला, "या जगात जशी वाईट माणसे आहेत तशी काही चांगली माणसे सुद्धा आहेत ज्यांच्या मुळे हे संपूर्ण विश्व चांगलं चाललय, शाबूत आहे." आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आजचे उत्सवमूर्ती हे या चांगल्या माणसांपैकीच एक!   बाप म्हटल की कायम कुटुंबासोबत असणारा आधाराचा हात दिसतो.  ज्यांनी दिवस रात्र काम करावं, गरज पडली तर कुटुंबापासून दूर राहावं, अतोनात मेहनत करून स्वतःची स्वप्न बाजूला सारून फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात हे आमच्या  आधीच्या जवळपास सगळ्या पिढ्यांच समीकरण.  हल्लीची पिढी बाबाशी मैत्रीपूर्ण वागते, बाबाला अरे तुरे करते, प्रसंगी हक्काने भांडते, उलट बोलते.  आमच्या पिढीने बाबांना नेहमी आदरयुक्त भीतीने पाहिले आहे.  त्यांच्या नजरेत, आवाजात कायम जरब पाहिली आहे.  प्रसंगी प्रेम आणि वेळोवेळी धाक पाहिला आहे.  ही पिढी कदाचित मैत्रीपूर्ण नव्हती पण त्यांचे संस्

रणझुंजार

   रणझुंजार स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एखाद्या ठीपक्या एवढं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो पटींनी त्यांच्या हयातीत वाढवलं. त्यावेळी एवढ्या बलाढ्य शाह्या फोफावलेल्या असताना स्वराज्य स्थापनेचा विचार करण हे सुद्धा धाडसाचं होत. या कार्यात त्यांना कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागला. कितीतरी धाडसी प्रसंगाना समोर जावं लागलं. स्वतःची दुःख बाजूला सारावी लागली. अफजलखानच संकट स्वराज्यावर घोंगावत असताना त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई आपल्या लहान संभाजी राजांना जिजाऊंकडे सोपाऊन हे जग सोडून निघून गेल्या. त्यानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यात फक्त संघर्षच लिहिला होता. पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या सोयराबाईनी सत्तेच्या हव्यासापोटी संभाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, हबशी यांच्यासोबत लढता लढता त्यांच्यावर स्वकियांशीसुद्धा लढण्याची वेळ येऊन ठेपली. त्यांच्या कारकिर्दीची ९ वर्ष त्यांना फक्त लढतच राहावं लागलं. त्यांनी कोणत्याही परिस्थिती हार मानली नाही आणि निकराने लढा दिला. या गोष्टीचा स्वतः औरंगजेबाला इतका त्रास झाला कि तो भलेमोठे सैन्य घेऊन स्वतः स

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सॅंड्याच्या वाढदिवसानिमित्त

  आपल्या आयुष्यात लाईफ पार्टनरचा रोल महत्वाचा असतो आणि जर उद्योग असेल तर बिजनेस पार्टनरचा...आणि त्यात पार्टनरशी कनेक्शन स्ट्रॉंग असेल तर सोने पे सुहागा. चांगल्या माणसांच्या बाबतीत नशीब घेऊनच मी जन्म घेतला असल्यामुळे लहानपणापासूनच बरीच चांगली जीवाला जीव देणारी माणसं जोडली गेली...त्यातलाच एक...आमचा सॅंड्या. शाळेत एकत्र असल्यामुळे घरचेच संबंध. शाळेत लाजरा बुजरा, मोजकच बोलणारा. तसा शांत पण मस्तीखोर. त्याने वेगळे कोर्सेस घेतल्यामुळे कॉलेज वयामध्ये जास्त संबंध आला नाही पण तो नेहमीच घरी येऊन जाऊन असायचा. प्रत्येकाच्या फॅमिलीशी कनेक्ट स्ट्रॉंग. शाळेतले मित्र एकत्र भेटण्याच काही न काही निमित्त असायचंच त्यामुळे भेट होत राहायची. जेव्हा रायगडावर पहिल्यांदा बिजनेसचा विषय आला तेव्हा इतर तिघांबरोबर सॅंड्या तयार झाला आणि आमचं नातं मित्रापासून पार्टनर्समध्ये बदललं. इतक्या वर्षात बिजनेसच्या चढउतरांमध्ये मी बऱ्याच वेळा खचलो असेन पण तो कायम ठाम होता. प्रत्येक वेळी मला सांभाळून घेत, माझा फ्रीडम त्याने मला एन्जॉय करून दिला. मी जे नवीन काही करत होतो त्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं. स्वतः

मयाच्या वाढदिवसानिमित्त

  2009 साली पी. बी. सी. निमित्त आपली पहिली भेट झाली. दोघांचं राहण्याचं ठिकाण कामोठेच त्यामुळे ओळख आणि मैत्री वाढत गेली. प्रत्येक बुधवारी मिटिंग आणि उद्योजकांसाठी काम करणारे आपण दोघे धडाडीचे कार्यकर्ते, त्यातल्या त्यात उद्योगात दोघेही नवीन त्यामुळे आपली मैत्री बहरत गेली. स्ट्रगलचा बराचसा काळ आपण एकत्र घालवला आणि मग चार चौघात उठून दिसणाऱ्या "महेश" सरांच रूपांतर "मया"मध्ये झालं. तुझ्या नावात जरी शंकर देवाचं स्थान असेल तरी तुझं उग्र रूप मी इतक्या वर्षात पाहिलं नाही पण फायनान्स या विषयावर तू मार्केटवर नेहमी राज्य करत राहिलास. मंगेश नेहमी मस्करीत म्हणतो, " महेश जोक्स पण फायनन्सवरच मारतो. इतर कोणत्याही विषयावर बोलायला लागला तर पाचव्या मिनिटाला तो फायनान्स या विषयावर येतो", हे ऐकताना थोडं गंमतीदार वाटलं तरी मंगेश किंवा आम्हा सगळ्यांना डाऊन दी लाईन एक गोष्ट माहितेय की तू फायनान्स हा विषय कोळून प्यायला आहेस. यापेक्षा एका यशस्वी उद्योजकाच लक्षण ते काय असू शकत? कुठे किती बोलायचं आणि कुठे किती वेळ थांबायचं किंवा वेळेचा प्रॉडक्टिव्ह वापर कसा करायचा हे तुला अगदी