Skip to main content

Posts

एका तऱ्याची गोष्ट

“अरे नाय उलटणार साहेब...एकांद्या वेली कधी कधी पंदरा मानस घेऊन जातो मी...मदी मच्चीच्या टोकऱ्या पन असतात.  तुम्ही खाली पाट घेऊन बसा", एकदम आत्मविश्वासाने त्याने बंधाऱ्यापासून  पाण्याच्या दिशेला गेलेली होडी, हातातली काठी विरुद्ध बाजूला दाबून परत होडी बंदाऱ्याला टेकवली.  "बसा बसा काय होत नाय.  उधान येतंय दर्याला.   सगल्यानी एकदम बसा नायतर अर्धे अर्धे चला.", त्याने काठी दाबतंच आम्हाला सांगितलं.  "अर्धे अर्धेच जा.  अर्धी माणसं अजून यायचीत",  आबांनी शंभूला कडेवर सावरत आम्हाला सांगितलं. केळशीला जायची ही माझी चौथी वेळ.  निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिलेल्या या गावाची ओढ सुटत नाही.  मावशी खाडीपलीकडच्या साखरी गावात असणाऱ्या एका आदिवासी पाड्यातील अंगणवाडीत शिक्षिका म्हणून काम करतात. आबासुद्धा त्याच शाळेत शिकवायला होते.  पण तीन वर्षांपूर्वीच त्यांची रिटायरमेंट झाल्यामुळे मावशी आता एकट्याच शाळेत जातात.  तिकडची शाळा कशी असेल हे बघण्याची उत्सुकता आम्हाला होतीच पण त्यापलीकडे सार्थक आणि अश्मीला गावातली मुलं कोणत्या परिस्थिती शिकतात...

...म्हणूनच ते "थोर" असतात

मला टीव्ही पाहायला फारसा आवडत नाही पण रात्री जेवताना चालू असल्यामुळे जेवण होईपर्यंत जे काही चालू असेल ते बघावं लागतं. आज "दोन स्पेशल" हा कार्यक्रम बघण्याचा योग आला. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत हे आजचे पाहुणे होते. दोन्ही कलाकार माझे आवडते म्हणून इंटरेस्टने त्यांचे किस्से ऐकत होतो. त्यात अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा मनाला फारच स्पर्शून गेला. कलाकार जरी असला तरी त्याला स्वतःच भावविश्व असतं. त्यालाही भावना असतात. त्याचंही कुणाशी नातं असतं अशा जितेंद्र जोशींच्या विषयावर "कलाकाराच्या भावविश्वाशी कुणाला काही घेणं देणं नसतं. त्याने त्याचं काम करत राहिलं पाहिजे", म्हणत त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. अशोक सराफ यांच्या एका विनोदी सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि त्याचवेळी त्यांचे बाबा सिरिअस होते. त्यांचा छोटा भाऊ हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत होता. बाबा हॉस्पिटलमध्ये सिरिअस असताना मनाची घालमेल होणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक सीननंतर ते भावाला फोन करून परिस्थिती विचारत होते. फोनवर भाऊ फक्त श्वास चालू आहे एवढंच कन्फर्म करत होता. अशाच एका सीनच शूट...

उधार

"पप्पा, त्या डेअरीवाल्याचे दहा रुपये उधार राहिलेत. मी दूध आणलेलं ना मागे त्याचे", बाबांनी बिल्डिंगखालून अंडी आणायला पैसे दिले होते, त्यात दहाची नोट पाहून सार्थकला ते आठवलं असेल. "बाबू लेट होतंय...जा आधी खाली", बाबांचा मागून आवाज ऐकून तो तिथून लगेच निसटला. मीसुद्धा फारसं लक्ष दिलं नाही. दुपारी शाळेची तयारी करताना त्याला पुन्हा एकदा आठवण झाली. "माझ्याकडे तेव्हा ४० रुपये होते. मी त्याला बोललो आप उधार दो मै आपको लाके देता हू आणि विसरलो", तो शर्ट घालता घालता मला सांगत होता. "उधार का घेतले तू? घरी येऊन परत घ्यायचे दहा रुपये आणि मग जायचं", उगाच उधारी वैगेरे प्रकार या वयात कसे मुलांना कळतात या भावनेने त्रासून बोललो. "अरे मी त्याला ४० रुपये दिले होते दूध आणायला मग पन्नास कसे जातील?", बाबांचा किचनमधून आवाज आला. "अहो पप्पा, मी म्हैशीच दूध आणलं. गायीचं नव्हतं. म्हणून पन्नास गेले", त्याची तयारी चालूच होती. "कुणाकडून उधार घ्यायचं नाही. पैसे कमी पडले तर घरी येऊन घेऊन जायचं. डेअरी एवढी लांब आहे का? शाळेत जाताना बघूया",...

सही "दुबई"

माझी दुबई ट्रिप महेश चव्हाण आणि मनोज माळवे या माझ्या दोन मित्रांमुळे घडली. मागच्या वर्षी मलेशिया सिंगापूर केल्यानंतर यावर्षी काहितरी नवं शिकायला मिळेल हा विचार होताच पण त्याचबरोबर मला ओळखणारे सोडून महाराष्ट्रातले २०-२२ उद्योजक आहेत हे ऐकल्यावर मी जास्त आढेवेढे घेतले नाहीत.  दुबई प्रवास एक लर्निंग एक्सपिरियन्स होणार यात शंका नव्हती आणि तसंच झालं. दुबईचं नाव खरंतर (दु बई - दो भाई) असं आहे.  सुरुवातीला बिजनेस पार्टनर म्हणून एक भारतीय व्यक्ती व एक इराणी व्यक्ती असे दोघेजण पुढे आले होते.  त्यावरुन हे नाव ठेवलं गेलं.  दुबई खरं तर एक देश नाही तर एक राज्य आहे.  या देशाचं नाव युनायटेड अरब एमिरेट्स (UAE).  एमिरेट्सचा अर्थ होतो श्रीमंत असे बरेच राजे.  म्हणजेच हे श्रीमंत अशा अरब राजांचं राष्ट्र आहे आणि ते खरंसुद्धा आहे.  इथे एकूण सात राज्य आहेत ज्यांना एमिरेट्स म्हटलं जातं.  त्यातलं एक दुबई जे कमर्शिअल स्टेट आहे.  अबू धाबी हि या देशाची राजधानी आहे व पूर्ण तेल याच राज्यातून काढलं जातं. जर आज अबू धाबीमध्ये तेल सापडणं बंद झालं तरीही पुढची १००...

लहानगा इन्व्हेस्टर

====================================================================== नमस्कार, आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना सहज खर्चाला पैसे देणे किंवा त्यांचे हट्ट पुरवणे हे अगदी कॉमन आहे.  पण याचबरोबर ती मुलं हट्टी होणार नाहीत किंवा त्यांना पैशाची किंमत कळेल याची काळजी घेतली पाहिजे.  लहान वयात मुलांना गुंतवणुकीच महत्व पटवून दिलं तर त्यांना पूर्ण आयुष्य सुखात जगण्यात काहीच त्रास होणार नाही हे नक्की.  मी ते कसं करतोय या अनुभवावर माझा हा लेख. ===================================================================== "अरुण अंकल, आज मेरा बर्थडे था ना तो मेरा पिगी बँक ओपन किया है| टू थाउजंड फोर हंड्रेड फोरटी रुपीज निकला है|  मै पप्पा के पास भेजता हु| आप मेरे अकाउंट मे डाल देना|", सार्थकने मी विसरेन या विश्वासाने डायरेक्ट अरुण सरांना फोन करून माझ्याकडून पैसे घेण्याची सूचना आधीच देऊन ठेवली.  हे पैसे त्याच्या म्युच्युअल फ़ंड अकाउंट मध्ये फिरवायचे होते.  खरं तर त्याचा अकाउंट उघडायला एक वर्ष लेटच झालं होतं. सातव्या वाढदिवसाला जेव्हा त्याने त्याचा गल्...

मेडिसिन बॉक्स

======================================================== नमस्कार, आयुष्यातलं सगळ्यात जास्त गृहीत धरलं जाणारं नातं म्हणजे आई-बाबा.  आपण नकळत त्यांना दुखावून जातो पण त्यांच्या लेखी क्षमा हा शब्द कायमच आहे.  "तुम्ही कधी म्हातारे नाय होणार काय रे भाडखाऊ?", हा नाना पाटेकरांचा "आपला माणूस" चित्रपटातला संवाद यावेळी आठवतो.  आपण सगळं करत असताना खरंतर कुठेतरी कमी पडतो याची मला झालेली जाणीव म्हणजे हा लेख ========================================================= "या गोळ्या कुणी टाकल्या यात नवीन?", आईच्या मेडिसिन बॉक्समध्ये इव्हनिंग सेक्शनमध्ये गोळ्या पाहून मी विचारलं.  तिला गोळ्या वेळच्यावेळी खायला समजत नाही म्हणून आठवडभराचं सकाळ दुपार संध्याकाळ असे स्लॉट्स असलेलं एक मेडिसिन किट बॉक्स मी दहा दिवसापूर्वी घेऊन आलो होतो.  त्यात सगळ्या गोळ्या सकाळ आणि संध्याकाळच्या कापून ठेवल्या.  आपण बोलताना ती दुसऱ्याच विचारात असते म्हणून तिला तीन वेळा समजावून सांगितलं.  आज आठवडा संपला म्हणून आठवडभराच्या गोळ्या पुन्हा भरायच्या म्हणून पाहिलं तर आठवड्याभराचे एव्हीनिंग ...

डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र कथेवरून शिकण्यासारख्या १० गोष्टी

मी चित्रपट खूप कमी पाहतो.  बऱ्याच जणांकडून रिव्ह्यू घेऊन जर खूपच चांगला फीडबॅक असेल तरच सहसा.  पण "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" या चित्रपटाचा रिव्ह्यू घेण्याचा प्रश्नच आला नाही.  ट्रेलरच इतका जबरदस्त होता की हा सिनेमा बघायचा मोह आवरला नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा मुहूर्त लाभला.  चित्रपट अप्रतिमच आहे.  तो नाट्यभूमीचा काळ मांडण्यात दिग्दर्शकाला यश आलंय आणि त्यातही सर्वच कलाकारांची भूमिका अप्रतिम.  या चित्रपटातून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यातल्याच काही तुमच्यासाठी. १. तीच गोष्ट करा ज्यात तुमचं मन तुम्हाला साथ देतं व्यवसायाने डेंटिस्ट असून सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस सोडून डॉक्टर नाट्यभूमीकडे वळले.  फक्त पोटापाण्यापुरतं न जगता आपण काहीतरी मोठं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना होता.  घरातल्यांचा विरोध असूनसुद्धा त्यांनी ही जोखीम पत्करली होती.  नंतर सिनेमामध्ये यश मिळूनसुद्धा ते खूप आनंदी नव्हते कारण त्यांचं मन रंगभूमीवर जास्त रमत होतं. त्यात आवडलेला एक संवाद, "आपलं मन रमतं त्या क्षेत्रात अपयश मिळण्यापेक्षा ट्रॅजिक असतं आपलं मन...