Skip to main content

Posts

गोविंदा रे गोपाळा

"पप्पा, मी दीदीकडेच राहणार आहे.  परवा सुट्टी आहे मला", सार्थकने विचारलं नव्हतं तर मला डायरेक्ट सांगितलं होतं.  "राहू दे त्याला.   परवा इथे लहान मुलांची हंडी करायचा प्लॅन केला आहे.  खाली बेसला एकच मुलगा आहे आणि बाकी तीन मुलीच आहेत. हा असेल तर बरं पडेल", दादाने दुजोरा दिल्यावर मी पण आढेवेढे घेतले नाहीत.  ते असेही नसते घेतले कारण त्याला दिदीची आणि मोठे पप्पाची कम्पनी किती आवडते हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे.    मी त्या चिमुरड्यांची दहीहंडी कशी असेल याची कल्पना करायला लागलो आणि त्याचबरोबर आमची दहीहंडी लहानपणी कशी होती त्या आठवणींवरची धूळसुद्धा आपसूकच उडायला लागली. चाळ म्हटलं की प्रत्येक सणवार जोरदारच व्हायचा.  आमच्या चाळीत  जवळपास आमच्याच वयाची बरीच मुलं आणि तेवढेच आमच्यावर हक्क गाजवणारी दादा वयाची मुलं त्यामुळे प्रत्येक गोष्ट बॅलन्स होऊन जायची.  जेवढं घर लहान आणि माणसं जास्त तेवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क येण्याचं प्रमाण वाढतं आणि जेवढं घर मोठं आणि माणसं कमी तेवढाच त्यांचा आपापसातील संवाद कमी होऊन दुरावा वाढतो. ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

संदेश दादाचे पत्र - ०९ जून २०१८

डिअर सुबु, ६जूनला पुष्पाने मेसेज केला कि, उद्या सुबोधदादाचा वाढदिवस आहे का? मी म्हणालो असेल कारण, मलाही नक्की तारीख माहित नव्हती, पण तेव्हा वाटलं काही लिहावं तुझ्याबद्दल... पण नाहीच जमलं, आणि आज विनूची पोस्ट येईपर्यंत हि खंतही होतीच, कायतरी लिहायला हवं होतं, एकुलता एक असल्याने भांवडांचं असणं नसणं जाणवतं नव्हतं पण जेव्हा जाणवलं, तेव्हा बहिणीची कमतरता जाणवली, पण ती जाणिव होतेय एवढ्यात खुप बहिणी मिळाल्या, मित्रांमुळे भाऊ असण्याची कमतरता वाटलीच नाही. आणि इतर मित्रांची भावाभावाची नाती पाहता, भाऊ नाही हे बरचं आहे, असंच वाटतं, अपवाद तुझा आणि रविचा, तुमचं तुमच्या भावांजवळचं नातं पाहता, असे छोटे भाऊ असावेत असं वाटायचं आणि ते वाटता वाटता तुम्ही दोघेही माझेच भाऊ कधी झालात, मलाच कळालं नाही, तुम्ही दोघेही देत असलेला मोठ्या भावाचा मान पाहून माझा मलाच हेवा वाटायला लागतो, तु तसा रविपेक्षा उशिराने आयुष्यात आलास, ... एक बरं असतं, घरातल्याच माणसांने काही लिहलं कि काही गोष्टी नव्याने कळतात, म्हणजे जसं सकाळी विनूनं लिहलयं तसं, तुझं अभ्यासात हुशार असणं, घरी लाडं होणं. हे नव्हतं मला माहित, आणि ए...

आभार - ०९ जून २०१८

*!!! आभार !!!* ९ जून १९८५.  मध्यरात्री २ च्या सुमारास शताब्दी हॉस्पिटल चेंबूर इथे माझा जन्म झाला. शौच नलिकेत त्रास असल्याने माझं ऑपरेशन करणं गरजेचं होतं.  पण ऑपरेशन नंतर बाळाला ठेवण्यासाठी जी काचेची पेटी लागते ती शताब्दी हॉस्पिटलमध्ये नव्हती.  त्यामुळे ताबडतोब के.ई.एम हॉस्पिटलला हलवाव लागेल नाहीतर जीवाला धोका आहे असा ईशारा डॉक्टरने दिला. आमचे शेजारचे खोत भाई त्यावेळी शताब्दीमध्ये कामाला असल्याने त्यांच्या ओळखीवर लगेच अँबुलन्स मिळाली व मला ताबडतोब के. इ. एम ला हलवलं.  तिकडे उपचार करून पुढचे ९ दिवस मी काचेच्या पेटीतच होतो.  माझ्यासोबत अजून अशी पाच सहा मुलं तशाच पेटीत होती आणि त्यातला मी बचावलो अस आई सांगते.  देवाने नक्कीच काहीतरी घडवून आणण्यासाठी मला मागे ठेवला असं मला कायम वाटत राहीलं.  पण नेमकं ते काय हे अजून गवसायचं बाकी आहे. त्यावर्षी तुफान पाऊस होता.  बेडची व्यवस्था नसल्याने बाळंतपणातच आईला जमिनीवरच चादर टाकून झोपावं लागायचं.  त्यात अधूनमधून सारखी ती उठून त्या पेटीजवळ जाऊन मला बघत राहायची.  तिच्या किती प्रार्थना देवाकडे गेल्या अस...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...

खाकीमागचा माणूस

======================================== परवा सहज माझ्या रुपेश नावाच्या मित्राबरोबर चर्चा करताना पोलीसांचा विषय निघाला.  त्याच्या कारमधला ऑडिओ सिस्टम चोरीला गेल्यानंतर त्याला ठाण्यातल्या वर्तक नगर पोलीस स्टेशनमधील "श्री. ज्ञानेश्वर आव्हाड" नावाच्या पोलीस अधिकारी साहेबांनी कशी मदत केली हे तो सांगत होता.  त्यावेळी बेदरे सरांची आठवण आली.  बेदरेसर हे माझ्या आयुष्यातले पहिले पोलीस ऑफिसर ज्यांच्याशी मी समोरासमोर भेटलो आणि बोललो.  त्याअगोदर पोलिसांबद्दल माझं मत काही खास चांगलं नव्हतं.  त्यानंतर एखाद वर्षांनी संजय गोविलकर दादा भेटले आणि खाकीमागच्या खऱ्या प्रेमळ माणसांची भेट झाली. ======================================== दहा वर्षांपूर्वीची गोष्ट.  मी जॉबला लागल्यानंतर मामाचा मुलगा श्याम पहिल्यांदाच मुंबईमध्ये आला होता.  घरात पार्टी व्हावी म्हणून पावभाजी घेण्यासाठी आम्ही बाईकवर दोघेही चेंबूरला सदगुरू रेस्टोरंटमध्ये गेलो होतो.  सदगुरुची पावभाजी खूपच फेमस आहे.  चेंबूरला पार्किंगचा नेहमीचाच इश्यू.  त्यात सदगुरु एकदम स्टेशनबाहेरच ना...

आनंदवन प्रयोगवन

व्यक्तीला त्याच्या आयुष्याचा हेतू एकदा सापडला कि तो पूर्णत्वास नेण्यासाठी ती व्यक्ती काय करू शकते याच उदाहरण म्हणजे "कै. बाबा आमटे". श्रीमंतीत वाढलेल्या आणि नंतर वकीली पेशात असणाऱ्या बाबांना एका पावसाळ्यात गटारात पडलेला कृष्ठरोगी दिसला ज्याच्या जखमांमधून अळ्या बाहेर येत होत्या.  पूर्ण शरीर उध्वस्त झालेल्या त्या व्यक्तीला पाहून आपण वकीली सोडून कृष्ठरोग्यांसाठी काहीतरी करावं हे त्यांनी निश्चित केलं आणि एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली.  1949 मध्ये समाजाने नाकारलेल्या काही क्रुष्ठरोग्यांना एकत्र घेऊन वरोऱ्यात सरकारकडून मिळालेल्या एका जंगलातून त्यांनी आनंदवनाला सुरुवात केली.  याच असहाय्य रोग्यांच्या मदतीने तिथे एक मोठं गाव उभं राहिलं.  स्वतःला लागणाऱ्या गोष्टी स्वतः निर्माण केल्या जाव्यात म्हणून शेती, डेअरी, निरनिराळे उद्योग असं भलं मोठं साम्राज्य उभं राहिलं.  कृष्ठरोग्यांबरोबरच अंध, अपंग आणि समाजाने दुर्लक्षिलेले असे कित्येक लोक आनंदवनाचा आसरा घेऊ लागले.  विदर्भ असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तळी खोदली गेली, विहिरी खोदल्या गेल्या.  कोणत्य...