Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

ये उडी उडी उडी

*ये उडी उडी उडी* - सुबोध अनंत मेस्त्री ================================================ "ए आयुष्यात कधी पतंग हातात तरी धरलेलीस का?" अजाने टोमणा मारलाच. "हा तू मोठा शहाणा ना.  तुला येते का? मी उडवलीय लहानपणी", मी थोडा उखडलो होतो. "सुबोध भावोजी चिडले", म्हणत पूनम चिडवायला लागली पण माझ लक्ष सध्या कणी बांधण्यात  आणि प्रसाद पासून फिरकी वाचवण्यात गुंतलं होत.  आम्ही ५ जण पतंग उडवणारे आणि फिरक्या फक्त तीनच.  त्यात दादा आणि सुनील दादा कणी बांधून पतंग उडवायला गेलेसुद्धा.  माझी आणि प्रसादची फिरकीवरून एकमेकांची फिरकी घेणं चालू होत. अजा कधी प्रसाद ची बाजू घ्यायचा कधी माझी.  मी फिरकी प्रतिभाकडे दिली आणि कणी  बांधायला सुरुवात केली. खरं तर मी या आधी ना स्वतःहून कधी कणी बांधली होती ना पतंग उडवली होती.  लहानपणी आमच्या चाळीतला कुणी मोठा दादा पतंग उडवायचा आणि मी फिरकी धरायला उभा राहायचो.  मग एकदमच उंचावर पतंग जाऊन मूक(स्थिर) झाली कि माझ्या हातात फक्त मांजा धरायला द्यायचा.  हाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी.   बीचवर हवा जास्त असल्याकारणाने पतंग आपोआप उडेल या विचाराने

चाळभेट

- सुबोध अनंत मेस्त्री ===================================================================== बरेच दिवस आमच्या चाळीत जाण्याचा विचार मनात घोळत होता. रविवारी रात्री समीरच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तो योग जुळून आला. आम्ही चेंबूर सोडल्यापासून चाळीत जाण्याचा प्रश्न सहसा उद्भवत नव्हता आणि चेंबूरला गेल्यावर चाळीच्या दिशेने जाणं झालंच तरी चाळीला वळसा मारूनच जायचो कारण नेहमीचीच घाई. कुणी भेटलं तर वेळ जाईल आणि नंतर तोंडावर टाळता येत नाही म्हणून आधीच घेतलेली ही काळजी. दादा आणि मी अगदी ठरवून तासभर वेळ काढूनच मागच्या गल्लीतून आमच्या चाळीत शिरलो. माणूस सुखावतो तो जुन्या आठवणींमध्ये हे कुठेतरी वाचलं होतं. ह्या चाळीत मी वयाची पहिली 24 वर्ष काढली होती. बालपण इकडेच काढल्यामुळे घाटल्यातल्या गल्ल्या न गल्ल्या पाठ होत्या. सुरुवातच एकदम जिगरी बालमित्रपासून करण्याचं ठरलं होतं. त्याला दोन चार कॉल लावून झाले होते पण त्याने काही फोन उचलला नाही. डायरेक्ट घरीच जाऊ अशा विचाराने त्याच्या घरी शिरलो. चाळीत एक बर असत, सकाळी उघडलेले दरवाजे सरळ रात्री झोपतानाच कडी लावून बंद होतात. लहानपणी त्यामुळेच

अर्धांगिनीस पत्र

10 वर्ष !!!  2007 ते 2017. किती वेगळं आहे हे सगळं.  आपण प्रेमात काय पडलो...लग्न मोडता मोडता झालं काय आणि आता लग्न होऊन 10 वर्ष झाली.  किती सहज निघून गेली इतकी वर्षे.  आता आठवलं तर खरच इतका काळ लोटला आहे का असा प्रश्न पडावा इतक्या सहज.   मला तो दिवस अजून आठवतो जेव्हा तू सकाळी 7 वाजता चेंबूरच्या आपल्या घरी मला सांगायला आली होतीस की आपलं लग्न होऊ शकत नाही.  त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुझ्या घरी आपल्याबद्दल समजल्यामुळे त्यांनी विरोध केला.  तुझ्या आईसाठी तू इमोशनल झाली होतीस.  त्या दिवशी किती रडली होतीस तू?  तुझं रडणं थांबावं म्हणून मी माघार घेतली आणि सांगितलं नाही करायचं लग्न.  (थोडक्यात हे मोडल्यासारखंच झालं).  हा सगळा प्रकार बघून माझ्या आईला टेन्शन.  तिला वाटायचं ही याच्या आयुष्यातून गेली तर हा देवदास होईल.  मग मी नंतर ऑफिसला सुट्टी टाकली.  मग 3-4 तास आपण एकत्र घालवल्यावर तुझा विचार पलटला आणि लग्न करायचंच असा ठाम निर्णय मला सांगितलास.  केवढे होतो आपण तेव्हा?  फक्त 21-22 वर्ष.  मी नोकरीला लागून नुकतेच 5-6 महिने झाले होते आणि पगार फक्त 5 हजार.  तुझा निर्णय परत घरी जाऊन बदल