Skip to main content

Posts

सॅंड्याच्या वाढदिवसानिमित्त

  आपल्या आयुष्यात लाईफ पार्टनरचा रोल महत्वाचा असतो आणि जर उद्योग असेल तर बिजनेस पार्टनरचा...आणि त्यात पार्टनरशी कनेक्शन स्ट्रॉंग असेल तर सोने पे सुहागा. चांगल्या माणसांच्या बाबतीत नशीब घेऊनच मी जन्म घेतला असल्यामुळे लहानपणापासूनच बरीच चांगली जीवाला जीव देणारी माणसं जोडली गेली...त्यातलाच एक...आमचा सॅंड्या. शाळेत एकत्र असल्यामुळे घरचेच संबंध. शाळेत लाजरा बुजरा, मोजकच बोलणारा. तसा शांत पण मस्तीखोर. त्याने वेगळे कोर्सेस घेतल्यामुळे कॉलेज वयामध्ये जास्त संबंध आला नाही पण तो नेहमीच घरी येऊन जाऊन असायचा. प्रत्येकाच्या फॅमिलीशी कनेक्ट स्ट्रॉंग. शाळेतले मित्र एकत्र भेटण्याच काही न काही निमित्त असायचंच त्यामुळे भेट होत राहायची. जेव्हा रायगडावर पहिल्यांदा बिजनेसचा विषय आला तेव्हा इतर तिघांबरोबर सॅंड्या तयार झाला आणि आमचं नातं मित्रापासून पार्टनर्समध्ये बदललं. इतक्या वर्षात बिजनेसच्या चढउतरांमध्ये मी बऱ्याच वेळा खचलो असेन पण तो कायम ठाम होता. प्रत्येक वेळी मला सांभाळून घेत, माझा फ्रीडम त्याने मला एन्जॉय करून दिला. मी जे नवीन काही करत होतो त्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं. स्...

मयाच्या वाढदिवसानिमित्त

  2009 साली पी. बी. सी. निमित्त आपली पहिली भेट झाली. दोघांचं राहण्याचं ठिकाण कामोठेच त्यामुळे ओळख आणि मैत्री वाढत गेली. प्रत्येक बुधवारी मिटिंग आणि उद्योजकांसाठी काम करणारे आपण दोघे धडाडीचे कार्यकर्ते, त्यातल्या त्यात उद्योगात दोघेही नवीन त्यामुळे आपली मैत्री बहरत गेली. स्ट्रगलचा बराचसा काळ आपण एकत्र घालवला आणि मग चार चौघात उठून दिसणाऱ्या "महेश" सरांच रूपांतर "मया"मध्ये झालं. तुझ्या नावात जरी शंकर देवाचं स्थान असेल तरी तुझं उग्र रूप मी इतक्या वर्षात पाहिलं नाही पण फायनान्स या विषयावर तू मार्केटवर नेहमी राज्य करत राहिलास. मंगेश नेहमी मस्करीत म्हणतो, " महेश जोक्स पण फायनन्सवरच मारतो. इतर कोणत्याही विषयावर बोलायला लागला तर पाचव्या मिनिटाला तो फायनान्स या विषयावर येतो", हे ऐकताना थोडं गंमतीदार वाटलं तरी मंगेश किंवा आम्हा सगळ्यांना डाऊन दी लाईन एक गोष्ट माहितेय की तू फायनान्स हा विषय कोळून प्यायला आहेस. यापेक्षा एका यशस्वी उद्योजकाच लक्षण ते काय असू शकत? कुठे किती बोलायचं आणि कुठे किती वेळ थांबायचं किंवा वेळेचा प्रॉडक्टिव्ह वापर कसा करायचा हे तुला अगदी...

आमच्या अप्पांची "साठी"

  आप्पा!  कोणत्याही मराठी कुटुंबामध्ये आदराने वापरला जाणारा शब्द.  काही लोक बाबांना आप्पा म्हणतात, काही आजोबांना काही काकांना.  आमच्या कुटुंबात असणाऱ्या आप्पानी या सगळ्याच भूमिका बखुबी निभावल्यात.   काही माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात आणि जन्म आणि मृत्युमधला प्रवास एक औपचारिकता म्हणून करतात, पाट्या टाकत आयुष्य जगतात. तर काही माणसे आपण ज्या साठी जन्म घेतला त्या हेतूचा शोध घेतात, तो पूर्ण होईल यावर दृढ निष्ठा ठेवतात, स्वतःला लायक बनवतात, हेतू साध्य करण्यासाठी जिवाचं रान करतात आणि एकाच आयुष्यात असं काही घडवतात जे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतं आमचे आप्पा त्यापैकीच एक! आप्पांचा जन्म १२ डिसेम्बर १९६२ रोजी डिंगणीत झाला.  घराची परिस्थिती बेताची होती.  आमच्या आजोबांचं हातावर पोट आणि घरात खाणारे १३ जण.  चिकन-मटण फक्त वर्षातून एक दोन वेळाच सणावारीच असायचं.   कधी भाकरी नाही म्हणून फक्त भाजीवरच पोट भरायचं तर कधी कोंद्याची भाकरी करून दिवस काढायचे. ती पण प्रत्येकाच्या वाट्याला एक चौथ भर आली तरी भाग्यच. अशी बिकट परिस्थिती.  पण आम...

"उद्योजकतेची दिवाळी"

  "पप्पा, मी यावर्षी पण कंदीलाचा बिजनेस करणार आहे", सार्थक मोठ्या उत्साहात परवा मला सांगायला आला. "कस्टमर कोण? अजय काका?", मी गमतीने विचारले.  गेल्यावर्षी बिजनेसच्या पहिल्या वर्षात अजय काका हा एकच कस्टमर होता. सार्थकला प्रोत्साहन म्हणून त्याने कंदील घेतले आणि पेमेंट म्हणून काही शेअर्स त्याला गिफ्ट म्हणून पाठवले. "यावर्षी अजय काकाला आम्ही पार्टनर म्हणून घेणार. प्रत्येक कंदीलामागे कमिशन देणार", सॉफ्टवेअरमध्ये बिजनेस डेव्हलपमेंटच काम बघणारा अजा, कंदील विकताना कसा दिसेल या कल्पनेने हसू आलं.  अजय काका सार्थकचा हक्काचा माणूस आहे.  आणि अजय काकाला पण सार्थकचं भारी कौतुकही आहे. "परीक्षा संपल्यावर सगळं", मी सार्थकला सांगितलं. आज परीक्षा संपवून घरी आला आणि अण्णासोबत जाऊन त्याने कंदीलाच सामान आणलं. अण्णाकडून मदतीच प्रॉमिस घेतलंच होतं. पार्टनरशिपची ऑफर टाकण्यासाठी अजय काकाला फोन करा म्हणून माझ्या मागे लागला होता. पण हे सगळं त्यानेच करावं हे त्याला मी सांगितलं. फोन लावून त्याच्याकडे दिला पण लाजत असल्याने तो धावत मम्मीकडे गेला. मम्मीनेही माझं बोलणं ऐकलं असल्याम...

दी "डींगणी" फाईल्स

  "चाचा अल्लाह से वैभव के लिये दुवा मांगो.  वो पहले की तरह ठीक होना चाहिए", दर्ग्याच्या बाहेर बाकड्यावर बसलेल्या चाचांना मी विनंती केली.  ते बहुतेक तिथले मुख्य असावेत.  वैभवला दर्ग्यामध्ये जाण्यासाठी शूज काढावे लागतील आणि पुन्हा घालायला त्रास म्हणून तो बाहेर त्या चाचांशी गप्पा मारत उभा होता.  "हमने तो मन्नत मांग रखी है.  वैभव हमारे भावकी का है.  हम उसको अलग नही मानते.  दर्गा का पुरा काम ऊसिने किया है.  कूच काम रहेगा तो हम सुभाष (वैभवचे बाबा) को नहीं.  वैभव को फोन करते थे.  बच्चे की किस्मत मे ये क्या आ गया.  ठीक तो ऊसको होना ही है.  उसके अलावा हमको भी नहीं जमता",  चाचांनी थोडस भाऊक होऊन आम्हाला सांगितलं.   फूणगुस हे आमच्या बाजूचं गाव.  डिंगणी आणि फूणगुस मध्ये एक खाडी आहे आणि त्या दोन गावांना जोडणारा खाडीवरचा पुल.  त्या पुलावर बरेच लोक संध्याकाळी फिरायला किंवा गळ टाकून मासे पकडायला येतात.  वैभव हल्ली काही दिवस सुपरवायजर म्हणून फूणगुसमध्ये एका मुस्लिम फॅमिलीकडे काम पाहत होता.  कोव्हिडच्या पह...

पानिपत

  "पानिपत" "तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" या वाक्यावर "विश्वास पानिपतच्या लढाईतच मेला" हे वाक्य कित्येक वर्षे कानावर पडलेलं.  हे ऐकायला बोलायला जितकं सहज तितका सहज पानिपतचा संघर्ष किंवा विश्वासरावांच बलिदान नक्कीच नव्हतं.   कित्येक वर्षे राहून गेलेलं पानिपतच पुस्तक गेल्या काही दिवसांत वाचून काढलं.  परकीय आक्रमणे हा विषय इतिहासात नवा नाही.  एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थावर उठली की ती किती नुकसान घडवून आणू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पानिपत. एक सामान्य प्यादा म्हणून मोगलांकडे काम करणारा नजीब स्वतःच्या कुटनीतीने जवळपास दिल्ली हस्तगत करून बसला.  त्याला मराठे डोईजड व्हायला लागले तेव्हा कंदाहारच्या अब्दाली बादशहाला इस्लामला होणारा धोका पटवून देऊन मोठ्या सैन्यानिशी त्याने हिंदुस्तानात पाचारण केले.   नजीबला संपवण्याची संधी बऱ्याच वेळेला याआधी आली होती.  मराठ्यांचे प्रमुख सरदार मल्हारराव होळकर यांनी या नजीबलाच मानसपुत्र बनवून ठेवला होता.  जेव्हा रघुनाथराव पेशवे त्यांना मारण्यासाठी गेले तेव्हा मल्हारराव आपल्या मराठ्यांना आडवे आले आणि त...

रिकनेक्शन

  काही दिवसांपूर्वी चौधरी बाईंनी फोन न करण्यावरून माझी कानउघडणी केल्यापासून केव्हा एकदा त्यांना भेटतो असं मला झालं होतं आणि शेवटी तो योग आला.  घाटकोपरला "नन्ही कली" उपक्रमाचा सेशन संपवून बाईंच्या घरी जायचं ठरलं.  बाईंना आदल्यादिवशी तशी कल्पना देऊन ठेवली होती.  "मी कुठे जातेय.  मी मोकळीच आहे.  केव्हाही ये", बाईंच्या या उत्तराने आमची भेट पक्की झाली.  बाईंना फोन केला तेव्हा बाई चेंबुरलाच शाळेसमोरच्या त्यांच्या जुन्या घरी मोठ्या मुलाच्या घरी होत्या.  तिथूनच त्यांच्यासोबत देवनारच्या घरी जायचं ठरलं.  त्यांना घेण्यासाठी गाडी घेऊन शाळेसमोर आलो.  त्यांच्यासमोर हाफ पॅन्टवर फिरणारी आम्ही मुलं.  मी गाडी घेऊन आलोय बघून त्या खूपच खुश झाल्या.  त्या गाडीत बसणार म्हणून मलाही आनंद होताच.  दरवाजा उघडून त्यांना गाडीत बसवलं.  मागे प्रतिभा आणि त्या, पुढे मी आणि सार्थक.   सातवीला चौधरीबाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या.  शाळेसमोरच त्यांचं घर.  एकदा बाई आजारी म्हणून शाळेत आल्या नाहीत....