Skip to main content

Posts

ए दिल है मुश्किल

*ए दिल है मुश्किल* - सुबोध अनंत मेस्त्री ================================================ ========================= तारुण्याच्या बेभानपणात काही अशा काही चूका घडतात की ज्याचा परिणाम आयुष्यावर बेतू शकतो. अशीच घडलेली ही एक घटना. हे आर्टिकल ज्या मुलीवर लिहिलं गेलं आहे तिची परवानगी हे आर्टिकल पब्लिश करण्याआधी घेतलेली आहे. ================================================ ========================= सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे व्हाट्सप उघडून पाहिलं. रेग्युलर ग्रुपच्या मेसेज बरोबर सोनलचा (नाव बदलले आहे) पर्सनल मेसेज डाउनलोड झाला. त्यात तिच्या लग्नाची पत्रिका आली होती. पत्रिका पाहून मी तिला "Congrats!!!" चा मेसेज टाकला त्यावर तिने "लग्नाला या" असा रिप्लाय दिला. सोनलच आयुष्य रुटीनला लागतंय पाहून समाधान वाटलं. एखाद वर्षांपूर्वीची माझी आणि सोनलची ओळख. तशी खास ओळख नाही म्हणता येणार कारण आम्ही मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर सॉफ्टस्किल ट्रेनिंग देत असताना तिथे भेटलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी ती एक. आम्ही आमचे मोबाईल नंबर सग...

ये उडी उडी उडी

*ये उडी उडी उडी* - सुबोध अनंत मेस्त्री ================================================ "ए आयुष्यात कधी पतंग हातात तरी धरलेलीस का?" अजाने टोमणा मारलाच. "हा तू मोठा शहाणा ना.  तुला येते का? मी उडवलीय लहानपणी", मी थोडा उखडलो होतो. "सुबोध भावोजी चिडले", म्हणत पूनम चिडवायला लागली पण माझ लक्ष सध्या कणी बांधण्यात  आणि प्रसाद पासून फिरकी वाचवण्यात गुंतलं होत.  आम्ही ५ जण पतंग उडवणारे आणि फिरक्या फक्त तीनच.  त्यात दादा आणि सुनील दादा कणी बांधून पतंग उडवायला गेलेसुद्धा.  माझी आणि प्रसादची फिरकीवरून एकमेकांची फिरकी घेणं चालू होत. अजा कधी प्रसाद ची बाजू घ्यायचा कधी माझी.  मी फिरकी प्रतिभाकडे दिली आणि कणी  बांधायला सुरुवात केली. खरं तर मी या आधी ना स्वतःहून कधी कणी बांधली होती ना पतंग उडवली होती.  लहानपणी आमच्या चाळीतला कुणी मोठा दादा पतंग उडवायचा आणि मी फिरकी धरायला उभा राहायचो.  मग एकदमच उंचावर पतंग जाऊन मूक(स्थिर) झाली कि माझ्या हातात फक्त मांजा धरायला द्यायचा.  हाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी.   बीचवर हवा जास्त असल्याकारणाने पतं...

चाळभेट

- सुबोध अनंत मेस्त्री ===================================================================== बरेच दिवस आमच्या चाळीत जाण्याचा विचार मनात घोळत होता. रविवारी रात्री समीरच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तो योग जुळून आला. आम्ही चेंबूर सोडल्यापासून चाळीत जाण्याचा प्रश्न सहसा उद्भवत नव्हता आणि चेंबूरला गेल्यावर चाळीच्या दिशेने जाणं झालंच तरी चाळीला वळसा मारूनच जायचो कारण नेहमीचीच घाई. कुणी भेटलं तर वेळ जाईल आणि नंतर तोंडावर टाळता येत नाही म्हणून आधीच घेतलेली ही काळजी. दादा आणि मी अगदी ठरवून तासभर वेळ काढूनच मागच्या गल्लीतून आमच्या चाळीत शिरलो. माणूस सुखावतो तो जुन्या आठवणींमध्ये हे कुठेतरी वाचलं होतं. ह्या चाळीत मी वयाची पहिली 24 वर्ष काढली होती. बालपण इकडेच काढल्यामुळे घाटल्यातल्या गल्ल्या न गल्ल्या पाठ होत्या. सुरुवातच एकदम जिगरी बालमित्रपासून करण्याचं ठरलं होतं. त्याला दोन चार कॉल लावून झाले होते पण त्याने काही फोन उचलला नाही. डायरेक्ट घरीच जाऊ अशा विचाराने त्याच्या घरी शिरलो. चाळीत एक बर असत, सकाळी उघडलेले दरवाजे सरळ रात्री झोपतानाच कडी लावून बंद होतात. लहानपणी त्यामुळेच ...

अर्धांगिनीस पत्र

10 वर्ष !!!  2007 ते 2017. किती वेगळं आहे हे सगळं.  आपण प्रेमात काय पडलो...लग्न मोडता मोडता झालं काय आणि आता लग्न होऊन 10 वर्ष झाली.  किती सहज निघून गेली इतकी वर्षे.  आता आठवलं तर खरच इतका काळ लोटला आहे का असा प्रश्न पडावा इतक्या सहज.   मला तो दिवस अजून आठवतो जेव्हा तू सकाळी 7 वाजता चेंबूरच्या आपल्या घरी मला सांगायला आली होतीस की आपलं लग्न होऊ शकत नाही.  त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुझ्या घरी आपल्याबद्दल समजल्यामुळे त्यांनी विरोध केला.  तुझ्या आईसाठी तू इमोशनल झाली होतीस.  त्या दिवशी किती रडली होतीस तू?  तुझं रडणं थांबावं म्हणून मी माघार घेतली आणि सांगितलं नाही करायचं लग्न.  (थोडक्यात हे मोडल्यासारखंच झालं).  हा सगळा प्रकार बघून माझ्या आईला टेन्शन.  तिला वाटायचं ही याच्या आयुष्यातून गेली तर हा देवदास होईल.  मग मी नंतर ऑफिसला सुट्टी टाकली.  मग 3-4 तास आपण एकत्र घालवल्यावर तुझा विचार पलटला आणि लग्न करायचंच असा ठाम निर्णय मला सांगितलास.  केवढे होतो आपण तेव्हा?  फक्त 21-22 वर्ष.  मी नोकरीला ...

टारगेट नाईन्टी प्लस

- सुबोध अनंत मेस्त्री =========================================  नमस्कार.  ही घटना मी नुकत्याच केलेल्या एका कोर्सदारम्यानची आहे.  मुलांवर कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती  करताना त्यांच्या मनावर आपण काय परिणाम करतोय याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.  वरवर शांत दिसणारी मुलं मनात विचारांचं वादळ घेऊन फिरत असतात याच जिवंत उदाहरण देणार हे आर्टिकल. ========================================= मी नुकताच एक लाईफ ट्रान्सफॉर्र्मेशन चा कोर्स केला.  पहिल्याच दिवशी तुम्ही हा कोर्स का लावला याबद्दल ट्रेनर तिथल्या पार्टीसिपेंटना माहिती विचारत होता.  हॉलच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन स्टँडिंग माईक लोकांना बोलण्यासाठी ठेवण्यात आले होते.  बरेच लोक माईकवर येऊन स्वतःबद्दलचे प्रॉब्लेम्स शेअर करत होते.  काही लोकांना तिकडे जबरदस्ती कुणी ना कुणी पाठवलंय हे सुद्धा त्यांनी सगळ्यांसमोर कबूल केलं.  त्यात एक 16-17 वर्षाचा मुलगा माईकवर बोलण्यासाठी रांगेत उभा राहिला होता.  चष्मा लावलेला, सावळा वर्ण, स्पाईक कट...थोडा स्टाइलीश पण तितकाच चेहऱ्यावरून स्कॉलर स...

ट्राय ट्राय

-सुबोध अनंत मेस्त्री ========================================================================== नमस्कार, बऱ्याच दिवसांनी लेख घेऊन आलो आहे. सहज सरळच्या माध्यमातून मी आजूबाजूच्या घटनांचा अभ्यास करत असतो. ही सुद्धा अशीच एक साधी सरळ घटना. लहान मुलांना त्यांचे पालक प्रत्येक गोष्टीत कमी लेखत असतात किंवा त्याला एखादी गोष्ट जमणार नाही हे त्याच्या मनावर बिंबवत असतात आणि त्याने त्या मुलाचा आत्मविश्वास खालावत जातो. अशा बऱ्याच घटना मी लहानपणापासून अनुभवत आलोय आणि ते माझ्या मुलाच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही याची जमेल तितकी काळजी घेतो. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव अप्रत्यक्षपणे करून देणं व चांगल्या कामासाठी त्याची पाठ थोपटण हे पालकांचं कर्तव्य आहे. ============================================================== आज सकाळी नाश्त्याला ऑम्लेट खायचं म्हणून मी फ्रिजचा दरवाजा उघडला आणि अंड्यांचा कप्पा रिकामा? "आई...अंडी संपली का सगळी?", कालच 4-5 पहिली असल्याने मी जवळपास कुतूहलाने विचारलं.   "हो, तुझ्या पोरालाच लागतात सारखी.  सकाळ संध्याकाळ अंड्याची पोळी पाहिजे त्याला...

नेटयुग

नेटयुग -    सुबोध अनंत मेस्त्री सध्या नेटयुग जोरदार सुरु आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग आपल्या हाताच्या बोटावर आलं आहे. “काय तू व्हाट्सअप/ फेसबुकवर नाहीस? कुठल्या जगात वावरतो राव!.” म्हणजे व्हाट्सअप किंवा फेसबुकवर नसणं म्हणजे जगाच्या कितीतरी मागे असल्याचा एक समज निर्माण झालाय. एखादा इव्हेंट किंवा पिकनिकच सोडाच पण आता लोक कोणत्या हॉटेल मध्ये जेवतायत, कोणतं गाणं ऐकतायत कोणता पिक्चर बघतायत हे सुद्धा पोस्ट करतात. या आभासी जगात व्यक्ती विशेषतः मुलं हरवत चालली आहेत. आता इंटरनेटसुद्धा दिवसेंदिवस स्वस्त होत जाईल. बऱ्याच ठिकाणी डिजिटल इंडियाच्या उपक्रमाखाली वायफाय कनेक्शन लावले जातील आणि या आभासी जगाच्या कक्षा आणखी रूंदावतील. सकाळी झोपतुन उठल्या उठल्या लगेच आपण पहिले व्हाट्सअप चे मेसेजेस चेक करतो आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात होते. त्यानंतरही काम करत असताना काही मिनिटांनी आपलं लक्ष या मोबाईल कडे जातंच आणि आपण आपल्या कामापासून वेगळे होतो. सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर झाला तर त्यासारखं प्रभावी माध्यम कोणतंच नाही. पण याचा गैरवापर होत असेल तर त्यासारखं घातकही काही ...