Skip to main content

Posts

कुर्ला ते मॉरिशस

  “काकी तू आता रिटायरमेंट घेऊन पुस्तक लिहायला हवंस” अस कित्येक वेळा काकीशी बोलणं झालं असेल. तिची मुख्याध्यापिकेची नोकरी, तिथली जबाबदारी, तिची समाजसेवी कामे यातून तिला तशी फुरसत मिळणं कठीणच. त्यात २५-३० वर्षापूर्वी झालेलं तिचं फुफुसाचं मोठं ऑपरेशन. एवढ्या अवघड परिस्थितीतून नोकरीतल्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची तब्येत सांभाळत लिखाण करणं थोडं अशक्यच होतं. पण तिचे विचार लोकांपर्यंत पोहचायला हवेत या अनुषंगाने आम्ही तिला विनंती करायचो. आणि शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं. काही दिवसांपूर्वी कवितेचं पुस्तक करायचं अस काकीने बोलून दाखवलं आणि आम्ही कामाला लागलो. कोणत्या ना कोणत्या स्पर्धेच्या निमित्ताने काकीने प्रासंगिक कविता केल्या होत्या व त्यात तिला बक्षीसही मिळाली होती. सगळ्याच कविता अप्रतिम होत्या. कौतुक म्हणजे वीस एक वर्षापासूनच्या या सगळ्या कविता काकीने जपून ठेवल्या होत्या. प्रत्येक कवितेवर टाकलेल्या तारखेमुळे आम्हाला ते कळालं. पुस्तकावर काम करण्याचा उत्साह वेगळ्या लेव्हलचा होता कारण हे पुस्तक मॉरिशसला प्रकाशित होणार होतं. समीरच्या मिडाशियन टचने पुस्तकाच अप्रतिम डिजाईन झालं आणि अखेरी...

“श्रीकांत” - एक प्रेरणादायी अनुभव

  नो ऍक्शन सीक्वेंस…नो रोमांटिक सिन्स…ना मसाला…ना खूप लक्षात राहतील अशी गाणी…फक्त कंटेंट स्ट्राँग असेल तर एक अख्खा मूवी तुम्ही कुठेही विचलित न होता पाहू शकता आणि प्रचंड सकारात्मकता घेऊन थिएटर बाहेर पडू शकता….श्रीकांत पाहिल्यावर हा अनुभव आला. माणसाने जर ठरवलं तर त्याच्यासाठी कोणतंच लिमिटेशन राहत नाही…जन्मापासून आंधळा व्यक्ती आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर ठरवलं ते सगळं मिळवू शकतो…अगदी सिस्टमला चॅलेंज करून बदलण्यास भाग पाडू शकतो…सत्य घटना आहे हे माहीत नसतं तर कदाचित फक्त मूव्ही म्हणून एंजॉय केला असता पण रिअल श्रीकांत शेवटी जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा फक्त अभिमान वाटत नाही तर एक वेगळीच ऊर्जा मिळते… आंधळा मुलगा जन्माला आला म्हणून नातेवाईकांपासून शेजारचे नुकत्याच जन्मलेल्या श्रीकांतला संपवण्यासाठी त्याच्या आई बाबांना उपदेश करतात आणि त्यावेळी ते पाप होता होता राहिलं म्हणूनच आज एक जबरदस्त प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये राहिलं…बापाला श्रीकांतच्या भविष्याची चिंता असते म्हणूनच की काय संपूर्ण चित्रपटात सतत “पापा कहेते है बडा नाम करेगा” हे आपल्या ओळखीच ९० च्या दशकातलं गाणं वाजत राहतं आण...

जीवात्मा जगाचे कायदे

  "चांगली कर्म करशील तर स्वर्गात जाशील नाहीतर नरकात जाशील", अशी वाक्य सहजासहजी लहानपणापासून आपल्या कानावर पडत आली असतील. "मेल्यानंतर कुणी बघितलंय रे...जे आहे ते सगळं इकडेच", हे वाक्य सुद्धा अगदी कॉमन. पण पृथ्वीवर फक्त आपण आपल्या आत्म्याचा विकास करण्यासाठी आलोय अशा अनुषंगाने "जीवात्मा जगाचे कायदे - लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड" हे खोरशेद भावनगरी यांचे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करते. खोरशेद भावनगरी यांची दोन मुले अगदी तरुण वयात मोटार अपघातात दगावली. उतार वयात हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना ही घटना मान्य होत नव्हती. अशा काही व्यक्ती आहेत ज्या जीवात्मा जगाशी आपल्याला संपर्क करून देतात हे त्यांना कुणीतरी सुचवले. व त्यांच्या मदतीने खोरशेद यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांच्या आत्म्याशी संपर्क सुरू केला. त्यांच्या मुलांनी मृत्यूनंतरच्या आयुष्यावर सांगितलेल्या गोष्टींवर हे पूर्ण पुस्तक आधारित आहे. बऱ्याच गोष्टी मानन्या न मानन्यावर आहेत पण शिकण्यासारखं या पुस्तकातून बरच काही आहे. जसं की, एखाद्याला मदत केल्यावर तो विचारसुद्धा तुमच्या मनाला पुन्हा शिवला नाही...

ययाती

  बरेच दिवस या कादंबरीबद्दल ऐकून होतो. कुरू कुळातील राजा ययाती. त्याचे बाबा नहुष यांनी इंद्रावर विजय मिळवून ऋषींनाच पालखीचे भोई बनवले आणि विजयाच्या उन्मादात त्यांना लाथाडले. “नहुषाची मुलं कधीच सुखी होणार नाहीत” या एका ऋषींच्या शापाने ययाती आणि त्याचा भाऊ यति याचं आयुष्य पालटून गेलं. तस पाहिलं तर पुराणातली जादू-आश्चर्याने भरलेली एक कथा पण त्यातली पात्र आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. विजयच्या उन्मादात गर्विष्ठ झालेला नहुष राजा, वासनांध आणि फक्त भौतिक सुखात समाधान शोधणारा ययाती, सूडाच्या भावनेने आयुष्य जगणारी देवयानी, कोपिष्ट शुक्राचार्य, आयुष्यच तत्वज्ञान कळलेला आणि वेळोवेळी कठीण प्रसंगात उभा राहणारा कच, पितृआज्ञेपोटी दासित्व स्वीकारणारी आणि दुसऱ्यांच्या विचाराने प्रेमाचा त्याग करणारी श्रमिष्ठा. माणसाच्या दुर्गुणांना जोपर्यंत तो जोपासत राहतो तोपर्यंत ते त्याचा छळ करीत राहतात यावर वि. स. खांडेकर म्हणतात, “वासना ही अशी गोष्ट आहे जिचा आपण जितका उपभोग घेऊ तितकी ती फोफावत राहते.” आपण स्वतः आजही आचरणात आणू शकतो अशा कितीतरी गोष्टी ययाती आपल्याला सहज शिकवून जातो फक्त आपल्याकडे तो दृष...

माणुसकीची भिंत!

  पुंडलिक आणि माझी ओळख जवळपास १४ वर्षांपूर्वीची. स्वतःचा व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकीतून काहीतरी नवनवीन समाजासाठी करत रहावं हा त्याचा प्रयत्न असतो. बरेच वर्ष डोक्यात घोळत असलेल्या कल्पनेतून २०१६ साली माणुसकीची भिंत प्रत्यक्षात अवतरली. "जे नको असेल ते द्या, आणि जे पाहिजे ते घेऊन जा" या संकल्पनेतून कित्येक लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळाल्या. गरीब श्रीमंत असा भेदभाव न दाखवता "गरजवंत" व्यक्तींनी वस्तू घेण्यात पुढाकार दाखवला. पुंडलिक, महेश चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी प्रचंड मेहनतीने पहिला प्रोजेक्ट यशस्वीरीत्या राबवला. त्यानंतर २०१८ साली आणि आता पुन्हा एकदा ती भिंत प्रत्यक्षात अवतरली. जर हेतू चांगला असेल तर लोअर परेल मुंबईसारख्या अत्यंत अडचणीच्या ठिकाणी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादा प्रोजेक्ट उभा राहू शकतो आणि तो यशस्वीरीत्या पार ही पडू शकतो हे पुंडलिक आणि त्याच्या टीमने दाखवून दिले. यापुढे हि त्यांच्या बऱ्याच योजना आहेत ज्या लवकरच या कन्सेप्टला धरून राबवल्या जातील. आपल्यातील प्रत्येकाने पेनिनसुला बिजनेस पार्कच्या में गेटजवळ असणाऱ्या माणुसकीच्या भिंत...

रिमोट

  वर्क फ्रॉम होमचा कन्सेप्ट बाहेरच्या देशात नवीन नाही. इंटरनेट बुमनंतर बऱ्याच कंपन्यांनी विदेशात वर्क फ्रॉम होमची मुभा दिली. भारतात तीच गोष्ट कोव्हिडमध्ये जास्त प्रमाणात रुजली गेली. बऱ्यापैकी कंपन्यांना सक्तीचा वर्क फ्रॉम होम करावा लागला आणि तो जमलासुद्धा. एम्प्लॉयीचा महिन्याचा ऑफिसमध्ये होणारा खर्च, मोठ मोठ्या ऑफिसच्या मेंटेनन्सचा खर्च, लाईट, इंटरनेट, प्रवास आणि इतर बरेच खर्च यामध्ये कमी केले गेले. त्यामुळे बऱ्याच छोट्या मोठ्या कंपन्यासाठी वर्क फ्रॉम होम सवयीचा भाग झाला. शहरात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी १.५ तास लागत असेल (मुंबईच्या कामगारवर्गासाठी हा सरासरी वेळ आहे), तर येऊन जाऊन त्याला दिवसाचे ३ तास प्रवास करावा लागतो. शनिवार रविवार सुट्टी पकडून २२ दिवसांचा महिना पकडला तरीही ३ x २२ x १२ म्हणजेच ७९२ तास फक्त प्रवास होतो आणि २४ तासांचा दिवस या हिशोबाने ३३ दिवस वर्षातून फक्त प्रवासात जातात. त्यात प्रवासामुळे येणारा क्षीण वेगळाच. रिमोट वर्किंग म्हटल की आपल्या डोक्यात घरातून काम करणे एवढंच असतं. बऱ्याच घरांमध्ये ती शक्यता कमी. पण रिमोट वर्क म्हणजे एम...

पप्पांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त

  महाभारतात श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला विराट रूप दाखवलं. संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं. तेव्हा अर्जुन म्हणाला, "देवा, या विश्वात इतकं वाईट चाललंय. इतकी वाईट माणसे आहेत. तर मग हे जग कसं काय शाबूत आहे." त्यावर कृष्ण म्हणाला, "या जगात जशी वाईट माणसे आहेत तशी काही चांगली माणसे सुद्धा आहेत ज्यांच्या मुळे हे संपूर्ण विश्व चांगलं चाललय, शाबूत आहे." आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आजचे उत्सवमूर्ती हे या चांगल्या माणसांपैकीच एक!   बाप म्हटल की कायम कुटुंबासोबत असणारा आधाराचा हात दिसतो.  ज्यांनी दिवस रात्र काम करावं, गरज पडली तर कुटुंबापासून दूर राहावं, अतोनात मेहनत करून स्वतःची स्वप्न बाजूला सारून फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात हे आमच्या  आधीच्या जवळपास सगळ्या पिढ्यांच समीकरण.  हल्लीची पिढी बाबाशी मैत्रीपूर्ण वागते, बाबाला अरे तुरे करते, प्रसंगी हक्काने भांडते, उलट बोलते.  आमच्या पिढीने बाबांना नेहमी आदरयुक्त भीतीने पाहिले आहे.  त्यांच्या नजरेत, आवाजात कायम जरब पाहिली आहे.  प्रसंगी प्रेम आणि वेळोवेळी धाक पाहिला आहे.  ही पिढी कदाचित मैत्रीपूर्...