Skip to main content

प्रहार

  


*प्रहार*

एवढे सगळे एविडेंसेंस असताना आणि सगळ्यांना गुन्हेगार क्लिअरली माहित असताना कसाबला डायरेक्ट फाशी का देत नाहीत ? किंवा त्याला जागेवर गोळी का घातली नाही? असे प्रश्न २००८ साली २६/११ च्या हल्ल्यानंतर माझ्याही मनात आले होते किंवा कुणाच्या ना कुणाच्या चर्चेत कायम हा विषय असायचा.  पण त्या विषयाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आणि २००८ च्या घटनेनंतर तब्बल ४ वर्षांनी कसाबला फाशी झाली तेव्हा आतंकवाद्यांना सुद्धा आपण फुकट पोसतोय अशी विचारसरणी झालेल्या लोकांनी (मुळात सर्व भारतीयांनीच) नव्याने आलेला "प्रहार" हा चित्रपट पाहिला पाहिजे.  २६/११ ची घटना सगळ्यांनी कुठे ना कुठे डॉक्युमेंटरी किंवा सिनेमामधून पाहिली आहे, पण या पद्धतीने त्या घटनेला वळण देण्याचा हा पहिला प्रयत्न आहे आणि तो खरंच वाखाणण्याजोगा आहे.  प्रत्येक घटना अशी मांडली गेली आहे की तुम्ही त्या प्रसंगाचा भाग होऊन जाता.  नकळत डोळे पाणावले जातात.  कधी अभिमानाने छाती फुलून येते.  आपल्या यंत्रणेची चीड येते पण कमी रिसोर्सेसमध्ये सुद्धा उत्तम काम करणाऱ्या आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा अभिमान वाटतो.   कसाबला जिवंत ठेवून या प्रकरणात पाकिस्तानचा कसा हात होता हे उलगडून दाखवणं हे या चित्रपटाने उत्तम केलं आहे.  जेव्हा सगळी जनता कसाबच्या जीवावर उठली होती तेव्हा उज्ज्वल निकम सरांनी फक्त या यंत्रणेच्या मुळाशी जाण्यासाठी किती संघर्ष केला हे उत्तमरित्या मांडलं आहे.  त्यासाठी त्यांना जनतेचा रोष सुद्धा ओढवून घ्यावा लागला. चित्रपटाचा एक डायलॉग खूप भावून गेला "Justice Hurried Is Justice Burried".




सगळ्यांची कामे उत्तम आहेतच.  मी स्वतः राजकुमार रावचा फॅन आहे.  त्याने उज्ज्वल निकम सरांची बोलण्याची, चालण्याची लकब हुबेहूब पकडली आहे.  पण यावेळी खूपच सरस ठरला ललित प्रभाकर.  ज्या पद्धतीने कसाब साकारलाय त्याला तोडच नाही.  जर कसाबचे व्हिडीओ त्याची बॉडी लँग्वेज पाहिली असेल तर ललित ने ती अल्टिमेट  उतरवली आहे.  डायलॉग्स बोलण्याची पद्धत, बेरकीपणा, डोळ्यातून हावभाव सगळंच नेक्स्ट लेव्हल.  मिळालेल्या संधीच सोनं केलं आहे. 




जेव्हा मुव्हीचा टीजर आलेला आणि जेव्हा तो पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्यातला "जब कसाब को निहत्था पकड़ा, तो गोविलकर साहब ने यह नहीं कहा कि गोली मारो, इसे खत्म करो। उन्होंने कहा, याला मारू नका, हा एविडेंस आहे।" हा डायलॉग ऐकला तेव्हा छाती अभिमानाने फुलून आली.  २६/११ नंतरच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा संजय गोविलकर दादांना गोळी लागल्याची न्यूज आली होती तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो होतो.  पण त्यांच्याशी फोनवर बोलल्यावर आम्हाला हायसं वाटलं आणि जगात पहिला आतंकवादी जिवंत पकडण्याचा विक्रम आपल्या पोलीस दलाने केला आणि त्यात त्याला जिवंत ठेवण्याचा डिसिजन दादांचा होता हि आम्हा पूर्ण जीवनरंग फॅमिलीसाठी अभिमानाची गोष्ट होती.   त्यानंतर दादा नॅशनल हिरो झाले.  त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं आणि घटनेच्या १८ वर्षानंतर त्यांचं नाव व त्याचं कॅरॅक्टर चित्रपटामध्ये साकारलं जाणं यापेक्षा मोठा क्षण आमच्या आयुष्यात काय असावा?

उज्ज्वल निकम सरांचं कुटुंब, त्यांना करावे लागलेले सॅक्रिफायजेस, आयुष्यातले इमोशनल मुमेंट्स, बाप मुलाचं नातं सगळंच मनाला स्पर्श करून जातं आणि हे सगळे आपल्यासाठी नॅशनल हिरो का आहेत ते समजतं.  सगळ्यांनीच आपल्या कुटुंबासोबत थिएटरमध्ये जाऊन बघावा असा इम्पॅक्टफुल सिनेमा.   सध्या बऱ्याच ठिकाणी शोज चालू आहेत.  आवर्जून बघा !

- सुबोध अनंत मेस्त्री

 

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...