Skip to main content

...म्हणूनच ते "थोर" असतात


मला टीव्ही पाहायला फारसा आवडत नाही पण रात्री जेवताना चालू असल्यामुळे जेवण होईपर्यंत जे काही चालू असेल ते बघावं लागतं. आज "दोन स्पेशल" हा कार्यक्रम बघण्याचा योग आला. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत हे आजचे पाहुणे होते. दोन्ही कलाकार माझे आवडते म्हणून इंटरेस्टने त्यांचे किस्से ऐकत होतो. त्यात अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा मनाला फारच स्पर्शून गेला.

कलाकार जरी असला तरी त्याला स्वतःच भावविश्व असतं. त्यालाही भावना असतात. त्याचंही कुणाशी नातं असतं अशा जितेंद्र जोशींच्या विषयावर "कलाकाराच्या भावविश्वाशी कुणाला काही घेणं देणं नसतं. त्याने त्याचं काम करत राहिलं पाहिजे", म्हणत त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. अशोक सराफ यांच्या एका विनोदी सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि त्याचवेळी त्यांचे बाबा सिरिअस होते. त्यांचा छोटा भाऊ हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत होता. बाबा हॉस्पिटलमध्ये सिरिअस असताना मनाची घालमेल होणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक सीननंतर ते भावाला फोन करून परिस्थिती विचारत होते. फोनवर भाऊ फक्त श्वास चालू आहे एवढंच कन्फर्म करत होता.
अशाच एका सीनच शूटिंग संपवून अशोकजींनी भावाला फोन केला आणि भावाने "ओव्हर" असं सांगितलं. आता बाबा या जगात नाही हे ऐकल्यावर त्यांची अवस्था काय झाली असेल हे त्यांनाच माहित. अजून तीन चार सीन शूट होणं बाकी होतं. अशावेळी कुणीही व्यक्ती लगेच हातातल्या सर्व गोष्टी सोडून हॉस्पिटलमध्ये निघाला असता आणि कुणीच काही म्हणू शकलं नसतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी शुटिंग सुरु ठेवायला सांगितलं. स्वतःचे सगळे सीन शूट करून घेतले. कोणता सीन बाकी नाही ना? याची खात्री करून घेतली आणि मगच ते तिथून निघाले. "माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी मी बाकी कुणाचं नुकसान का करु? जे घडायचं आहे ते घडून गेलंय ते मला स्वीकारलच पाहिजे. विदूषकाचं कसं असतं? त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय हे त्याच त्याला माहित. जगाला हसवणं हे त्याचं काम", हे त्यांचं वाक्य भावलं.

जगातल्या सर्वच मोठ्या व्यक्तींनी वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांच्या कामाला आणि कमिटमेंटलाच जास्त महत्व दिलं आणि म्हणूनच कदाचित ते लोकांच्या मनावर राज्य करू शकले.



Comments

  1. सर, मला तुमचे सर्व लेख खूप आवडतात .... तुम्ही प्लीज लिहत राहा...

    खूप छान ।। मस्त ।।☺️😊👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...