नमस्कार...मी सुबोध अनंत मेस्त्री...तुमच्यासारखाच एक साधा सरळ माणूस....आज हा ब्लॉग सुरू करत आहे...आयुष्यात घडणार्या सध्या सरळ घटनामधून आपण खूप काही शिकत असतो...अशाच माझ्या आयुष्यात घडलेल्या या काही घटना...यातून कुणाला काही शिकायला मिळेल एवढीच अपेक्षा....मी कुणी लेखक नाही किवा साहित्यिक नाही...त्यामुळे माझी लेखणी सहज आणि सरळ आहे आणि त्यामुळे ब्लॉगच नाव सुद्धा तेच...या ब्लॉगला खूप सारे फॉलोवर्स मिळावेत अशी अपेक्षा नाही पण कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी छोट योगदान होईल एवढं नक्की....काही क्षण डोक्यात तात्पुरते राहतात आणि लिहून ठेवले तर ते कायम कोरले जातात...पुढे जाऊन हा ब्लॉग मी स्वता वाचेन तेव्हा माझ्याच आयुष्यातल्या ठळक आठवणी माझ्या नजरेसमोर उभ्या राहतील आणि त्यातली शिकवण सुद्धा :)
#sahajsaral
खूप सुंदर केलंस हे. तुझी लेखनशैली प्रभावरहीत आणि प्रामाणिक आहे. तुझा स्वभावच जणू कागदावर उतरतो. आम्ही तुझ्या स्वभावाचे चाहते आहोतच, आणि आता तर तुझं नवनवीन लिखाण वाचायला उत्सुक झालो आहोत. तुझ्या या लिखाणाच्या प्रवासाला शुभेच्छा.
ReplyDeleteसुबोध साहेब, शुभेच्छा...
ReplyDeleteआपण आपले अनुभव लिहण्यामुळे इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल...