Skip to main content

Posts

लहानगा इन्व्हेस्टर

====================================================================== नमस्कार, आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना सहज खर्चाला पैसे देणे किंवा त्यांचे हट्ट पुरवणे हे अगदी कॉमन आहे.  पण याचबरोबर ती मुलं हट्टी होणार नाहीत किंवा त्यांना पैशाची किंमत कळेल याची काळजी घेतली पाहिजे.  लहान वयात मुलांना गुंतवणुकीच महत्व पटवून दिलं तर त्यांना पूर्ण आयुष्य सुखात जगण्यात काहीच त्रास होणार नाही हे नक्की.  मी ते कसं करतोय या अनुभवावर माझा हा लेख. ===================================================================== "अरुण अंकल, आज मेरा बर्थडे था ना तो मेरा पिगी बँक ओपन किया है| टू थाउजंड फोर हंड्रेड फोरटी रुपीज निकला है|  मै पप्पा के पास भेजता हु| आप मेरे अकाउंट मे डाल देना|", सार्थकने मी विसरेन या विश्वासाने डायरेक्ट अरुण सरांना फोन करून माझ्याकडून पैसे घेण्याची सूचना आधीच देऊन ठेवली.  हे पैसे त्याच्या म्युच्युअल फ़ंड अकाउंट मध्ये फिरवायचे होते.  खरं तर त्याचा अकाउंट उघडायला एक वर्ष लेटच झालं होतं. सातव्या वाढदिवसाला जेव्हा त्याने त्याचा गल्...

मेडिसिन बॉक्स

======================================================== नमस्कार, आयुष्यातलं सगळ्यात जास्त गृहीत धरलं जाणारं नातं म्हणजे आई-बाबा.  आपण नकळत त्यांना दुखावून जातो पण त्यांच्या लेखी क्षमा हा शब्द कायमच आहे.  "तुम्ही कधी म्हातारे नाय होणार काय रे भाडखाऊ?", हा नाना पाटेकरांचा "आपला माणूस" चित्रपटातला संवाद यावेळी आठवतो.  आपण सगळं करत असताना खरंतर कुठेतरी कमी पडतो याची मला झालेली जाणीव म्हणजे हा लेख ========================================================= "या गोळ्या कुणी टाकल्या यात नवीन?", आईच्या मेडिसिन बॉक्समध्ये इव्हनिंग सेक्शनमध्ये गोळ्या पाहून मी विचारलं.  तिला गोळ्या वेळच्यावेळी खायला समजत नाही म्हणून आठवडभराचं सकाळ दुपार संध्याकाळ असे स्लॉट्स असलेलं एक मेडिसिन किट बॉक्स मी दहा दिवसापूर्वी घेऊन आलो होतो.  त्यात सगळ्या गोळ्या सकाळ आणि संध्याकाळच्या कापून ठेवल्या.  आपण बोलताना ती दुसऱ्याच विचारात असते म्हणून तिला तीन वेळा समजावून सांगितलं.  आज आठवडा संपला म्हणून आठवडभराच्या गोळ्या पुन्हा भरायच्या म्हणून पाहिलं तर आठवड्याभराचे एव्हीनिंग ...

डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र कथेवरून शिकण्यासारख्या १० गोष्टी

मी चित्रपट खूप कमी पाहतो.  बऱ्याच जणांकडून रिव्ह्यू घेऊन जर खूपच चांगला फीडबॅक असेल तरच सहसा.  पण "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" या चित्रपटाचा रिव्ह्यू घेण्याचा प्रश्नच आला नाही.  ट्रेलरच इतका जबरदस्त होता की हा सिनेमा बघायचा मोह आवरला नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा मुहूर्त लाभला.  चित्रपट अप्रतिमच आहे.  तो नाट्यभूमीचा काळ मांडण्यात दिग्दर्शकाला यश आलंय आणि त्यातही सर्वच कलाकारांची भूमिका अप्रतिम.  या चित्रपटातून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यातल्याच काही तुमच्यासाठी. १. तीच गोष्ट करा ज्यात तुमचं मन तुम्हाला साथ देतं व्यवसायाने डेंटिस्ट असून सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस सोडून डॉक्टर नाट्यभूमीकडे वळले.  फक्त पोटापाण्यापुरतं न जगता आपण काहीतरी मोठं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना होता.  घरातल्यांचा विरोध असूनसुद्धा त्यांनी ही जोखीम पत्करली होती.  नंतर सिनेमामध्ये यश मिळूनसुद्धा ते खूप आनंदी नव्हते कारण त्यांचं मन रंगभूमीवर जास्त रमत होतं. त्यात आवडलेला एक संवाद, "आपलं मन रमतं त्या क्षेत्रात अपयश मिळण्यापेक्षा ट्रॅजिक असतं आपलं मन...

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आप...

माणुसकीचा "चालक"

मोमो खाऊन आम्ही तिघे बाहेर पडलो आणि समोरच चौकात रिक्षा उभ्या होत्या.  काळोख पडला होता.  थोडावेळ पुन्हा एकदा आज झालेली डी. सी. पी. साहेबांसोबतची मीटिंग आणि पुढे होणाऱ्या कामांची उजळणी झाली.  तशी ती आज खूप वेळा झाली होती.  अतिष दादाने मला आणि दादाला रिक्षा बघून दिली आणि तो त्याच्या बाईकच्या दिशेने निघाला.  वायले नगर ते कल्याण स्टेशनपर्यंत रिक्षा शेअरिंगवर मिळाली. माझ्या आणि दादाच्या बरच वेळ गप्पा सुरू होत्या.  अंतरही खूप होत आणि ट्रॅफिकही. इतक्यात माझं लक्ष ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर गेलं.  "जेष्ठ नागरिक व वयस्कर यांना ५०% सवलत.  कल्याण हद्दीत दवाखाण्यासाठी मोफत सेवा."  हे वाचून मला कौतुक वाटलं.  मी दादाला ती स्टेटमेंट दाखवली.  रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात ती स्पष्ट वाचता येत होती.  "चांगलं काम करताय तुम्ही.  मस्त वाटलं बघून", दादा कुणाचही कौतुक अगदी लगेच करतोच. "काय साहेब?", रिक्षावाल्याने त्याच्या डाव्या बाजूच्या मोठ्या आरशातुन दादाला विचारलं. "हे वाचलं मागे.", दादानेही सीटकडे बोट दाखवत आरशातच बघून सां...

गोविंदा रे गोपाळा

"पप्पा, मी दीदीकडेच राहणार आहे.  परवा सुट्टी आहे मला", सार्थकने विचारलं नव्हतं तर मला डायरेक्ट सांगितलं होतं.  "राहू दे त्याला.   परवा इथे लहान मुलांची हंडी करायचा प्लॅन केला आहे.  खाली बेसला एकच मुलगा आहे आणि बाकी तीन मुलीच आहेत. हा असेल तर बरं पडेल", दादाने दुजोरा दिल्यावर मी पण आढेवेढे घेतले नाहीत.  ते असेही नसते घेतले कारण त्याला दिदीची आणि मोठे पप्पाची कम्पनी किती आवडते हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे.    मी त्या चिमुरड्यांची दहीहंडी कशी असेल याची कल्पना करायला लागलो आणि त्याचबरोबर आमची दहीहंडी लहानपणी कशी होती त्या आठवणींवरची धूळसुद्धा आपसूकच उडायला लागली. चाळ म्हटलं की प्रत्येक सणवार जोरदारच व्हायचा.  आमच्या चाळीत  जवळपास आमच्याच वयाची बरीच मुलं आणि तेवढेच आमच्यावर हक्क गाजवणारी दादा वयाची मुलं त्यामुळे प्रत्येक गोष्ट बॅलन्स होऊन जायची.  जेवढं घर लहान आणि माणसं जास्त तेवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क येण्याचं प्रमाण वाढतं आणि जेवढं घर मोठं आणि माणसं कमी तेवढाच त्यांचा आपापसातील संवाद कमी होऊन दुरावा वाढतो. ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...