"चिऊ तू मला एवढा का आवडतोस?", या माझ्या प्रश्नावर "कारण तू माझा गोबू आहेस" हे तुझं मला मिठी मारून लाडात येणारं उत्तर मला कायम आवडतं. पप्पाचा सुबु आणि सुबुचा गोबू असा हा दहा वर्षाचा प्रवास. दहा वर्ष! तब्बल दहा वर्ष आपला प्रवास झालाय आणि अजून बराच बाकी आहे. तसं गुगल फोटोज रोज मला मेमरी मध्ये तुझे कित्येक जुने फोटो दाखवतच असतं. त्या प्रत्येक वेळी तुझं बालपण मी एन्जॉय करत असतो. एप्रिल २०१० ला तुझ्या येण्याची चाहूल आम्हाला लागली आणि घरातलं वातावरण बदलून गेलं. घरात लहान पिल्लू येणार म्हणून सगळेच आनंदात होते. घरात सगळ्यात लहान तुझी तनू आत्या. त्यानंतर लहान बाळ आपल्या घरात कुणीच नव्हतं. तुझी मम्मी स्ट्रॉंग म्हणून तू पोटात असतानासुद्धा अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत ट्रेनने प्रवास करून जॉब करत होती. तू मम्मी किंवा माझ्या किंवा आमच्या लग्नाच्या दिवशीच जन्माला यावंस ही आमची खूप ईच्छा होती. तुझी वळवळ जशी आता आहे तशीच तिच्या पोटात पण कायम होती. नोव्हेंबर २०१० चा अख्खा महिना तू तिला शांत एका जागी बसून दिलं नाहीस. मम्मीच्या वाढदिवशी तिच्या कळा सुरु झाल्याचा फोन मला सका...