Skip to main content

मयाच्या वाढदिवसानिमित्त

 



2009 साली पी. बी. सी. निमित्त आपली पहिली भेट झाली. दोघांचं राहण्याचं ठिकाण कामोठेच त्यामुळे ओळख आणि मैत्री वाढत गेली. प्रत्येक बुधवारी मिटिंग आणि उद्योजकांसाठी काम करणारे आपण दोघे धडाडीचे कार्यकर्ते, त्यातल्या त्यात उद्योगात दोघेही नवीन त्यामुळे आपली मैत्री बहरत गेली. स्ट्रगलचा बराचसा काळ आपण एकत्र घालवला आणि मग चार चौघात उठून दिसणाऱ्या "महेश" सरांच रूपांतर "मया"मध्ये झालं.
तुझ्या नावात जरी शंकर देवाचं स्थान असेल तरी तुझं उग्र रूप मी इतक्या वर्षात पाहिलं नाही पण फायनान्स या विषयावर तू मार्केटवर नेहमी राज्य करत राहिलास. मंगेश नेहमी मस्करीत म्हणतो, " महेश जोक्स पण फायनन्सवरच मारतो. इतर कोणत्याही विषयावर बोलायला लागला तर पाचव्या मिनिटाला तो फायनान्स या विषयावर येतो", हे ऐकताना थोडं गंमतीदार वाटलं तरी मंगेश किंवा आम्हा सगळ्यांना डाऊन दी लाईन एक गोष्ट माहितेय की तू फायनान्स हा विषय कोळून प्यायला आहेस. यापेक्षा एका यशस्वी उद्योजकाच लक्षण ते काय असू शकत? कुठे किती बोलायचं आणि कुठे किती वेळ थांबायचं किंवा वेळेचा प्रॉडक्टिव्ह वापर कसा करायचा हे तुला अगदी व्यवस्थित जमतं. एकदा एम.बी.सी. मीटिंगनंतर तू एका प्रोसेसबद्द्ल तेजस सरांना पेपरवर फ्लो चार्ट ड्रॉ करून दाखवत होतास आणि मी तिथेच उभा होतो. मला ते बघून कौतुक वाटलं आणि मी सहज म्हटलं, "मी आतापर्यंत हा पेपर रंगवला असता एवढी खाडाखोड केली असती", तेव्हा तेजस सर म्हणाले, " त्यासाठी थॉट्स मध्ये स्पष्टपणा लागतो जो महेश कडे चांगला आहे". आणि हे अगदी खरं आहे. मला तुझ्या विजनबद्द्ल किंवा थॉट प्रोसेसबद्दल कायम कुतूहल वाटत राहिलं आहे. अजूनही आहे.
आपल्या आजूबाजूंच्या लोकांचा कायम ग्रोथ होत राहावा ही तुझी मानसिकता जवळून पाहत राहिलो आहे. माझ्या बाबतीत मी टेकनॉलॉजी बाबतीत काय नवीन करू शकतो याबद्दल तुला मार्केटमधुन जेव्हा काही नवीन कळतं तेव्हा तू लगेच ते मला शेअर करत राहतोस. टेक आय टी ईजीअर बरेच वर्ष करण्याची ईच्छा होती पण नेमकं काय करावं कळत नव्हतं. पण तुला ही गॅप लगेच समजली आणि एक ट्रेनींग आपण सोबत अटेंड असती. मला तू ट्रैनिंग प्रोग्राम डिजाईन करण्यात मदत केलीस. कदाचित त्याशिवाय मी टेकनॉलॉजी ट्रैनिंग मध्ये लगेच पाय टाकला नसता. माझ्यासोबत अजा असेल किंवा विनोद दादा असेल तू तुझ्या सर्कल मधल्या प्रत्येक व्यक्तीबाबत फक्त योगदानाची भावना ठेवतोस. तुझ्या आजूबाजूचा प्रत्येकजण वैयक्तीक आयुष्यात कसा मोठा होईल हाच तुझा कायम प्रयत्न राहिला आहे.
कोलॅबरेशन आणि काँट्रीब्यूशन या दोन तत्वांवर तू आयुष्य जगत आलास आणि ती तुझी ताकद आहे. चुकीच्या गोष्टींना स्पष्ट चुकीची दाखवणे आणि त्याबाबतीत वेळोवेळी योग्य तो स्टॅण्ड घेणे हे तुझ्या इतकं चांगलं कुणाला जमतं असं मला वाटत नाही. इतके चॅलेंजस फेस करत असताना नेहमी सकारात्मक राहणं व चेहऱ्यावर स्माईल ठेवणं तुझ्याकडून शिकावं. प्रत्येकाच्याच आयुष्यात तुझ्यासारखा एक मित्र असावा. आम्ही त्या बाबतीत भाग्यवान आहोत. मित्राच्या पलीकडे आता आपलं भावाचं नात आहे आणि तेच कायम राहिल. बरीच वर्ष लिहायचं होत पण राहून गेलं. आज मुहूर्त लागला तुझ्या बाबतीतल्या भावना उतरवण्यासाठी. तुला भरपूर आयुष्य मिळो, तुझ्या प्रगतीचा आलेख असाच चढता राहो आणि तुझ्या हातून अगणित लोकांचं कल्याण होत राहो.
वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा भावा!
लव्ह यु!
- सुब्या


Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...