"द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली : रोल्फ डोबेली"
आपण रोज असंख्य निर्णय घेत असतो. व्यवसायात, नात्यांमध्ये, पैशांच्या बाबतीत आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातही. आपल्याला वाटते की हे निर्णय आपण विचारपूर्वक घेतो. मात्र अनेक वेळा आपल्या निर्णयांमागे तर्कापेक्षा फिलिंग्स, प्री कन्सेप्शन आणि माईंड ट्रॅप्स काम करत असतात. रॉल्फ डोबेली यांचे “The Art of Thinking Clearly” हे पुस्तक याच मानवी स्वभावाकडे अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने पाहायला शिकवते.
या पुस्तकात लेखकाने मानवी विचारांमध्ये होणाऱ्या विविध चुका आणि प्री कन्सेप्शनची उदाहरणांसह मांडणी केली आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला आपल्या विचार करण्याच्या पद्धतीकडे नव्याने पाहायला भाग पाडते. विशेष म्हणजे ही शिकवण केवळ सायकॉलॉजी पुरती मर्यादित राहत नाही. बिझनेस आणि इन्वेस्टमेंट करण्यापासून ते रोजच्या छोट्या निर्णयांपर्यंत तिचा उपयोग करता येतो.
या पुस्तकातील सर्वात महत्त्वाची लर्निंग म्हणजे आपला मेंदू नेहमी योग्य विचार करतोच असे नाही. आपण अनेकदा अवेलेबल असलेल्या पहिल्या माहितीवर विश्वास ठेवतो. एखाद्या व्यक्तीबद्दल पहिली छाप तयार झाली की पुढची माहिती त्याच दृष्टिकोनातून पाहतो. याला Anchoring आणि Confirmation Bias सारखे मानसिक पूर्वग्रह कारणीभूत ठरतात. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या विचारांवरही प्रश्न विचारणे आवश्यक आहे.
लेखक Survivorship Bias च्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. आपल्याला सक्सेसफुल झालेल्या लोकांच्या कथा सहज दिसतात. पण त्याच प्रयत्नांमध्ये फेल्युअर झालेल्या हजारो लोकांच्या कथा दिसत नाहीत. त्यामुळे एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीची पद्धत प्रत्येकासाठी अप्लिकेबल होईल, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते.
“Sunk Cost Fallacy” हा कॉन्सेप्ट व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी विशेष महत्त्वाचा आहे. एखाद्या निर्णयामध्ये आपण आधीच पैसा, वेळ किंवा मेहनत गुंतवली आहे म्हणून चुकीचा निर्णय पुढेही चालू ठेवणे योग्य नाही. गेलेला खर्च परत मिळणार नाही. त्यामुळे पुढे काय करणे योग्य आहे, याचा विचार प्रेजेंट कंडिशनच्या आधारावर करायला हवा.
लेखक Social Proof आणि Authority Bias कडेही लक्ष वेधतो. अनेक लोक एखादी गोष्ट करत आहेत म्हणून ती योग्य असेलच असे नाही. तसेच एखाद्या फेमस किंवा पॉवर असलेल्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली म्हणून ती आपोआप सत्य होत नाही. निर्णय घेताना व्यक्तीपेक्षा पुरावे आणि फॅक्टसकडे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
मला या पुस्तकातील “Decision Fatigue” ही संकल्पनाही विशेष उपयोगी वाटली. दिवसभर सतत डिसीजन घेत राहिल्याने आपल्या डिसीजन मेकिंगची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाचे डिसीजन्स योग्य वेळी घेणे, अनावश्यक निर्णय कमी करणे आणि काही गोष्टींसाठी ठराविक नियम तयार करणे उपयोगी ठरते.
व्यवसायाच्या दृष्टीने पाहिले तर हे पुस्तक आणखी महत्त्वाचे वाटते. कस्टमर्स, एंप्लॉयिज, इन्वेस्टमेंट, मार्केटिंग किंवा नवीन संधी याबाबत निर्णय घेताना आपण अनेकदा आपल्या एक्सपीरियन्सला अंतिम सत्य मानतो. पण अनुभवासोबत पूर्वग्रहही येतात. त्यामुळे “मला असे वाटते” आणि “याला पुरावा आहे” यामधील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यातील शिकवणी रोजच्या आयुष्यात लगेच वापरता येते. पुस्तक वाचताना आपल्याला अनेक वेळा असे जाणवते की, “ही चूक मीसुद्धा करतो.” त्यामुळे हे केवळ मानसशास्त्राचे पुस्तक राहत नाही. उलट ते आपल्या स्वतःच्या विचारांची तपासणी करण्यासाठी एका आरशासारखं काम करते.
The Art of Thinking Clearly आपल्याला हुशार बनण्यापेक्षा एक वेगळी गोष्ट शिकवते. ती म्हणजे आपण कुठे चुकीचा विचार करू शकतो हे ओळखणे. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारणे, उपलब्ध माहिती तपासणे, भावनांपासून थोडे दूर राहणे आणि स्वतःच्या मतालाही आव्हान देणे ही या पुस्तकातून मिळणारी मोठी शिकवण आहे.
माझ्या मते, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने, गुंतवणूकदाराने आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे. कारण आयुष्यात चुकीचे निर्णय टाळणे हे नेहमी अधिक माहिती मिळवण्यापेक्षा, आपला मेंदू आपल्याला कुठे चुकीच्या दिशेने नेऊ शकतो हे समजून घेण्यावर अवलंबून असते.
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment