Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

रिकनेक्शन

  काही दिवसांपूर्वी चौधरी बाईंनी फोन न करण्यावरून माझी कानउघडणी केल्यापासून केव्हा एकदा त्यांना भेटतो असं मला झालं होतं आणि शेवटी तो योग आला.  घाटकोपरला "नन्ही कली" उपक्रमाचा सेशन संपवून बाईंच्या घरी जायचं ठरलं.  बाईंना आदल्यादिवशी तशी कल्पना देऊन ठेवली होती.  "मी कुठे जातेय.  मी मोकळीच आहे.  केव्हाही ये", बाईंच्या या उत्तराने आमची भेट पक्की झाली.  बाईंना फोन केला तेव्हा बाई चेंबुरलाच शाळेसमोरच्या त्यांच्या जुन्या घरी मोठ्या मुलाच्या घरी होत्या.  तिथूनच त्यांच्यासोबत देवनारच्या घरी जायचं ठरलं.  त्यांना घेण्यासाठी गाडी घेऊन शाळेसमोर आलो.  त्यांच्यासमोर हाफ पॅन्टवर फिरणारी आम्ही मुलं.  मी गाडी घेऊन आलोय बघून त्या खूपच खुश झाल्या.  त्या गाडीत बसणार म्हणून मलाही आनंद होताच.  दरवाजा उघडून त्यांना गाडीत बसवलं.  मागे प्रतिभा आणि त्या, पुढे मी आणि सार्थक.   सातवीला चौधरीबाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या.  शाळेसमोरच त्यांचं घर.  एकदा बाई आजारी म्हणून शाळेत आल्या नाहीत.  आम्ही तिघे-चौघे हिम्मत करून त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो.  बाईंनी आमचं स्वागत केलं.  आम्ही त्यांना भेटा

रायगड

  काही क्षण आयुष्यात खास असतात. त्या क्षणात आयुष्य पलटून देण्याची ताकद असते. माझ्या आयुष्यात तो क्षण जानेवारी २००९ मध्ये आला होता जेव्हा मी शाळेतल्या मित्रांसोबत पहिल्यांदा रायगडावर गेलो होतो आणि स्वतःची कंपनी चालू करण्याबाबत त्यांच्यासमोर विचार मांडला होता. जुलै २००९ मध्ये स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करणारी "स्वराज्य इन्फोटेक" आम्ही ५ मित्रांनी मिळून स्थापन केली होती. आज पुन्हा एकदा १२ वर्षांनी तोच क्षण जगण्याची आणि रायगड पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची संधी मिळाली. प्रोजेक्टच्या निमित्ताने दादाने रायगडावर जाऊ अशी कल्पना तीनेक दिवस आधी मला दिली. आम्हा दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतो त्यामुळे त्याला सहसा नाही म्हणणं मला जमत नाही आणि त्यात रायगड म्हटल्यावर नकाराची शक्यता नव्हतीच. सुनील दादा, समीर, मोहित ही सोबत होतेच. अख्खी रात्र गडावर काढायची या कल्पनेने आम्ही सगळेच हुरळून गेलो होतो. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जगदीश्वराच्या मंदिरात ध्यानसाधना करण्याचा भक्कम प्लॅनसुद्धा झाला होता. आम्ही दुपारी तीन-साडे तीन दरम्यान पोहचलो पण गडावर पोहचल्यापासूनच हिरमोड व्हायला सुरुव