ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...
नाझी नरसंहार - आउशवित्झ छळछावणी "बेटा, इंसान पहले जानवर था...कुछ लोग जानवर से इंसान हुवे और कुछ लोग जानवर ही रह गये", क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीज मधला हा एक डायलॉग...पण "नाझी नरसंहार" हे पुस्तक वाचताना तो तंतोतंत जुळतो. माणूस जेव्हा त्याची नैतिक मानसिकता हरवून बसतो तेव्हा तो राक्षसी कृत्य करत कोणत्या पातळीवर येऊ शकतो हे हिटलरच्या म्हणजेच नाझींच्या कृत्यातून जगासमोर आलं. पहिल्या महायुद्धात हरल्यानंतर ज्यूंचा दु:स्वास करणाऱ्या हिटलरने जर्मनीची सत्ता हाती घेतली आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. फक्त ज्यू लोकाना मारण्यासाठी आउशवित्झ या जर्मनीने जिंकलेल्या पोलंडच्या भागात कत्तलखाना उभारण्यात आला. युरोपातल्या जवळपास ६० लाख ज्यू लोकांना शोधून अगदी जनावरापेक्षाही वाईट अवस्थेत रेल्वेगाडीतून आउशवित्झ या ठिकाणी आणले जायचे आणि गॅस चेंबरमध्ये सगळ्यांना ग्रुप्स मध्ये कोंबून त्यांच्यावर अँसिड टाकून मारले जायचे. यामध्ये महिला, लहान मुले, वयस्कर असा भेदभाव केला गेला नाही. जसे प्राण्यांवर औषध चाचणीचे प्रयोग केले जातात तसेच प्रयोग ज्यू लोकांवर केले गेले आणि त्य...