Skip to main content

Posts

Showing posts from 2017

जिस चीज को सच्चे दिल से चाहो....

"पप्पा, मी  बनणार तर शिवाजी महाराजच बनणार.  नाहीतर काहीच नाही", अर्ध्या झोपेत सकाळी अंथरुणातच सार्थक मला सांगत होता.   "अरे बाळा, नाही मिळाला कॉश्च्युम महाराजांचा तुझ्या साईझचा.  आता कसं करायचं मग?  अरे हा बघ ना हा कन्सेप्ट मस्त आहे. ", माझ्या मोबाईल वर डाउनलोड केलेली इमेज त्याला मी दाखवली.  त्यात मलमपट्टी केलेल्या एका मुलाचा फोटो होता आणि एक पाटी गळ्यात अडकवली होती, "आय अर्ग्युड विथ माय वाइफ".  मी फक्त तो मॅटर चेंज  करून मस्त एक कविता बनवली होती.   "चालताना रस्त्यावर किंवा असाल जेव्हा गाडीवर  बाजूला ठेवा मोबाईल आणि लक्ष ठेवा रस्त्यावर  घरी वाट पाही कुणी जीव नसे हा स्वस्त  मोबाईलच्या नादात हे आयुष्य होईल उध्वस्त" या वेषभूषेसाठी घरात फर्स्ट एडच सगळं सामान पण तयार होत.  मी त्याला अंथरुणात त्याच्या बाजूला पडून फोटो दाखवता दाखवता ती कविता ऍक्टिंग करत ऐकून दाखवली.  मला वाटलं तो कन्व्हिन्स होईल पण तसं झालं नाही.   "तुम्ही बाईंना फोन करून सांगा सार्थक भाग घेत नाही.  माझा नाव काढून टाका", तो अगदी ठाम होता.  तशी प्रत

संस्काराचे भजी

- सुबोध अनंत मेस्त्री "आई तू पप्पाला मारायची भरपूर लहानपणी?", सार्थकने आईला प्रश्न केला. "तुझा पप्पा काय पण सांगतो.  एवढी पण काय मारत नव्हते.  पोरं मस्तीच तेवढी करायची तर काय?  मोठे पप्पा (दादा) आणि अण्णा मस्ती करायचे.  हा नसायचा त्यांच्यात.  उगाच कायपण सांगत बसतात .  बायकांना खरं वाटायचं आधी यांच्या", आई कोणती गोष्ट कुठे जोडेल याचा नेम नाही. "पण एकदा घरी कुणीतरी आलेल  आणि मोठे पप्पा आणि पप्पांना पैसे दिलेले.  त्यांनी जाऊन भजी खाल्लेली ना.", सार्थक मला चिडवत मोठमोठ्याने हसायला लागला आणि नंतर म्हणाला,"तेव्हा मारलेलास ते पप्पाला", पुन्हा हसायला लागला.  त्याला कधीतरी हे मी किंवा दादाने सांगितलं असेल "तुला बरं हे सगळं आठवतं.  मारायलाच पाहिजे.  हावरेपणा केल्यावर मग काय?  म्हणून तुला पण सांगत असते कुणी काही दिल्यावर लगेच त्यांच्या समोर खायला घ्यायचं नाही किंवा कुणी काही देत असेल तर लगेच घ्यायचं पण नाही",  स्वतःवर डाव पलटलेला पाहून तो पुन्हा आपल्या वहीवर अभ्यास करण्यात रमला.  अभ्यास करताना असाच मध्ये काहीतरी विषय काढून टंगळ

दूरदर्शन आणि मी

संध्याकाळी माझ्या एका कामानिमित्त बेलापूर स्टेशनजवळ गेलो होतो इतक्यात एका अनोळखी नंबरवरून फोन वाजला.  संध्याकाळी ७ किंवा ७.३० ची वेळ असेल.  आजूबाजूला बराच गोंधळ असल्याने मला नीट ऐकू येत नव्हतं.  मी थोड्या वेळात कॉल करतो सांगून व समोरून "ठीक आहे" असं पुसटस ऐकू आल्यावर फोन कट केला.  नेमका फोन कुठून आलाय हे मला कळालं नव्हतं. माझं काम झाल्यावर मी परतीच्या वाटेवर असताना पुन्हा त्याच नंबर वर कॉल लावला.  "नमस्कार, थोड्या वेळापूर्वी आपला कॉल आला होता.  सॉरी तुमचा आवाज आला नाही म्हणून कट करावा लागला", मी फोन लागल्याबरोबर सांगण्यास सुरुवात केली.  "नाही काहीच हरकत नाही.  मी निखिलेश चित्रे बोलतोय.  दूरदर्शनमधून", समोरून आवाज आला.  आता आवाज बऱ्यापैकी क्लीअर होता. "नमस्कार निखिलेशजी बोला", मी त्यांच्या बोलण्यास दुजोरा दिला "मी तुमचा ब्लॉग वाचला.  आम्हाला टेक्नॉलॉजी व सोशल मीडियासंदर्भात न्यूजमध्ये बोलण्यासाठी एका तज्ज्ञाची आवश्यकता होती.  तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जे काही मांडलय ते तुम्ही न्यूज मध्ये सांगू शकाल का?", निखिलेशजी

आठवणीतला गारवा

आठवणीतला "गारवा" - सुबोध अनंत मेस्त्री आमच्या घरातला दीड दिवसाचा गणपती निघायला तसा अजून तासभर वेळ बाकी होता.  घराच्या मोठ्या खिडकीला लागून प्लास्टिकच्या आराम खुर्चीवर मी बाहेरचा पाऊस पाहत रेलून बसलो होतो.  रात्रीच बऱ्याच वेळेचं जागरण असल्याने सगळे बेडरूममध्ये आराम करत होते.  आमच्या करंजाडेच्या  घराच्या खिडकीसमोरूनच डोंगर सुरू होतो. बिल्डिंग आणि डोंगरामध्ये फक्त एक छोटा  रस्ता.  डोंगर सुरू होतानाच पायथ्याशी एक झोपडी.  कदाचित बाजूला बिल्डिंगच काम चालू असणाऱ्या कामगाराची असेल.  गावाच्या घराला शोभेल अस विटांच घर.  घरासमोर बांधलेल्या बकऱ्या पावसात भिजत होत्या.  घराच्या मागे चढणीवर झुडपं साफ करून त्यांनी काही भाज्यांची लागवड केली आहे.  तिथून थोडं चढण गेल्यावर एक खड्डा आहे ज्यातून उरणवरून माल वाहून नेणाऱ्या मालगाडीचा ट्रॅक जातो. पुढे पुन्हा थोडा डोंगर नंतर पनवेल पासून उरण ला जाणारा एक्सप्रेसवे आणि तो रस्ता क्रॉस केल्यावर खऱ्या डोंगराची सुरुवात.  हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही.  अस वाटत की खिडकीसमोरच्या रस्त्यासमोरूनच डोंगर सुरू होत असेल.  या डोंगराच्याम

शिवी

*शिवी* - सुबोध अनंत मेस्त्री ======================================================================== "सुबू, जरा सार्थककडे लक्ष दे. काल घरात शिवी दिली त्याने. म्हणजे सहज बोलता बोलता बोलला", प्रतिभा आणि मी ट्रेन मधून घरी येत होतो. दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या पॅसेज मध्ये ती जाळीबाजूच्या पार्टिशनला टेकून उभी होती आणि मी तिच्या समोर. ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. "काय दिली शिवी?", मी प्रतिभाचा चेहरा बघून मुद्दाम विचारलं. तिला शिव्या पहिल्यापासूनच आवडत नाहीत. "अरे ती बहिणीवरून देतात ना ती. मला अगोदर समजलं नाही. मी पुन्हा अण्णांना ऐकायला सांगितलं. तर शिवीच होती ती", ती त्रासिकपणे सांगत होती. "बरं मग", मी विचारलं. "बर काय? तू समजाव त्याला. मी विचारलं कुठून शिकला तर सांगत होता की बाहेरून एक मुलगा येतो सोसायटीमध्ये. तो शिव्या देतो. तू घरी असशील तेव्हा बघ कोण आहे तो मुलगा आणि समज दे त्याला. बिल्डिंगमध्ये येऊ नको सांग", जशी एका आईची चीडचीड व्हावी तशी स्वाभाविकच तिची होत होती. "त्याने काय होईल. सार्थक पुन्हा शिवी ना

४९ रुपयांचं कर्ज

*४९ रुपयांचं कर्ज* - सुबोध अनंत मेस्त्री ======================================================================== शाळा सोडून आता 16 वर्ष झाली. शाळेतल्या शिक्षकांनी खूप चांगल्या सवयी आमच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या एक होत्या चौधरी बाई. माझ्या आईनंतर ज्यांनी मला आईसारखी माया लावली असेल त्या चौधरी बाई होत्या. अजूनही बाईंना भेटलो आणि वाकून नमस्कार केला की "खूप मोठा हो", असा आशीर्वाद मिळतो आणि काहीतरी करण्याची जिद्द. उद्या चौधरी बाई शाळेतून रिटायर्ड होत आहेत. त्यांच्या एका आठवणीचा हा लेख. ======================================================================== सातवीची नऊमाई परीक्षा होऊन गेली होती. गणिताची भीती मला असायचीच आणि त्यात नापासही झालो होतो. मला त्यावेळी क्लास लावण्याची भारी क्रेझ होती पण घरची परिस्थिती पप्पांच्या बेताच्या कामामुळे तशी चांगली नव्हती. "दादा अण्णा झाले पास क्लास न लावता. तुला कशाला पाहिजे क्लास. तू हुशार आहेस", अस बोलून आई नेहमीच माझी क्रेझ उतरवायची. मला आता वार्षिकच टेन्शन होत. पुढच्यावर्षी याच वर्गात राहा