कॉलेजमध्ये अनेक मित्रांचा ग्रुप आणि त्यामध्ये एक मैत्रीण असते. माझ्याही ग्रुपमध्ये होती. डिग्रीच्या फर्स्ट ईयरला आमची ओळख झाली. मी स्पर्धेसाठी एकांकिका बसवत होतो आणि तेव्हा कॉमर्स स्ट्रीम मधल्या एका कलाकाराने हीचं नाव सजेस्ट केलेलं. ती एकांकिका तर मस्तच झाली पण त्या निमित्ताने मला आयुष्याभरासाठी एक चांगली मैत्रीण भेटली.
त्यानंतर कितीतरी परफॉर्मन्सेस आम्ही एकत्र केले. जेव्हा तिने नाटकात काम केलं नाही तेव्हा ती खंबीरपणे बॅकस्टेजला माझ्यासोबत उभी राहिली. समोर असताना कितीही टांग खेचली असेल पण तिच्या डोळ्यात कौतुक कायम असायचं. सेकंड ईयरला मी कल्चरल सेक्रेटरी आणि ही जॉईंट कल्चरल सेक्रेटरी होती. पण माझा अभ्यास आणि इतर एक्टिव्हिटीजमुळे वेळ मिळत नसताना हिने माझीही कामे विना तक्रार केली. तेव्हा आमची मैत्री अजून खुलली. मला कुणी हिरो घेणार नाही आणि तिला कुणी हिरोईन म्हणून प्रसादने लिहिलेली गाथा माझ्या प्रेमाची आम्ही लिड रोल मध्ये सगळ्या टीम सोबत केली होती. कॉलेजच्या ऍन्यूअलचा तो परफॉर्मन्स आयुष्यभर न विसरता येण्याजोगा आहे. मी माझी सिक्रेट्स तिच्यासमोर ओपन करायला लागलो आणि तिने गरज पडेल तिथे कायम माझी मदतच केली. त्यानंतर क्लासच्या फंक्शनच्या निमित्ताने आम्ही एकांकिकेत काम करतच राहिलो. प्रतिभाशी कॉलेज लाईफ मध्ये कनेक्ट राहण्यासाठी मी मोबाईल सुद्धा हीचाच वापरायचो. माझ्या लग्नात सुद्धा तिची मदत झाली. तिने वेळोवेळी मैत्रीण, बहीण, आई या सगळ्यांचे कर्तव्य माझ्या बाबतीत कायम पार पाडली. लग्न होऊन दुसरीकडे जाते की काय असं वाटत असताना नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कनेक्ट झालेला आमचा मित्र स्वप्नील तिच्या प्रेमात पडला आणि दोघांच लग्न झालं. मुलगी आमच्याच घरात राहिली म्हणायला हरकत नाही.
हल्ली रोज बोलणं भेटणं होत नाही. पुण्याला असल्यामुळे आणि दोन अत्यंत शांत स्वभावाच्या मुलांना जन्म दिल्यामुळे

तिच्याबद्दल तिच्या तोंडावर मी कधीच चांगलं बोलत नाही पण आज तिच्या वाढदिवशी माझ्या तिच्याबाबतीतल्या भावना समोर येणं गरजेचं आहे. माझ्या सुख दु:खात कायम माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या एकुलत्या एका मैत्रिणीला / वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Comments
Post a Comment