Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

...म्हणूनच ते "थोर" असतात

मला टीव्ही पाहायला फारसा आवडत नाही पण रात्री जेवताना चालू असल्यामुळे जेवण होईपर्यंत जे काही चालू असेल ते बघावं लागतं. आज "दोन स्पेशल" हा कार्यक्रम बघण्याचा योग आला. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत हे आजचे पाहुणे होते. दोन्ही कलाकार माझे आवडते म्हणून इंटरेस्टने त्यांचे किस्से ऐकत होतो. त्यात अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा मनाला फारच स्पर्शून गेला. कलाकार जरी असला तरी त्याला स्वतःच भावविश्व असतं. त्यालाही भावना असतात. त्याचंही कुणाशी नातं असतं अशा जितेंद्र जोशींच्या विषयावर "कलाकाराच्या भावविश्वाशी कुणाला काही घेणं देणं नसतं. त्याने त्याचं काम करत राहिलं पाहिजे", म्हणत त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. अशोक सराफ यांच्या एका विनोदी सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि त्याचवेळी त्यांचे बाबा सिरिअस होते. त्यांचा छोटा भाऊ हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत होता. बाबा हॉस्पिटलमध्ये सिरिअस असताना मनाची घालमेल होणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक सीननंतर ते भावाला फोन करून परिस्थिती विचारत होते. फोनवर भाऊ फक्त श्वास चालू आहे एवढंच कन्फर्म करत होता. अशाच एका सीनच शूट