वर्क फ्रॉम होमचा कन्सेप्ट बाहेरच्या देशात नवीन नाही. इंटरनेट बुमनंतर बऱ्याच कंपन्यांनी विदेशात वर्क फ्रॉम होमची मुभा दिली. भारतात तीच गोष्ट कोव्हिडमध्ये जास्त प्रमाणात रुजली गेली. बऱ्यापैकी कंपन्यांना सक्तीचा वर्क फ्रॉम होम करावा लागला आणि तो जमलासुद्धा. एम्प्लॉयीचा महिन्याचा ऑफिसमध्ये होणारा खर्च, मोठ मोठ्या ऑफिसच्या मेंटेनन्सचा खर्च, लाईट, इंटरनेट, प्रवास आणि इतर बरेच खर्च यामध्ये कमी केले गेले. त्यामुळे बऱ्याच छोट्या मोठ्या कंपन्यासाठी वर्क फ्रॉम होम सवयीचा भाग झाला.
शहरात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी १.५ तास लागत असेल (मुंबईच्या कामगारवर्गासाठी हा सरासरी वेळ आहे), तर येऊन जाऊन त्याला दिवसाचे ३ तास प्रवास करावा लागतो. शनिवार रविवार सुट्टी पकडून २२ दिवसांचा महिना पकडला तरीही ३ x २२ x १२ म्हणजेच ७९२ तास फक्त प्रवास होतो आणि २४ तासांचा दिवस या हिशोबाने ३३ दिवस वर्षातून फक्त प्रवासात जातात. त्यात प्रवासामुळे येणारा क्षीण वेगळाच.
रिमोट वर्किंग म्हटल की आपल्या डोक्यात घरातून काम करणे एवढंच असतं. बऱ्याच घरांमध्ये ती शक्यता कमी. पण रिमोट वर्क म्हणजे एम्प्लॉयिज कुठूनही तुमची कामे करू शकतात. अगदी जवळपासच्या कॉफी शॉपमधून, को वर्किंग स्पेसेस मधून किंवा कुठूनही. यात प्रवासाचा वेळ तर वाचतोच पण ऑफिसवर होणारा बराचसा खर्च वाचतो. यात तुम्ही जगातलं खूप स्मार्ट लेव्हलच आणि किफायतशीर टॅलेंट एक्सप्लोर करू शकता. यात येणाऱ्या अडचणी व त्यावर प्रश्न म्हणून हे पुस्तक खूप फायदेशीर आहे. ३७ सिग्नल्स नावाच्या अमेरिकेतील एका कंपनीच्या दोन संचालकांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी रिमोट वर्क ची संकल्पना कित्येक वर्ष यशस्वीरीत्या अंमलात आणली आहे.
जे आपल्या ऑफिसच्या कामासाठी रिमोट वर्क हा पर्याय शोधत आहेत व तो प्रत्यक्ष कसा करायचा हा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.
धन्यवाद Mahesh Chavan या पुस्तकासाठी !
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment