Skip to main content

माणुसकीची भिंत!

 



पुंडलिक आणि माझी ओळख जवळपास १४ वर्षांपूर्वीची. स्वतःचा व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकीतून काहीतरी नवनवीन समाजासाठी करत रहावं हा त्याचा प्रयत्न असतो. बरेच वर्ष डोक्यात घोळत असलेल्या कल्पनेतून २०१६ साली माणुसकीची भिंत प्रत्यक्षात अवतरली. "जे नको असेल ते द्या, आणि जे पाहिजे ते घेऊन जा" या संकल्पनेतून कित्येक लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळाल्या. गरीब श्रीमंत असा भेदभाव न दाखवता "गरजवंत" व्यक्तींनी वस्तू घेण्यात पुढाकार दाखवला. पुंडलिक, महेश चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी प्रचंड मेहनतीने पहिला प्रोजेक्ट यशस्वीरीत्या राबवला. त्यानंतर २०१८ साली आणि आता पुन्हा एकदा ती भिंत प्रत्यक्षात अवतरली. जर हेतू चांगला असेल तर लोअर परेल मुंबईसारख्या अत्यंत अडचणीच्या ठिकाणी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादा प्रोजेक्ट उभा राहू शकतो आणि तो यशस्वीरीत्या पार ही पडू शकतो हे पुंडलिक आणि त्याच्या टीमने दाखवून दिले. यापुढे हि त्यांच्या बऱ्याच योजना आहेत ज्या लवकरच या कन्सेप्टला धरून राबवल्या जातील.

आपल्यातील प्रत्येकाने पेनिनसुला बिजनेस पार्कच्या में गेटजवळ असणाऱ्या माणुसकीच्या भिंतीला आवर्जून भेट द्या. ज्या घरातल्या गोष्टी तुम्हाला नको असतील त्या तिकडे घेऊन जा. २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरचा शेड्युल असताना लोकांचा एकंदरीत रिस्पॉन्स बघून २ नोव्हेंबरपर्यंत माणुसकीची भिंत उभी असणार आहे.

पुंडलिक सारखे मित्र आयुष्यात आहेत याचा अभिमान आहे!

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...