Skip to main content

वि प्रेफर स्मार्ट लँग्वेज



*वि प्रेफर स्मार्ट लँग्वेज*
- सुबोध अनंत मेस्त्री

==========================================================

"एक्स्क्यूज मी....आर यु गाईस लोकल हिअर?",  एक तिशी पस्तीशीतल्या तरुणाने आमच्या जवळ येऊन विचारलं.  सामान्य मध्यमवर्गीय घरातला, गोल चेहरा, सावळा वर्ण, इन शर्ट आणि हातात नायलॉनची झिप असलेली बॅग.  त्याच्या बोटाला धरून एक 5-6 वर्षाची फ्रॉक घातलेली मुलगी खेळत होती.  बेळगाववरून परतताना नरसोबाची वाडी करून संजय दादांनी आम्हाला कोल्हापुरात सोडलं होत.  रिजर्वेशन केलेल्या बसला यायला अजून 3-4 तास होते.  तेवढ्या वेळात महालक्ष्मी मंदिर, त्याच्या बाजूचा शाहू महाराजांचा राजवाडा आणि नंतर जेवण असा प्लॅन आम्ही केला होता.  मंदिरात लाईन पाहून मी आणि दादाने मुखदर्शन घेण्याचं ठरवलं.  राजेश भाई लाईन मध्ये उभे होते आणि आम्ही त्यांची वाट पाहत मंदिराच्या आवारात गप्पा मारत उभे असताना या तरुणाने आम्हाला गाठलं होत.

"नो, वि आर नॉट.  वी आर फ्रॉम न्यू बॉम्बे",  मी त्याच्याकडे पाहून उत्तर दिल.

"व्हीच लँग्वेज डु यु प्रेफर....आय मिन हिंदी, मराठी, इंग्लिश?", त्याने विचारले.

"वि आर कंफरटेबल विथ मराठी", मी सांगितलं.

तो थोडा कचरला आणि पुढे सांगू लागला, "माझ नाव अनिल.  अँक्चुअली मी पण न्यू बॉम्बेमधूनच आहे.  खारघर सेक्टर 33.  खर तर आमची बॅग आज सकाळी गाडीतून हरवली.  त्यात सगळं सामान होत.  पैसे होते.  मला खरच काही सुचत नाही.  आज बँक पण बंद आहेत.  तुम्ही काही मदत करू शकता का?  हवं तर तुम्ही माझे सगळे डॉक्युमेंट ऑनलाइन चेक करू शकता."

अशा केसेस मी बऱ्याच वेळा ऐकल्या होत्या आणि काही लोक अस सांगून कसे पैसे काढतात हे पण मला माहित होतं.  हा मला थोडा जेन्यूईन वाटला.  पण तरीही लगेच इमोशनल होऊन विश्वास टाकावा असही करू शकत नव्हतो.

"PayTm आहे का तुमच्याकडे.  तुम्ही मला पैसे ट्रान्सफर करा मी तुम्हाला कॅश देतो", मी त्याला विचारलं.

"नाही.  नाही माझ्याकडे", त्याने नकारार्थी मान हलवली.

"स्मार्टफोन आहे ना? इंस्टॉल करा आणि ट्रान्सफर करा. ATM असेल ना?", मी सुचवलं.

"नाही ना अहो.  माझा मोबाईल पण गेला बॅगेतून आणि सगळे कार्ड पण.  आता फक्त बायकोचा मोबाईल आहे पण साधा आहे बटनवला.  ती पण आहे इथे पण आत गेलीय. माझा मोबाईल असाही स्विचऑफ होता.  अजूनही लागत नाही", त्याने हताशपणे सांगितलं.

मी आणि दादा काय करु शकतो विचार करत होतो.

"खर तर बायकोला मायग्रेनचा त्रास आहे. तिला सांगितलं की माझ्याकडे आहेत पैसे.  तिला समजलं तर उगाच प्रॉब्लेम होईल.  आता तुमच्याकडून हेल्प घेताना पण तुम्ही मित्रच आहात असं सांगणार आहे मी.  उद्या बँक उघडतील अशाही.  फक्त आज रात्रीचाच प्रश्न आहे.  राहण्याची सोय झाली तरी चालेल.", तो चेहरा पाडून सांगत होता.

"तुमच्याकडे काहीच डॉक्युमेंट नाहीत मग पैसे कसे काढणार तुम्ही?", मी उत्सुकतेने विचारलं.

"ते कसही मॅनेज होईल.  माझा अकाउंट मला माहीत आहेच", त्याने सांगितलं.

"ठीक आहे.  तुम्हाला मुंबईलाच जायचं आहे ना.  आम्ही तुमची तिकीट काढतो.  तुम्ही डायरेक्त आम्हाला स्टँडवर भेटा.  आम्ही तासाभरात जाऊ तिकडे.  तिथे या आम्ही समोरासमोर तुम्हा तिघांची तिकीट काढतो.  तुम्ही मुंबईला गेलात तर मला ट्रान्सफर करा पैसे.  माझा नंबर लिहून घ्या आणि मला कॉल करा.",  कॅश देणार नाही हे कन्फर्म आहे अशा सुरात नवीन तोडगा  मी त्याला सांगितला.

"हो चालेल ना.  मी तिकडे भेटतो", असे बोलून त्याने पेन आणि एक खिशातला पेपर काढला.  त्यावर माझ नाव आणि नंबर लिहून घेतला.

"थॅंक यु हा.  मी तिकडेच कामाला आहे IKC मध्ये.", त्याने सांगितलं.

आम्ही ठीक आहे म्हणून वळलो तर त्याने पुन्हा सांगितलं, "पैसे नसल्यावर खूप प्रॉब्लेम होतात.  ही बघा ना दुपारपासून आईस्क्रीम मागतेय पण पैसे नसल्यामुळे मी टाळतोय फक्त", त्याच्या वाक्याने आम्ही पुन्हा मागे पाहिलं.  ती छोटी अजूनही त्याच बोट धरून त्याच्याभोवती फिरत होती.  तिला आमच्यामध्ये काय डिस्कशन चालू आहे याबाबतीत काही घेणं देणं नव्हतं.  ती आपल्याच धुंदीत होती.  एक वेळ वाटलं की पैसे काढून द्यावेत पण पुन्हा हात आवरला आणि निघालो.

"तुम्हाला कॉल येईल.  88 नंबर आहे एंडला.  पिकअप करा.", तो आमच्यामागून आला आणि त्याने सांगितलं.

आम्ही हो म्हणून निघालो.  बाहेर निघताना दादाला सांगितलं, "जर हा खरंच जेन्यूईन असेल तर येईल स्टँडवर.  मग काढू त्याच तिकीट".  दादाने होकारार्थी मान हलवली.

नंतर मी खूप वेळ त्याच विचारात होतो.  पैसे द्यायला हवे होते अस वाटूनही गेलं.  ती छोटी स्टँडवर आली तर तिला हवं ते देऊ अस मनाशी ठरवलं.

"आता प्रोफेशनल भिकाऱ्यांचा प्रकार वाढलाय रे.  ते वागतात पण एकदम सुशिक्षित.  इंग्लिशमध्ये बोलणार.  याने पण बघितलं इंग्लिश मध्ये सुरुवात केली.  कुणासमोर अशी सिच्युएशन मांडली तर पैसे चांगलेच मिळणार ना.  कमीत कमी 100 तरी.  भिक मागण्याचा ऍडव्हान्स प्रकार आहे हा.  सी. एस. टी. ला भरपूर असतात असे.",  दादा मला सांगत होता.

"पण हा जेन्यूईन वाटला मला.  त्याने लोकेशन पण बरोबर सांगितलं पाहिलस का?",  मी दादाला कनविन्स करत होतो.

"त्यांना सगळं पाठ असत रे.", दादाने सांगितलं.

तसही मी ट्रॅफिक सिग्नल पिक्चरमध्ये अस एक कॅरॅक्टर पहिलच होत.

"आपण कुठे पैसे दिलेत.  आला तिकडे तर काढू तिकीट.  काही लोक असतात तसे.  पण त्यांच्यामुळे काही खरोखर प्रॉब्लेम मध्ये असणाऱ्या लोकांना इश्यू होतो.  आपण ऐकून घेतलं आणि मदत करण्याची तयारीही दाखवली.  बघू आला तर आला",  मी त्याला सांगितलं.

मी वाट पाहिली पण पुढच्या 3-4 तासात फोन आलाच नाही.  कदाचित त्याला कुण्या दुसऱ्याची मदत मिळाली असेल किंवा त्याच्या बायकोच्या मोबाईलची बॅटरी डाउन झाली असेल किंवा कॉल लागला नसेल की तो इतरांसारखा फ्रॉड होता. काही फ्रॉड लोकांमुळे खरोखर संकटात असणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाही.  पण आम्ही आमच्याकडून त्याच पूर्ण ऐकून मदतीचा हात दिला होता आणि त्याला खरच गरज असती तर तो स्टँडपर्यंत कसाही आला असता.  जर तो खरोखरच फ्रॉड असेल तर तो त्या लहान मुलीवर आतापासून काय संस्कार करतोय? मेहनत न करता लोकांना फसवून त्यांच्या इमोशन्सचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातून पैसे कसे काढायचे? मनात बरेच विचार होते आणि शेवटी एक अनुभव गाठीशी घेऊन आम्ही कोल्हापूर सोडलं.

==========================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656


#sahajsaral

Comments

  1. Your write up always speaks in terms of living entities in front of me sir... Whenever I read any article, it seems a short film is running in front of me.... Becomes a fan of your blog... It always gives me some valuable...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी