Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा. 

खाकीमागचा माणूस

======================================== परवा सहज माझ्या रुपेश नावाच्या मित्राबरोबर चर्चा करताना पोलीसांचा विषय निघाला.  त्याच्या कारमधला ऑडिओ सिस्टम चोरीला गेल्यानंतर त्याला ठाण्यातल्या वर्तक नगर पोलीस स्टेशनमधील "श्री. ज्ञानेश्वर आव्हाड" नावाच्या पोलीस अधिकारी साहेबांनी कशी मदत केली हे तो सांगत होता.  त्यावेळी बेदरे सरांची आठवण आली.  बेदरेसर हे माझ्या आयुष्यातले पहिले पोलीस ऑफिसर ज्यांच्याशी मी समोरासमोर भेटलो आणि बोललो.  त्याअगोदर पोलिसांबद्दल माझं मत काही खास चांगलं नव्हतं.  त्यानंतर एखाद वर्षांनी संजय गोविलकर दादा भेटले आणि खाकीमागच्या खऱ्या प्रेमळ माणसांची भेट झाली. ======================================== दहा वर्षांपूर्वीची गोष्ट.  मी जॉबला लागल्यानंतर मामाचा मुलगा श्याम पहिल्यांदाच मुंबईमध्ये आला होता.  घरात पार्टी व्हावी म्हणून पावभाजी घेण्यासाठी आम्ही बाईकवर दोघेही चेंबूरला सदगुरू रेस्टोरंटमध्ये गेलो होतो.  सदगुरुची पावभाजी खूपच फेमस आहे.  चेंबूरला पार्किंगचा नेहमीचाच इश्यू.  त्यात सदगुरु एकदम स्टेशनबाहेरच नाक्यावर असल्याने तिथे तर गाडी लावायला चा