Skip to main content

Posts

नमस्कार...मी सुबोध अनंत मेस्त्री...तुमच्यासारखाच एक साधा सरळ माणूस....आज हा ब्लॉग सुरू करत आहे...आयुष्यात घडणार्‍या सध्या सरळ घटनामधून आपण खूप काही शिकत असतो...अशाच माझ्या आयुष्यात घडलेल्या या काही घटना...यातून कुणाला काही शिकायला मिळेल एवढीच अपेक्षा....मी कुणी लेखक नाही किवा साहित्यिक नाही...त्यामुळे माझी लेखणी सहज आणि सरळ आहे आणि त्यामुळे ब्लॉगच नाव सुद्धा तेच...या ब्लॉगला खूप सारे फॉलोवर्स मिळावेत अशी अपेक्षा नाही पण कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी छोट योगदान होईल एवढं नक्की....काही क्षण डोक्यात तात्पुरते राहतात आणि लिहून ठेवले तर ते कायम कोरले जातात...पुढे जाऊन हा ब्लॉग मी स्वता वाचेन तेव्हा माझ्याच आयुष्यातल्या ठळक आठवणी माझ्या नजरेसमोर उभ्या राहतील आणि त्यातली शिकवण सुद्धा :) #sahajsaral

जगून घ्या

माझा हा लेख त्या मित्रांसाठी आहे जे आज धावण्याच्या गडबडीत जगणं विसरले आहेत. आवर्जून वाचा. =================================== 2 दिवसापूर्वीच एक विचित्र घटना कानावर पडली आणि मन सुन्न झालं. दादाचा खास मित्र विजय याचा अपघाती मृत्यू झाला. त्याची बायको हि त्याची शाळेपासूनची प्रेयसी म्हणजेच 20 अधिक वर्षाची दोघांची ओळख आणि लग्नानंतर यांना एक पाच वर्षाची मुलगी त्रिशा. दादा मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत होता. दादा आणि विजयने सोसायटीमध्ये एकत्र बरेच सण एकत्र साजरे केले होते आणि त्यामुळे त्यांची यारी जबरदस्त जमली होती. प्रत्येक पार्टीची जान होता विजय. दादाने त्याला कधी नाराज पहिलाच नव्हता. तो फक्त नाराज असायचा त्याची मुलगी आजारी असताना. त्याचा त्रिशा वर खूप जीव आणि तिलाही सारखा बाबाच लागायचा. त्रिशा आजारी असताना तो दादाला नाराजीने सांगायचा, "त्रिशा आजारी आहे रे. ती जेवत नसेल ना तर मलाही जेवण जात नाही. हि लहान पोर खेळता खेळता शांत झाली कि कशात मन लागत नाही.". गटारी एन्जॉय करायची म्हणून विजयच्या सगळ्या मित्रांनी रेसॉर्ट वर पिकनिक प्लॅन केला. पिकनिकला निघताना तो आईची ...

लॉलिपॉप

"मी बिजनेस चालू करायचा विचार करतोय. आम्ही पाचजण तयार झालोय. सगळे शाळेतलेच मित्र. तू ओळखतोस सगळ्यांना. शाळेपासून आतापर्यंत काही ना काही निमित्ताने एकत्र भेटतोच आम्ही पण आता या निमित्ताने आयुष्यातला बराच वेळ एकत्र काढता येईल. आम्ही रायगडावर गेलो होतो तिथेच ठरवल आम्ही. कंपनीच नाव पण ठरलंय. स्वराज्य.", मी एकदम उत्साहात दादाला सांगत होतो आणि तोही तितक्याच उत्साहात मला प्रतिसाद देत होता. "अरे वा! मस्तच नाव ठरवलंय तुम्ही. महाराजांचा आदर्श समोर असेल तर काही चुकीच घडणार नाही आपल्या हातून. बिनधास्त कर. पैशांची गरज लागणार आहे का तुला?". दादाने विचारल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. नंतर माझे स्वप्न आणि प्लॅन दादाला सांगण्यात बराच वेळ गेला आणि तोही ते ऐकत होता. प्रतिसाद देत होता. मला त्यावेळी 3 वर्षाचा सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला अनुभव होता आणि कुणाच्या हाताखाली काम करण्याचा कंटाळा आल्याने स्वतःच स्वराज्य निर्माण करू अशी संकल्पना मी माझ्या मित्रांसमोर आमच्या रायगड ट्रिप मध्ये मांडली होती आणि माझ्या 4 मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आयुष्यातली कोणतीही गोष्ट ठरवली की मी ती अग...

सॉरी

एकदा गौरी रडतच दादाजवळ आली. "दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे." तिचा रडवेला चेहरा बघून दादाने विषयाच गांभीर्य ओळखलं. "बाजूच्या रूम मध्ये जाऊन बसू. तिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही", अस म्हणून दादा तिला बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेला. दादाने तिला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि तो समोरच्या बाकावर बसला. "बोल काय झाल?" गौरी मान खाली घालूनच बसली होती. दादाने विचारल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देऊन ती रडायला लागली. दादाही तिला काही बोलला नाही. बऱ्याच वेळेला रडल्यानंतरच मन मोकळं होत. थोड्या वेळाने ती शांत झाली. दादाने तिला पाणी दिल. थोडी शांत झाल्यावर तिने सांगायला सुरवात केली. "दादा, काल माझ्या हातून खूप मोठी चूक झाली रे. माझ आणि पप्पाचं काल घरात जोरात भांडण झाल. एवढं कि चाळीतीले लोक जमा झाले. ते मला प्रत्येक गोष्टीत अडवत असतात. हे करू नको ते करू नको. मी लहान पणापासून सगळं सहन केलं पण आता ते नाही होत. काल जरा जास्तच जोरात वाजलं. मी पप्पाना अरे तुरे केलं इथपर्यंत प्रकरण गरम झालं होत. त्यांनीही मला शिवीगाळ केला आणि मीही वाटेल तसं बोलली...