Skip to main content

दी "डींगणी" फाईल्स

 


"चाचा अल्लाह से वैभव के लिये दुवा मांगो.  वो पहले की तरह ठीक होना चाहिए", दर्ग्याच्या बाहेर बाकड्यावर बसलेल्या चाचांना मी विनंती केली.  ते बहुतेक तिथले मुख्य असावेत.  वैभवला दर्ग्यामध्ये जाण्यासाठी शूज काढावे लागतील आणि पुन्हा घालायला त्रास म्हणून तो बाहेर त्या चाचांशी गप्पा मारत उभा होता.  "हमने तो मन्नत मांग रखी है.  वैभव हमारे भावकी का है.  हम उसको अलग नही मानते.  दर्गा का पुरा काम ऊसिने किया है.  कूच काम रहेगा तो हम सुभाष (वैभवचे बाबा) को नहीं.  वैभव को फोन करते थे.  बच्चे की किस्मत मे ये क्या आ गया.  ठीक तो ऊसको होना ही है.  उसके अलावा हमको भी नहीं जमता",  चाचांनी थोडस भाऊक होऊन आम्हाला सांगितलं.  


फूणगुस हे आमच्या बाजूचं गाव.  डिंगणी आणि फूणगुस मध्ये एक खाडी आहे आणि त्या दोन गावांना जोडणारा खाडीवरचा पुल.  त्या पुलावर बरेच लोक संध्याकाळी फिरायला किंवा गळ टाकून मासे पकडायला येतात.  वैभव हल्ली काही दिवस सुपरवायजर म्हणून फूणगुसमध्ये एका मुस्लिम फॅमिलीकडे काम पाहत होता.  कोव्हिडच्या पहिल्या फेज मध्ये त्याला ब्रेनस्ट्रोक चा अटॅक आला आणि त्याचा डावा पाय आणि हात अधू झाला.  जेमतेम पस्तिशितला.  एवढा धडधाकट वैभव हतबल झालेला कुणाला पाहवत नव्हता. या एका घटनेने सगळे हळहळले.  पण या दीडेक वर्षात त्याच्यात बरीच सुधारणा झाली होती.  पूर्वी पाय सरकवत काठीचा आधार घेऊन चालणारा वैभ्या आता काठीशिवाय पाय उचलून चालतोय बघून बरं वाटत होतं.  हातामध्येही काही प्रमाणात फरक जाणवत होता.  फूणगुसच्या कामासाठी त्याला न्यायला आणायला गाडी होती किंवा गाडी नसेल तर कुणी ना कुणी घेऊन जायला असायचाच.  आम्ही पुलावर फिरायला आणि त्याला आणण्याच्या निमित्ताने गेलो  होतो तिथूनच दर्ग्यात जाण्याचा विचार केला.  आमची दर्ग्यात जाण्याची ही पहिलीच वेळ.  दर्ग्यामध्ये त्यांच्या रोजप्रमाणे प्रार्थना चालू होत्या.   मकबऱ्याच्या बाजूला असणाऱ्या लाकडी स्टँडला वैभवसाठी मन्नत म्हणून वहिनीने धागा बांधला.


दर्ग्यातून निघाल्यावर पुन्हा पुलावर आलो.  तिकडे कायम रिक्षा उभ्या असतात.  तिथले सलमान, सायलू सारखेच कित्येक वैभवचे मित्र आणि चाचा.  वैभवने हक्काने त्यांना गोष्टी मागाव्यात आणि त्यांनी त्या पूर्ण कराव्यात.  वैभव बरा असताना तोही या प्रत्येकासाठी तितकाच उपयोगी पडला होता.  "अरे सायलू, शामकु रॉड (फिशिंग रॉड) लेके आ.  रातको मच्छी पकडते.  अब किधरको जातास?", पुलावरून जात असलेल्या रिक्षाला थांबवत वैभवने विचारलं.  "संगमेश्वरको जाके आता.  आने के बाद फोन करता तेरेको", मोहल्यातल्या मुलांची भाषा बोलण्याची एक वेगळी शैली आहे.  वैभव तिकडे असला की त्यांच्यातलाच एक असतो.  हल्लीच मोहल्ल्यातल्या एका माणसाने जिल्हास्तरीय क्रिकेट सामने भरवले होते ज्यामध्ये पहिलं पारितोषिक लाख रुपयाचे होते.  या साखळी सामन्याच्या सुरुवातीला वैभवचा जाहीर सत्कार करण्यात आला.  त्याला स्वतःच्या हाताने जमत नाही म्हणून त्याचे शूज काढण्यासाठीसुद्धा मोहल्ल्यातली माणसं वाकली होती.  

आईच्या श्राध्दासाठी घरी काही खुर्च्यांची गरज होती.  तेवढ्या खुर्च्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये उपलब्ध होत्या पण पंचायत ऑफिस शनिवार असल्याने बंद होत.  उशिरा संध्याकाळी आम्हाला खुर्च्या मिळाल्या त्यासुद्धा गावाच्या मशिदीमधून.  घरात दहाएक दिवसांपूर्वी लग्न झालेलं त्याच्या मंडपाचे बांबू अंगणात तसेच उभे होते.  त्यावर टाकायला कापड पण आम्हाला मोहल्यातल्या माणसाने दिलं.  अगदी लहानपणापासून आम्हाला मोहल्यातली सगळी माणसे आमचीच वाटतात.  जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांसोबत कसं वागावं हे गावाला समजत.   "हिंदू मुसलमान यांच नातं काय असतं हे बघायचं असेल ना तर त्यांना इथली लोक दाखवायची.  कसे एकमेकांसाठी वागतात हे लोक.  पण काही लिहायला जा या विषयावर.  मग बघ लोक  सोशल मीडियावर याला कसे धर्मात बांधतील", माझी आणि दादाची चर्चा या गोष्टीबद्दल झाली तेव्हा दादा मला म्हणाला.  "देअर आर फिव पीपल ऑन सोशल मीडिया, हू आर देअर टू क्रिएट न्यूसन्स व्हॅल्यू", महेश मांजरेकर कोणत्या तरी कार्यक्रमात हे वाक्य म्हणाले होते ते आठवलं.  प्रत्येक धर्म मानवता शिकवतो.  त्याचा विपर्यास करणारे जगात असेही सगळीकडे आहेतच.

- सुबोध अनंत मेस्त्री


Comments

  1. Well said bro....proud to be Indian

    ReplyDelete
  2. काल्पनिक वाटावं असच आहे...
    सर्वत्र हे चित्र असतं तर किती छान असतं...
    विशेषतः मुंबईत चित्र वेगळं आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. Hoy...Nakkich badalel...Saglyani prayatna kele tar :)

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी