Skip to main content

“श्रीकांत” - एक प्रेरणादायी अनुभव

 



नो ऍक्शन सीक्वेंस…नो रोमांटिक सिन्स…ना मसाला…ना खूप लक्षात राहतील अशी गाणी…फक्त कंटेंट स्ट्राँग असेल तर एक अख्खा मूवी तुम्ही कुठेही विचलित न होता पाहू शकता आणि प्रचंड सकारात्मकता घेऊन थिएटर बाहेर पडू शकता….श्रीकांत पाहिल्यावर हा अनुभव आला.
माणसाने जर ठरवलं तर त्याच्यासाठी कोणतंच लिमिटेशन राहत नाही…जन्मापासून आंधळा व्यक्ती आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर ठरवलं ते सगळं मिळवू शकतो…अगदी सिस्टमला चॅलेंज करून बदलण्यास भाग पाडू शकतो…सत्य घटना आहे हे माहीत नसतं तर कदाचित फक्त मूव्ही म्हणून एंजॉय केला असता पण रिअल श्रीकांत शेवटी जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा फक्त अभिमान वाटत नाही तर एक वेगळीच ऊर्जा मिळते…
आंधळा मुलगा जन्माला आला म्हणून नातेवाईकांपासून शेजारचे नुकत्याच जन्मलेल्या श्रीकांतला संपवण्यासाठी त्याच्या आई बाबांना उपदेश करतात आणि त्यावेळी ते पाप होता होता राहिलं म्हणूनच आज एक जबरदस्त प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये राहिलं…बापाला श्रीकांतच्या भविष्याची चिंता असते म्हणूनच की काय संपूर्ण चित्रपटात सतत “पापा कहेते है बडा नाम करेगा” हे आपल्या ओळखीच ९० च्या दशकातलं गाणं वाजत राहतं आणि ते त्या त्या सीनला जातं पण भारी. मूव्हीची ग्रिप इतकी जबरदस्त आहे की सुरुवातीपासून एंड पर्यंत तुम्ही त्या स्टोरीचा भाग होऊन जाता.
१२ फेल, श्रीकांत असे मूव्हिज आपल्या संपूर्ण कुटुंबासहित खास करून लहान मुलांना घेऊन पाहिले पाहिजेत आणि त्याचं प्रमोशन ही जोरदार झालं पाहिजे.
सगळ्यांनी आवर्जून पहावा असा चित्रपट…आपण नक्कीच फॅन होऊन बाहेर पडतो ओरिजनल श्रीकांत आणि राजकुमार रावचे…
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...