Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

वि प्रेफर स्मार्ट लँग्वेज

*वि प्रेफर स्मार्ट लँग्वेज* - सुबोध अनंत मेस्त्री ========================================================== "एक्स्क्यूज मी....आर यु गाईस लोकल हिअर?",  एक तिशी पस्तीशीतल्या तरुणाने आमच्या जवळ येऊन विचारलं.  सामान्य मध्यमवर्गीय घरातला, गोल चेहरा, सावळा वर्ण, इन शर्ट आणि हातात नायलॉनची झिप असलेली बॅग.  त्याच्या बोटाला धरून एक 5-6 वर्षाची फ्रॉक घातलेली मुलगी खेळत होती.  बेळगाववरून परतताना नरसोबाची वाडी करून संजय दादांनी आम्हाला कोल्हापुरात सोडलं होत.  रिजर्वेशन केलेल्या बसला यायला अजून 3-4 तास होते.  तेवढ्या वेळात महालक्ष्मी मंदिर, त्याच्या बाजूचा शाहू महाराजांचा राजवाडा आणि नंतर जेवण असा प्लॅन आम्ही केला होता.  मंदिरात लाईन पाहून मी आणि दादाने मुखदर्शन घेण्याचं ठरवलं.  राजेश भाई लाईन मध्ये उभे होते आणि आम्ही त्यांची वाट पाहत मंदिराच्या आवारात गप्पा मारत उभे असताना या तरुणाने आम्हाला गाठलं होत. "नो, वि आर नॉट.  वी आर फ्रॉम न्यू बॉम्बे",  मी त्याच्याकडे पाहून उत्तर दिल. "व्हीच लँग्वेज डु यु प्रेफर....आय मिन हिंदी, मराठी, इंग्लिश?", त्याने विचारल

बोल दो ना जरा

* बोल दो ना जरा * - सुबोध अनंत मेस्त्री ================================================ ========================= "पप्पा, माझ्या खडशिंगड (मूळ नाव खरशिंगर पण ते सार्थकला अजून व्यवस्थित उच्चारता येत नाही) टीचर खूप मस्त शिकवतात. मारत पण नाही आम्हाला. मला भरपूर आवडतात या टीचर", एकदा सहज मी सार्थकला त्याच्या क्लास टीचरबद्दल विचारलं होत तेव्हा त्याच्याकडून हे उत्तर मिळालं होतं. "आपण तुझ्या शेवटच्या पेपरच्या दिवशी बाईंना पत्र लिहू. त्यात तुला जे वाटत टीचरबद्दल ते लिही. टीचरना आवडेल सांगितलंस तर", मी त्याला सुचवलं. त्याने सुद्धा "चालेल" म्हणून होकार दिला. सार्थकच पहिलीच वर्ष असल्याने त्याला पहिल्या दिवशी मी शाळेत घेऊन गेलो होतो व नेमकी फी रिसीट न्यायला विसरलो. त्या दिवशी बाईंची आणि माझी पहिली भेट झाली. 60 च्या घरात बाईचं वय असेल. डोळ्यावर चष्मा आणि अत्यंत साधं राहणीमान. कुठेच आधुनिकतेची जोड नाही. त्यांनी मला रिसीट शिवाय सार्थकला शाळेत बसविण्यास स्पष्ट नकार दिला. मी उद्या रिसीट पाठवतो सांगून पण त्या काही ऐकेनात. "अहो अस कुणीही येऊन