Skip to main content

संदेश दादाचे पत्र - ०९ जून २०१८

डिअर सुबु,
६जूनला पुष्पाने मेसेज केला कि, उद्या सुबोधदादाचा वाढदिवस आहे का? मी म्हणालो असेल कारण, मलाही नक्की तारीख माहित नव्हती,
पण तेव्हा वाटलं काही लिहावं तुझ्याबद्दल... पण नाहीच जमलं,
आणि
आज विनूची पोस्ट येईपर्यंत हि खंतही होतीच, कायतरी लिहायला हवं होतं,
एकुलता एक असल्याने भांवडांचं असणं नसणं जाणवतं नव्हतं पण जेव्हा जाणवलं, तेव्हा बहिणीची कमतरता जाणवली, पण ती जाणिव होतेय एवढ्यात खुप बहिणी मिळाल्या,
मित्रांमुळे भाऊ असण्याची कमतरता वाटलीच नाही. आणि इतर मित्रांची भावाभावाची नाती पाहता, भाऊ नाही हे बरचं आहे, असंच वाटतं, अपवाद तुझा आणि रविचा,
तुमचं तुमच्या भावांजवळचं नातं पाहता, असे छोटे भाऊ असावेत असं वाटायचं आणि ते वाटता वाटता तुम्ही दोघेही माझेच भाऊ कधी झालात, मलाच कळालं नाही,
तुम्ही दोघेही देत असलेला मोठ्या भावाचा मान पाहून माझा मलाच हेवा वाटायला लागतो, तु तसा रविपेक्षा उशिराने आयुष्यात आलास,
... एक बरं असतं, घरातल्याच माणसांने काही लिहलं कि काही गोष्टी नव्याने कळतात, म्हणजे जसं सकाळी विनूनं लिहलयं तसं,
तुझं अभ्यासात हुशार असणं, घरी लाडं होणं. हे नव्हतं मला माहित,
आणि
एक तु बोलतोस ते,
तु विनूची कार्बन काँपी आहेस, हे विधान आता अर्ध खोटं ठरत चाललयं, आता तर तुम्ही दोघांनीही स्वतःला सिध्द केलेलं आहेच, सुरवातीला तु विनोदची काँपी करायचास ते आईकडून जास्त ऐकायला मिळायचं, तेही कौतुकाने, त्यामुळे भिती वाटायची तु त्याच्या सावलीत तर राहणारं नाहीस?
कारण विनोदकडे उत्स्फुर्तता असायची तर तुझ्याकडे मेहनत, मला तुझं काँपी करणं जाणवायचं ते तु विनोदचे कपडे घालून जायचास तेव्हा,
विनोद दिसायला स्मार्ट आहे, त्यापेक्षा जास्त कपडे आणि इतर टापटीपपणात, आम्ही कुठेतरी राऊंडला किंवा असचं भटकायला जायला निघायचो आणि तु त्याचं शर्ट, किंवा टि शर्ट घालून गेलेला असायचास,
तेव्हा विनूचा आवडता शब्द होता, "आपला काळा हिरो" पण हे बोलण्यात कुत्सितपणा नसायचा कधीच,(हेही मला तेव्हा पहिल्यांदा जाणवलेलं.) कारण कोणाच्या नैसर्गिक शारीरिक व्यंगावर बोलणं मला आजही आवडतं नाही,
पहिल्यांदा मी तुझा फँन बनायला कारणीभुत होते तुझे दोन परफाँर्मस,
एक ते एकपात्री आणि,
 दुसरी कविता.. प्रसादने कविताच एवढी भन्नाट होती कि, ऐकतानाच सगळं चित्र समोर यायचं. हेही तुझं दिग्दर्शीय कसब... आणि एकदा तर संदिपजवळ वादच,
विनोदपेक्षा सुबोध चांगला अँक्टर आहे या गोष्टीवरनं,
संदिप विनोदची वाहवा करत होता तर मी तुझी,
विनोद सुपरस्टार होता, आजही आहे, तो विनोदचं आहे, सगळा श्री परिवार त्याचा फँन आहे. तो जे करेल ते आवडणारे आहेत.(म्हणून तो आजही भास्करचं नाव घेऊन गृप डान्स करतो.😀)
पण त्यावेळी संदिपला खुप सांगतं होतो तो नाही ऐकला. पण मी त्याला असाच सोडणार नव्हतो,
संदिप गेल्यानंतर थोड्या वेळातच विनोद आला. मी सगळी शब्दशस्रे घेवून तयार, आता विनोदला वाईट वाटलं तरी चालेलं त्याला ऐकवायचचं या उद्देशाने सुरवात केली,
"विनोद, तु काही बोलं, पण सुबोध तुझ्यापेक्षा भारी अँक्टर आहे"
"बस्स काय भाई, जबरदस्तचं आहे तो"
"तुला मान्य आहे?"
"म्हणजे काय, फक्त तो मिमिक्री करतं नाही..बाकी.."
हा काय चमत्कार, विनोदनेच हे मान्य केल्यावर मी काय बोलणारं? तुझ्या दिग्दर्शनाबद्दल तर विनोद किती आदराने बोलायचा.
दिलीप प्रभावळकरांचं हसवाफसवी काही मोडतोड करुन आपणं केलं, तु,विनोद, कृष्णा. म्हणजे माझ्या दृष्टीने मी सेफझोनमध्ये होतो. स्टेजची भिती पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हापासून नव्हती.
पण रिहर्सलच्या वेळेस जाणवलं, तुझं दिग्दर्शन काय असतं, याचा अनुभव होता तो. त्या दिवसांत माझ्यात नव्याने बदल झाला, ते मी कृष्णाला बोललोही, उभं राह्यची पध्दत, बोलण्याची पध्दत, पाँज किंवा हशा टाळ्यावेळेस शाँत राहणं, हा सगळा वस्तुपाठचं तु दिलास,
रिहर्सलनंतर कधीकधी विनू बोलायचाही, आपल्या तिघांमुळे त्याचे वांदे झालेत, आपल्यावर ओरडू शकत नाही तो, आतल्या आत वैतागत असतो, ते जाणवायचं, शेवटच्या क्षणापर्यत तु परफेक्शनच्या मागे असतोस, हे जबरदस्त!
तुम्ही दोघे आहात तिथे ग्रेट आहातचं, मराठी सिनेनाट्यसृष्टीने दोन हिरे गमावले याचं दुःख जाणवतचं,
म्हणजे विनूची काँपी करणारा निलेश साबळे,
आणि तुझ्या अँक्टिंगची धड काँपीही न करणारा प्रथमेश परब असे पाहिले कि जास्तचं...!
विनूने आणि,उल्लेख केलेली गोष्ट तुझं गाणं,
मी अनुभवलयं ते खुप वेळा,
गेल्यावेळचा श्री गौरव...!
त्याच वेळी तुझं दिग्दर्शन, शेवटचा सीन...लाजबाब!
आणि,
तुझं लेखन.
मला माझ्याएवढचं तुझं लेखनं आवडायला लागलयं, कधीकधी हेवा वाटतो तुझ्या विषय निवडीचा, सातत्याचा आणि सहज, सरळ लेखन शैलीचा, आता तुझ्या लिखाणाचा बहर आहे. सुरवातीस तु मी जणू समीक्षक असल्यासारखा माझ्याकडून प्रतिक्रिया घ्यायचास, मेसेजवर मेसेज किंवा थेट फोन करुन, तेव्हा मी सांगायचोही, पण आता तुला तुझा मार्ग सापडलाय, आता माझी प्रतिक्रिया महत्वाची नाही, तु लिहीत रहा..!
आणि,
मला आवडतं ते तुझं साधं असणं,
कोणता बडेजाव नाही, आपलं अस्तित्व समोरच्यावर टाकणं नाही, एकदम कुल, समोरच्याला पुरेपुर वेळ देणं, ऐकून घेणं. समजून घेणं, तुझ्या आँफीसमध्ये आलो तेव्हा तुझी व्यस्तता कळाली. पण तु असा असतोस कि तुला माझ्यासाठी वेळच वेळ आहे.

आज तुझा वाढदिवस,
तुला देण्याऐवजी मीच तुझ्याकडे मागतोय,
बेलापूरला आम्ही शिबीराला आलेलो पण तु आमच्याकडे फिरकला नाहीस, पण तु एकदा यावसं आणि लवकरात लवकर यावसं, कारण आपले मार्ग वेगळे वाटले तरी प्रत्यक्षात एकच आहेत, पण ते मी सांगण्यापेक्षा तु अनुभवायला हवसं,
...
आयुष्यात तु जे जे रोल करतोयसं, ते ते चांगलेच निभावत आहेस, आणि तंत्रज्ञान मित्र आहेसच, पण आज सार्थकबद्दलच्या लेखनातून पालकत्वांची नवीन जबाबदारी, नवीन दृष्टी तुझ्या लेखनातून जाणवते. एक वेगळेपण, एक नवा विचार त्या लेखनात असतोच.
त्यामुळे पालकं म्हणून एक नवी दृष्टी मला तरी मिळतेच.
एकदा तुझ्याकडे निवांत बोलायचयं, अर्थात मला वेळ काढावा लागेल,
तु तर नेहमीच तयार असतो.

तुझ्या लेखांचं पुस्तकं, तशीच तु लिहीत असलेली ती स्टोरी... ती पूर्ण केलीसच नाही का? लवकर कर.

तुला आणि विनोदला समोरासमोर अँक्टिंगसाठी उभं करायचयं, तुझ्या अभिनयातील तक्रार म्हणजे, खुप दिवसं तु नवीन काही केलेलं नाहीस, इतर जुने परफाँर्म राहूदे. पण तुझ्या इतकीच मलाही प्रतिक्षा आहे. "भुक"ची.
प्रतिभाही या वर्षी बोललीही,
"त्याला भुक करायचेय"
आणि हि गोष्ट विनुच्या डोक्यातही असेलच, बजेट जमेलं कि.....!
होईल ते ही...!
असो,
आणि काय लिहू..
ज्या ज्या क्षेत्रात आहेत, तीथे तीथे तू तुझा ठसा उमटवला आहेसच,
...
अजूनही खुप खुप मोठा हो.
आणि "एका" गोष्टीमुळे तु मला विनोद, कृष्णापेक्षाही आवडायला लागलायसं, ते तसचं ठेवावसं...!
अजून काय काय लिहायचं राह्यलयं... पण आपल्या या गृपवर वाढदिवसचं कशाला हवा, मी ते लिहीत राहीनचं..
Love you..,!

तुझा दादा
संदेश शंकर बालगुडे

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी