Skip to main content

सॅंड्याच्या वाढदिवसानिमित्त

 


आपल्या आयुष्यात लाईफ पार्टनरचा रोल महत्वाचा असतो आणि जर उद्योग असेल तर बिजनेस पार्टनरचा...आणि त्यात पार्टनरशी कनेक्शन स्ट्रॉंग असेल तर सोने पे सुहागा. चांगल्या माणसांच्या बाबतीत नशीब घेऊनच मी जन्म घेतला असल्यामुळे लहानपणापासूनच बरीच चांगली जीवाला जीव देणारी माणसं जोडली गेली...त्यातलाच एक...आमचा सॅंड्या.
शाळेत एकत्र असल्यामुळे घरचेच संबंध. शाळेत लाजरा बुजरा, मोजकच बोलणारा. तसा शांत पण मस्तीखोर. त्याने वेगळे कोर्सेस घेतल्यामुळे कॉलेज वयामध्ये जास्त संबंध आला नाही पण तो नेहमीच घरी येऊन जाऊन असायचा. प्रत्येकाच्या फॅमिलीशी कनेक्ट स्ट्रॉंग. शाळेतले मित्र एकत्र भेटण्याच काही न काही निमित्त असायचंच त्यामुळे भेट होत राहायची. जेव्हा रायगडावर पहिल्यांदा बिजनेसचा विषय आला तेव्हा इतर तिघांबरोबर सॅंड्या तयार झाला आणि आमचं नातं मित्रापासून पार्टनर्समध्ये बदललं. इतक्या वर्षात बिजनेसच्या चढउतरांमध्ये मी बऱ्याच वेळा खचलो असेन पण तो कायम ठाम होता. प्रत्येक वेळी मला सांभाळून घेत, माझा फ्रीडम त्याने मला एन्जॉय करून दिला. मी जे नवीन काही करत होतो त्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं. स्वतः बॅकएन्डला राहून तो काम करत असताना बऱ्याच वेळा स्वराज्यच क्रेडिट माझ्या नावे आलं. पण स्वराज्यच्या कामाचं मेजर श्रेय हे आमच्या सॅंड्याचच.
पुढे स्वतःला डेव्हलप करण्यासाठी एम. बी. सी. जॉईन केलं आणि त्यातही टेक्निकल कामं हातात घेऊन प्रत्येक मिटींग्सचा आधार तो बनला. मुळात देण्याची वृत्ती त्याच्याकडे लहानपणापासूनच आहे त्यामुळे मोजकं बोलत असेल तरी तो जाईल तिकडचा महत्वाचा भाग होऊन जातो. बोलण्यापेक्षा कृतीतून प्रेम, आपुलकी दिसते असं म्हणतात. त्याला काही न काही निमित्ताने पाहुणचार करण्याची संधी आम्ही कायम दिली आणि त्यातच तो कायम माणूस म्हणून उलगडत गेला. आम्ही मैत्री आणि बिजनेस कायम वेगळा ठेवला पण दोन्ही ठिकाणी गरजेनुसार भूमिका आणि निर्णय त्याने कायम विचारपूर्वक घेतले. स्वतःच दुकान चालवण असेल किंवा धंद्यासाठी सामान आणण असेल त्याला बिजनेसच बाळकडू लहानपणापासूनच मिळालं. मी किंवा अजय काही वेळा इमोशन्समध्ये वाहत जातो पण संदीपमुळेच गाडी रुळावर राहते.
सुप्रियाशी लग्न करणार समजल्यावर त्याच्यापेक्षा जास्त खुश तर मी झालो होतो. त्याला परफेक्ट लाईफ पार्टनर मिळाली होती आणि तिला सुद्धा. अगदी शाळेतल्या वयापासून असेल त्याने आम्हा मित्रांपैकी कुणालाही मदत करताना मागे पुढे पाहिलं नाही. ती आर्थिक मदत असेल किंवा कोणत्याही प्रकारची. ज्या मार्गाने तो स्वतःमध्ये आता बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय त्यात माणूस म्हणून तो अधिक खुलत जाईल पण त्याच्यातली माणुसकी कमी होणार नाही.
काही गोष्टी बोलण्यातून तितक्या प्रभावीपणे येत नाहीत. म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या फिलिग्स आमच्या सॅंड्यासाठी या पोस्ट मधून मांडल्या आहेत. माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र आणि बिजनेस पार्टनर म्हणून संदीपच स्थान अढळ आहे आणि ते कायम राहील. माझ्या उभा राहण्यामागे बॅकबोन म्हणून संदीपचा मोठा हातभार आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा! लव्ह यु मनापासून...आपला प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र 😘

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी