Skip to main content

ए दिल है मुश्किल

*ए दिल है मुश्किल*
- सुबोध अनंत मेस्त्री

=========================================================================

तारुण्याच्या बेभानपणात काही अशा काही चूका घडतात की ज्याचा परिणाम आयुष्यावर बेतू शकतो. अशीच घडलेली ही एक घटना. हे आर्टिकल ज्या मुलीवर लिहिलं गेलं आहे तिची परवानगी हे आर्टिकल पब्लिश करण्याआधी घेतलेली आहे.

=========================================================================

सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे व्हाट्सप उघडून पाहिलं. रेग्युलर ग्रुपच्या मेसेज बरोबर सोनलचा (नाव बदलले आहे) पर्सनल मेसेज डाउनलोड झाला. त्यात तिच्या लग्नाची पत्रिका आली होती. पत्रिका पाहून मी तिला "Congrats!!!" चा मेसेज टाकला त्यावर तिने "लग्नाला या" असा रिप्लाय दिला.

सोनलच आयुष्य रुटीनला लागतंय पाहून समाधान वाटलं. एखाद वर्षांपूर्वीची माझी आणि सोनलची ओळख. तशी खास ओळख नाही म्हणता येणार कारण आम्ही मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर सॉफ्टस्किल ट्रेनिंग देत असताना तिथे भेटलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी ती एक. आम्ही आमचे मोबाईल नंबर सगळ्या मुलांना शेअर केलेच होते आणि बरेच विद्यार्थी काही ना काही निमित्ताने आमच्या संपर्कात होते. तसाच तिने मला एकदा व्हाट्सपवर "हाय दादा" असा मेसेज टाकला होता. तिकडच्या मुली/मुलं आम्हाला सहसा दादा म्हणूनच हाक मारीत. आम्ही त्यांना ट्रैनिंग दरम्यान तशी सवय लावली होती. तिचा डीपी पाहिला आणि चेहऱ्यावरून ओळखलं. डीपी मध्ये ती आणि हार्ट शेप मध्ये एक मुलगा असा फोटो होता. असे फोटोज पाहून तो मुलगा कोण आहे हे विचारण्याची गरज सहसा भासत नाही. तिने समोरुन तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल आणि तो कसा चांगला आहे हे मला सांगण्यास सुरुवात केली. तिच्या बोलण्यातून तो आणि ती लग्नापूर्वीच एकत्र मुंबईत राहतात हे तिने मला बिनधास्तपणे सांगितलं आणि नव्या पिढीचे पुढारलेले विचार म्हणून मी थोडक्यात दुर्लक्ष केलं. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत हे सांगायला ती विसरली नाही.

नंतर खूप दिवस असा काही बोलण्याचा संबंध नव्हताच. तिचे रोज न चुकता मोटीवेशनल किंवा संदेशात्मक मेसेज मला येत होते आणि बाकीच्या मुलांसारखच ट्रीट करून मी कधी वेळ असेल तेव्हा रिप्लाय देत होतो. माझ्या व्हाट्सअप मध्ये असणाऱ्या बऱ्याच ग्रुपपैकी एका ग्रुपमध्ये तीसुध्दा होती. त्या ग्रुपवर तिच्या मैत्रिणी तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल मुद्दाम चिडवीत आणि तीसुद्धा तिच्या नवऱ्याच्या बाजूने "हे आमचे कसे चांगले आहेत" यावर वाद घाली. तिने पाठवलेली फेसबुक रिक्वेस्ट मी ऍक्सेप्ट केली आणि तिच्या प्रोफाइल वर सुद्धा त्या दोघांचेच फोटो बऱ्यापैकी होते. तिच्या बिनधास्तपणाच कौतुक वाटलं.

काही दिवसांनी तिचा रात्री मेसेज आला. "दादा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्हाला केव्हा फोन करू?". मी तिला सकाळचा वेळ दिला. सकाळी दिलेल्या वेळी तिचा फोन आला. ती बऱ्यापैकी बिथरल्यासारखी वाटत होती. ती त्यांच्या ब्रेकअपबद्दल मला सांगू लागली आणि तो तिला एकटीला टाकून कसा सोईस्करपणे वेगळा झाला हे ती सांगत होती. मला या गोष्टीं ऐकण्याची बऱ्यापैकी सवय होती आणि जे कुणी कॅडेट्स (पोलीस प्रशिक्षणार्थी) आम्हाला फोन करायचे त्यांचे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स हे प्रेम प्रकरणाबद्दलच असायचे. मी सर्व ऐकून तीला माझ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती समजण्यापालिकडे आहे याचा अंदाज मला येत होता. तिला काहीस पटतंय अस जाणवून देऊन तिने फोन ठेवून दिला.

नंतर बरेच दिवस तिचा काही मेसेज आला नाही. पण एका दिवशी अचानक तिचा मला मेसेज आला, "त्या दिवशी कस सांगू मला कळत नव्हतं दादा. मी प्रेग्नन्ट आहे. तो मला फसवून निघून गेला पण आता मी काय करू मला खरच कळत नाही. मी सुसाईडचा पण प्रयत्न केला पण मरायला सुद्धा होत नाही". तिने त्या मेसेज बरोबर एक इमेज पाठवली आणि त्यात तिने स्वतःच्या ब्लेडने कापलेल्या मनगटाचा फोटो टाकला. मी ते बघून पुरता हादरून गेलो आणि एखाद्याच आयुष्य एवढं स्वस्त का असावं याचा रागसुद्धा आला.

"कधीपासून ओळखतेस त्याला?", त्या फोटोचा माझ्यावर काही परिणाम नाही झाला अस दाखवून मी मेसेज टाकला.

"दीड वर्ष झाल असेल", तिचा रिप्लाय

"दीड वर्षात त्याला जे हवं होतं ते घेऊन तो निघून गेला. मुळात ज्याला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं असेल तो तुला अस संकटात एकटीला टाकून जाईल का? जर तो आत्ताच गेला असेल तर ते चांगलंच झालं ना? पुढे तुझ्या आयुष्याची वाट लागण्यापेक्षा चुकीच्या व्यक्तीपासून तुझी सुटका झाली असं समज.", मी तिला मेसेज टाकला आणि तिचा लगेच रिप्लाय आला.

"पण तो असा मला सोडून जाईल मला नव्हतं वाटलं."

"पण तो गेलाय ना. मग चुकीच्या व्यक्तीसाठी तू तुझं आयुष्य का संपवायला निघालीस. जेव्हा पोलीस भरतीसाठी अप्लिकेशन येतात त्यात हजारोमधून वेगवेगळ्या परीक्षा देऊन थोडेफार लोकच सिलेक्ट होतात आणि त्यात तू एक आहेस. जर एवढं फायटिंग स्पिरिट तुझ्यामध्ये असेल तर या अशा प्रॉब्लेमने तू सरेंडर का होतेयस? नको त्या चुकीच्या व्यक्तींसाठी फुकट घालवायला आयुष्य नाही आपलं", तिचा त्रास आणि भावना मला कळत होत्या आणि छोट्या बहिणीचाच काही पर्सनल इश्यू आहे असं मी तिला समजावत होतो.

"पण या बाळाला मी जन्म देणार.", तिचा मेसेज पाहून तिला मी कोणत्या चुकीच्या पद्धतीने मोटिव्हेट करतोय का अस उगाच मला वाटून गेलं.

"कुमारी माता किंवा तिचे प्रॉब्लेम स्वीकारण्याइतपत आपली सोसायटी अजून मोठ्या मनाची नाही. पण जर तुज्याकडे लढण्याची इच्छाच असेल तर जे तुला योग्य वाटत तू कर", यापुढे समजवण्याकडे माझ्याकडेही शब्द नव्हते. कारण अशाच कुमारी माता आपलं समाजातल स्थान राखण्यासाठी नंतर जन्म झालेल्या मुलांना अनाथ आश्रमांत सोडतात हे मी स्वतः तिकडच्या व्यक्तींकडून कित्येकवेळा ऐकलं होतं.

"थॅंक यु दादा. पण प्लिज हे कुणाशी बोलू नकोस. मी मोठा भाऊ म्हणून तुला सांगितलं.",

"नो टेन्शन. तुला त्रास होईल असं काहीच होणार नाही", माझा हा मेसेज जाण्याआधीच ती ऑफलाईन गेली होती.

बरेच दिवस तिच्याकडून काही मेसेज नव्हता. मला भीती होती की तिने पुन्हा काही चुकीचं केलं असेल. मी एक दोन वेळा तिला समोरून मेसेज टाकला पण तिला तो डिलीवर झाला नाही. नंतर तो विषय मी माझ्याकडून संपवला होता.

काही दिवसानंतर एका नवीन नंबरवरून तिचा मेसेज आला. मी डीपीवरून तिला ओळखलं.

"दादा थॅंक यु. तुझ्याशी बोलल्यानंतर मी खुप विचार केला आणि शेवटी सगळं मागे सोडून दिलं. माझं लग्न ठरतंय. चार पाच दिवसांनी साखरपुडा आहे. हे माझं नवीन आयुष्य तुझ्यामुळेच दादा.", मी मेसेज वाचून थोडा सुखावलो. बाळाच काय केलंस हे विचारण्याच धाडस मी केलं नाही.

"ऐकून बर वाटलं. ऑल दि बेस्ट", एवढाच मेसेज मी तिला टाकला.

त्यानंतर तिचे एंगेजमेंट चे फोटो फेसबुकवर पाहिले व आता ही लग्नाची पत्रिका. आयुष्यात चढ उतार येणार, चुकीची माणस भेटणार, चुकीच्या घटना घडत राहणार. पण घडून गेलेल्या भूतकाळात कितीवेळ खितपत पडून राहायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असत. सोनल तिच्या भूतकाळात अडकून न राहता तिचा वर्तमान जगत भविष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करतेय हे पाहून खूप छान वाटलं.


=================================================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656


#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी