Skip to main content

कुर्ला ते मॉरिशस

 



“काकी तू आता रिटायरमेंट घेऊन पुस्तक लिहायला हवंस” अस कित्येक वेळा काकीशी बोलणं झालं असेल. तिची मुख्याध्यापिकेची नोकरी, तिथली जबाबदारी, तिची समाजसेवी कामे यातून तिला तशी फुरसत मिळणं कठीणच. त्यात २५-३० वर्षापूर्वी झालेलं तिचं फुफुसाचं मोठं ऑपरेशन. एवढ्या अवघड परिस्थितीतून नोकरीतल्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची तब्येत सांभाळत लिखाण करणं थोडं अशक्यच होतं. पण तिचे विचार लोकांपर्यंत पोहचायला हवेत या अनुषंगाने आम्ही तिला विनंती करायचो. आणि शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं.
काही दिवसांपूर्वी कवितेचं पुस्तक करायचं अस काकीने बोलून दाखवलं आणि आम्ही कामाला लागलो. कोणत्या ना कोणत्या स्पर्धेच्या निमित्ताने काकीने प्रासंगिक कविता केल्या होत्या व त्यात तिला बक्षीसही मिळाली होती. सगळ्याच कविता अप्रतिम होत्या. कौतुक म्हणजे वीस एक वर्षापासूनच्या या सगळ्या कविता काकीने जपून ठेवल्या होत्या. प्रत्येक कवितेवर टाकलेल्या तारखेमुळे आम्हाला ते कळालं. पुस्तकावर काम करण्याचा उत्साह वेगळ्या लेव्हलचा होता कारण हे पुस्तक मॉरिशसला प्रकाशित होणार होतं. समीरच्या मिडाशियन टचने पुस्तकाच अप्रतिम डिजाईन झालं आणि अखेरीस आमच्या कुटुंबातलं पहिलं “आनंदयात्री मी” हे पुस्तक विदेशात प्रकाशित झालं. कुर्ल्याच्या शाळेतून एक शिक्षिकेचा सुरू झालेला हा प्रवास एका कवयित्रीपर्यंत आलेला आहे ही आम्हा सगळ्यांसाठीच एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. यापुढे काकीची कवितांची अनेक पुस्तकं येतच राहतील पण सौ. अनिता रामचंद्र मेस्त्री लिखित एखादं कथा, कादंबरी किंवा तिच्याच स्ट्रगलवर आधारित एखादं पुस्तक येईल हे नक्की. आता तर फक्त सुरुवात झालीय.
कठीण परिस्थितीमध्ये हार न मानता कायम चेहऱ्यावर स्माईल ठेवून कसं पुढे जात राहिलं पाहिजे आणि स्वप्न कशी पूर्णत्वाला नेली पाहिजेत याबाबतीत अप्पा आणि काकी कायम आमचे आदर्श राहिले आहेत आणि यापुढेही राहतील 🙏🏻


Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...