Skip to main content

.....आणि पासपोर्ट हरवला


"सुब्या, माझी वेस्ट बॅग बस मध्ये राहिली", अजाने डोक्यावर हात मारून मला सांगितलं.  तो टॅक्सीत जाऊन पुढच्या सीटवर बसला होता.  मी आणि संदीप मागे बसत होतो.  त्याने सवयीप्रमाणे कमरेवरची बॅग पुढे करण्यासाठी हात मागे टाकला आणि त्याला समजलं की बॅग नाही.  तो तसा झटकन उतरला.  बस बऱ्यापैकी पुढे निघून गेली होती.  धावत जाऊन पकडणं तर शक्यच नव्हतं.  फक्त पैसे गेले असते तर ठीक होत पण सोबत आम्हा तिघांचे पासपोर्ट त्यात होते त्यामुळे आम्हा तिघांनाही धडकी भरली.  टॅक्सी ड्रायव्हरला आम्ही बसचा पाठलाग करायला सांगितलं.  त्याने तुटक्या फुटक्या इंग्लिशमध्ये "पैसे आहेत का?" विचारलं.  आमच्याकडे इंडियन करन्सी आहे असं त्याला सांगितलं.  या संवादात एवढा वेळ गेला की बस पुढे निघून गेली होती.  बसचा पाठलाग करून फायदा नव्हता.  आम्ही कुआला लमपूर च्या हॉटेल मध्ये चेकइन करायचं ठरवलं व टॅक्सी त्या दिशेने नेली.

मलेशियामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टपण प्रायव्हेट कंपनीकडे असतो.   तिथे पोहचेपर्यन्त अजाने त्या ट्रॅव्हल कंपनीला फोन करून बसची माहिती घेतली.  आमचा स्टॉप लास्ट असल्याने ती बस आता त्यांच्या टर्मिनलमध्ये पार्किंगसाठी गेली होती.  अजाने त्या ड्राइवरचा पर्सनल नंबर घेतला.  ड्रायव्हरला फोन केला होता पण त्याला इंग्लिश कळत नव्हतं आणि अजाला त्याची भाषा. हॉटेलच्या रिसेप्शन पॅसेज मध्येच तिथल्या मॅनेजरशी अजयने इंग्लिशमध्ये संवाद साधून प्रॉब्लेम सांगितला व ड्रायव्हरशी बोलायला सांगितले.  पण आता ड्रायव्हर फोन उचलत नव्हता.  "नाईट शिफ्ट करून आल्यावर झोपतात हे ड्रायव्हर", मॅनेजरने सांगितलं.  आम्हाला हॉटेलमध्ये रूम चेकइन करून दिला होता.  खूप वेळाने फोन उचलल्यावर ड्राइवरने सांगितलं की, 'सगळे उतरल्यावर त्याने बस चेक केली पण काही नव्हतं.  शेवटी उतरणाऱ्या पॅसेंजर ने घेतलं असेल तर माहीत नाही'.  त्याच उत्तर आम्हाला पटलं नाही.  तिथे जाऊन चेक करतो म्हटल्यावर, 'टर्मिनल मध्ये बस साफ सफाईला जाते.  असेल जरी बसमध्ये तरी ते आतापर्यंत कुठल्या तरी साफसफाई कामगाराने काढून घेतल असेल.  आणि एकदा घेतल्यावर कुणी कबूल येत नाही' असं वरून त्याने सांगितलं.  आता टेन्शन थोडं वाढलं होत.  दोन दिवसानंतर भारतात परत यायची तिकीट बुक होती पण आता पासपोर्टशिवाय जाणार कसं?  हा प्रश्न होता.

"आउटपास मिळतो पण आपल्याला त्यांना लवकर देण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागेल", अजाने सांगितलं.  आम्ही रूमवर जाऊन पटापट आवरलं.  आउटपाससाठी जुन्या पासपोर्टची कॉपी लागणार होती.  मेलवर असावी म्हणून बाजूच्या मोठ्या हॉटेलच्या लॉबीमध्ये असणाऱ्या फ्री इंटरनेट कनेक्टेड कॉम्प्युटरवर आम्ही गेलो.  पण माझ्या मेलवर कॉपी नव्हती.  आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या स्कॅन कॉपी नेटवर ठेवण किती गरजेचं आहे हे त्यावेळी मला कळालं.  आता घरी फोन करून झेरॉक्स आहे का पहावी लागेल.  पण घरी सांगितलं तर घाबरतील म्हणून अजयच्या फोनवरून अन्नाला फोन केला व घरी सांगू नको या टर्मवर त्याला कॉपी चेक करायला सांगितली.  पण कॉपी सापडली नाही.  आता काय परवा आम्ही भारतात जात नाही अशी आमची मनस्थिती झाली होती.

आम्ही तसेच टॅक्सी करून पोलीस कम्प्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो.  एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसला लाजवेल अशी ती बिल्डिंग व तशीच ऑनलाइन सिस्टीम.  त्यांनी सगळं समजून घेऊन लगेच एक एफ. आय. आर. कॉपी प्रिंट मारून दिली.   यावेळेत टॅक्सी ड्राइवरबरोबर आमची ओळख झाली होती.  त्याला आमचा प्रॉब्लेम सांगितला व बस ड्राईवरला फक्त पासपोर्ट द्यायला सांगा अस आम्ही त्याला बस ड्राइवरशी बोलायला सांगितलं.  त्याने मलेशियन भाषेत त्या ड्रायव्हरशी संवाद साधला पण तो ड्रायव्हर काही कबूल येत नव्हता.  जर त्याने कबूल केलंही असत तर बाकीच सामान पण त्याच्याकडेच आहे हा संशय साहजिकच बळावला असता.  पर्याय नाही बघून शेवटी कंटाळून आऊटपासच काढू अस ठरलं.

दुसऱ्या दिवशी आउटपाससाठी जायचं म्हणून आम्ही हीच टॅक्सी बुक केली.  आम्हाला हॉटेलवर सोडून अजा त्याच्या ऑफिसमधून काही कॅश ऍडव्हान्स सॅलरी म्हणून अरेंज होते का ते पाहायला गेला.  कारण आमच्याकडे फक्त इंडियन करन्सी होती व अजाचं ए. टी. एम. सुद्धा त्या बॅगेतून गेलं होतं.  अजा गेली दीड वर्ष मलेशियामध्येच पेनांग एअरपोर्टवर काम करत होता व पेनांगमध्ये आम्ही त्याच्याच घरी राहत होतो.  एअरपोर्ट कुआला लमपूरला आहे म्हणून आम्ही शेवटचे 2 दिवस तिकडे राहणार होतो व तिकडून भारतात येणार होतो.  अजय तसाच परत पेनांगला जाणार होता.  त्याच ऑफिस कुआला लमपूरमध्येच असल्याने आता आर्थिक मदतीसाठी तो एक ऑप्शन होता.   रात्रभर पेनांग ते कुआला लमपूर प्रवास करून आम्ही सकाळी उतरल्यावर हा प्रकार घडला होता आणि आमची तारांबळ उडाली होती.  परदेशात जाऊन आपली ओळख पटवून देण्याचं पासपोर्टसारखं महत्वाचं डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर तिथे फिरण्याची सोडाच पण परत मायदेशी परतण्याची शाश्वतीसुद्धा कमीच.




मलेशियामध्ये सरकारी काम पाहण्यासाठी एक पूर्ण वेगळं शहरच आहे ज्याच नाव आहे पुत्राजया.  बी.के.सी मध्ये कॉर्पोरेट कल्चरचा येणारा फील तिकडच्या सरकारी ऑफिसेसना आहे.  तिथे कागदपत्रांवर काहीच चालत नाही.  सगळं कम्प्युटराईज.  टोकन सिस्टमने नंबर्स.  माझ्या पाकिटात असणारे ओरिजनल डॉक्युमेंट त्यांनी वेरीफाय केले.  नंतर एक साऊथ इंडियन दिसणाऱ्या बाईंकडे आमची सूत्र सोपवली गेली.  तिने काही प्रश्नोत्तरे केली व ४ दिवसात आउटपास मिळेल असं  सांगितलं.  आमची फ्लाईट परवाची होती.  "आमची ही फ्लाईट जर मिस झाली तर नवी तिकीट बुक करायला आमच्याकडे पैसे नाहीत", हा अजाने सुचवलेला युक्तीवाद आम्ही वापरला.  तिने थोडा वेळ थांबायला सांगितले.  लगेच इंडियन अँबसीला कॉल करून आमच्या पासपोर्टच्या सॉफ्टकॉपी तिने  मागवून घेतल्या.  सगळं वेरीफाय करून झाल्यावर "उद्या येऊन आउटपास घेऊन जा" अस सांगितलं.  आमच्या जीवात जीव आला होता.  म्हणजे आता भारतात परत जाऊ याची खात्री पटली होती. पण मला अजाचं टेन्शन होत.  आम्ही कसेही भारतात गेलो असतो पण त्याला अजून इथेच राहून पुढे काम करायचं होतं.  त्याच्या पासपोर्टमध्ये त्याच वर्किंग परमिट होत.  संध्याकाळी हॉटेलवर काही पैसे मिळतात का म्हणून आज त्याची दुसरी बॅग चेक होता आणि त्याला बॅगेत त्याचा पासपोर्ट सापडला.  म्हणजे हरवलेल्या त्या छोट्या बॅगेत फक्त माझा आणि संदीपचाच पासपोर्ट होता तर.  आम्ही जवळजवळ नाचायलाच लागलो.  मलेशियामध्ये बाहेरच्या देशातली माणसं दिसली की पोलीस लगेच पासपोर्ट विचारतात व पासपोर्ट नसेल तर सरळ पोलीस स्टेशनला नेतात हे ऐकलं होतं म्हणून संध्याकाळी थोडं दबकूनच ट्विन टॉवर फिरून आलो.  तशी एफ. आय. आर. ची कॉपी खिशात होतीच.   हा असा नियम भारतात नाही.  त्यामुळे कोणत्याही देशातली लोक बिनधास्त इकडे आपल्याला फिरताना दिसतात.

दुसऱ्या दिवशी त्याच टॅक्सी ड्राइवरला कॉल करून आम्ही पुत्राजयाला जाऊन आउटपास घेतला.  त्या बाईला कितीवेळा थँक्स बोललो असू मलाच आठवत नाही पण ती त्यावेळी इतक्या पटकन काम करून देणारी देवदूतच भासली.  भारतात हेच काम करून घ्यायला किती त्रास झाला असता याची जाणीव असल्यानेच तिने केलेल्या कामाच महत्व कळत होतं.  शेवटी अंधार माहीत असेल तरच उजेडाच महत्व कळतं.  येता येता पुत्राजयाच्या आजूबाजूची स्थळं आम्ही पाहिली.  आमचा टॅक्सी ड्रायव्हरसुद्धा चांगला असल्याने त्याने आम्हाला त्याला माहित असलेल्या सगळ्या स्थळांची माहिती दिली.

ज्या दोन दिवसात आम्ही मलेशियाची राजधानी फिरायला आलो होतो त्याच दोन दिवसात आम्हाला मलेशियाचा सरकारी कारभार पाहायला मिळाला.  अगोदरचे ५ दिवस तसे आम्ही फिरून वैगेरे मजा केली होतीच पण हा थ्रिल अनुभवणे म्हणजे ही ट्रिप अविस्मरणीय करणे असच काहीतरी होत

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...